शब्दकोडे १५

किशाेर देवधर
सोमवार, 25 जानेवारी 2021

शब्दकोडे

आडवे शब्द : 
१.     वैदू, गावठी वैद्यकीय उपचार करणारा, 
६.     हात किंवा सरकारला देण्याचा महसूल, 
७.     जमालगोटा, 
८.     धागे ताणून वस्त्राचे भोक बुजवण्याची क्रिया, 
१०.     नवऱ्याचा भाऊ, 
११.     झाडाच्या बुंध्याचे मोठे लाकूड, 
१२.     ऋतू, हंगाम, 
१४.     या वनस्पतीचे सुगंधी तेल केशवर्धक असते, 
१६.     माता, निर्माती, 
१८.     अकल्पित, अनपेक्षित किंवा चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित एक नाटक आणि चित्रपट, 
२०.     सरोवर, तळे, 
२१.     हा गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, 
२२.     तांबूल, पैजेचा हा उचलताना विचार करावा, 
२३.     सरकारी मुखत्यारपत्र, 
२५.     पक्षाघात, अर्धांगवायू, 
२७.     पाणी वाहून नेण्याची चामडी पिशवी, 
३०.     बुरूज किंवा किनारा, 
३१.     सूर्याने कर्णाला स्वसंरक्षणासाठी ही दिली होती आणि ती मिळवण्यासाठी इंद्राला याचक व्हावे लागले होते, 
३२. कितीही रंग बदलले तरी या प्राण्याची धाव कुंपणापर्यंतच, 
३३. अश्व, घोडा

उभे शब्द  

१.     एक सुवासिक वनस्पती, 
२.     खोल पाणी असलेला नदीच्या पात्राचा भाग, 
३.     नोकरीपेशाचा माणूस, 
४.     पाण्यात राहून माशाशी हे शत्रुत्व करू नये, 
५.     डोळ्यांना होणारा एक विकार, 
७.     मानवी शरीरात सुप्तावस्थेत असलेली एक दिव्य शक्ती, 
९.     चिथावणी, आतून उत्तेजन, 
१३.     माडी, माळा, 
१५.     अल्प का होईना पण वाटा उचलणारा प्राणी, खार, 
१७.     मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून काही करण्याची देवापुढे केलेली प्रतिज्ञा,
 १८.    ओढ, सततचे चिंतन, 
१९.     हिरव्या रंगाचे रत्न, पाचू, 
२०.     प्रहार, चपराक, 
२१.     सुगंधी धूर सोडणारा एक पदार्थ, 
२२.     उलटा अर्थ, गैरसमज, 
२४.     दुर्दैव, 
२६.     पांथस्थ, पथिक, 
२८.     तगादा, मागणीचा आग्रह, 
२९.     मांडलिक राजाने सम्राटाला देण्याची देणगी

संबंधित बातम्या