शब्दकोडे ९

किशोर देवधर
सोमवार, 14 डिसेंबर 2020

शब्दकोडे ९

आडवे शब्द : 
१. उत्कर्ष, भरभराट, 
३. सिद्धीस गेलेला, 
६. उपकार किंवा कर्ज, 
७. नरम, सौम्य, 
९. अष्टलक्ष्मीपैकी हत्तीसह असलेली कमळात बसलेली देवी, ही पर्जन्याची देवता मानली जाते, 
१०. कावळा, 
१२. सजीव व निर्जीव सर्व सृष्टी, 
१४. द्वितीयेच्या चंद्रकोरीच्या आकाराचा रत्नजडित कपाळावर लोंबणारा एक पारंपरिक अलंकार, 
१६. धार्मिक ग्रंथ, 
१७. आलाप, लकेर, 
१८. छोट्या चौकोनी सोन्याच्या संदुकीत माणिक मोती बसवून तयार केलेला स्त्रियांचा गळ्यात घालण्याचा अलंकार, 
२०. जुन्या काळात मांडवावर लावला जाणारा कर, 
२१. बैलावर नियंत्रण ठेवणारी दोरी, 
२३. टांचणवही, 
२४. कणखर, मजबूत, 
२६. अनाथ, डोक्यावर छप्पर नसलेला, 
२८. प्राण, आत्मा, 
२९. आठवणीसाठी उभारलेली वास्तू, 
३०. नसते पराक्रम करणारा 

उभे शब्द : 
१. कचेरीत येणारा पाहुणा, 
२. विश्वासघातकी, 
३. रागाचा झटका किंवा नांगीचा तडाखा, 
४. अंधार, काळोख, 
५. रेचक किंवा मोत्याचे तेज, 
८. खंडोबाला अर्पण केलेला मुलगा, 
११. अन्नात आलेले मातीचे, रेतीचे सूक्ष्म कण, 
१२. ओरखडा, 
१३. शरीरातील स्त्राव निर्माण करणाऱ्‍या गाठी, 
१४. बरोबर लागू पडणारे किंवा सोंगट्यांच्या खेळातील हार, 
१५. चांगल्या अक्षराचे एक विशेषण, 
१६. गळू पिकण्यासाठी हे त्यावर बांधतात, 
१८. भारतातील शुष्क परदेशात आढळणारे कुरंग गटातील हरिण, 
१९. कंबरडे, 
२२. महालातील अंतःपुर, 
२३. ख्रिस्ती धर्माची दीक्षा, 
२५. भांडकुदळ, 
२६. कुबड, पाठीत आलेला बाक, 
२७. कषाय, उकळून काढलेला अर्क

संबंधित बातम्या