शब्दकोडे ८

किशोर देवधर
सोमवार, 7 डिसेंबर 2020

शब्दकोडे ८

आडवे शब्द : 
१. कितीही सांगितले तरी मूळपदापासून पुन्हा प्रारंभ करायला लावणारा या अर्थाची एक म्हण, लाक्षणिक अर्थाने मठ्ठ, 
७. मर्दुमकी, शौर्य, 
९. खाताना होणारा तोंडाचा आवाज, 
१३. खोड, दुर्गुण, 
१४. पावलांचा आवाज, 
१५. शस्त्राचा वार किंवा जखम, 
१६. रेशीम कीटकाचा कोश किंवा भालचंद्र नेमाडे यांच्या एका कादंबरीचे नाव, 
१८. त्रिदोषांपैकी एक किंवा दिव्यातील दोरी, 
१९. काजळाचा एक प्रकार, 
२०. शंकराचे एक कडक व्रत ज्यात पोळीच्या लाडूचा नैवेद्य दाखवतात, 
२३. सुंदर, सुकुमार, 
२५. युद्ध किंवा वाळवंट, 
२६. आपलेच असणारे ओठ, 
२७. तराजूतील विषमता घालवण्यासाठी एका पारड्यात घातलेले थोडे वजन, यालाही न पुरणे म्हणजे योग्यतेचा नसणे, 
२८. गाढा अभ्यास, तपश्चर्या, 
३०. भोवऱ्‍याचा खिळा, 
३१. दृढ, पक्का, 
३२. दासबोधाची रचना जेथे झाली ती डोंगरातील खोल जागा 

उभे शब्द : 
१. सुगंध, सुवास, 
२. घुंगरासारखे वाजणारे व्यायामशाळेतील धनुष्याकृती साधन, 
३. भेली, गुळाचा मोठा गोळा, 
४. यंत्राचा खटका किंवा धनुष्य, 
५. गलबताचा मागचा भाग, 
६. या मगरीचे अश्रू म्हणजे खोटे दुःख, 
८. प्रतिबंध, मनाई, 
१०. पोळीचा, भाकरीचा पाव तुकडा, 
११. सौदामिनी, आकाशात चमकणारी वीज, 
१२. रांगोळीचा दगड, 
१५. सप्ताहातील अपशकुनी दिवस, 
१७. भंडारा, प्रसादाचे जेवण, 
१८. डावा किंवा प्रतिकूल, 
१९. पीयूष, अमृत, 
२०. हव्यास, प्रबळ इच्छा, 
२१. षोडशोपचार, 
२२. युद्धातील डंका, 
२४. सोन्याचांदीचे तंतू, 
२६. नीच, दुष्ट, 
२८. संचय, संग्रह, 
२९. त्वेष, आवेश, 
३०. खोटा आरोप, बालंट

संबंधित बातम्या