शब्‍दकोडे क्र. १७

किशाेर देवधर
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

शब्‍दकोडे क्र. १७

उभे शब्द 
१.     घुबडाच्या जातीतील लहान आकाराचा पक्षी किंवा गाणी म्हणून भल्या पहाटे भिक्षा मागणारी एक जमात, 
२.     प्रवासातील भाग, 
३.     शिडीच्या पायरीची लाकडे किंवा विहिरीत उतरण्यासाठी खोदलेल्या खाचा, 
५.     गावाच्या सीमेवरील अब्रू टांगण्याची कमान, 
६.     कायदेशीर, नियमाला धरून, 
८.     सर्व दिशांना पसरलेली कीर्ती, 
१०.     शुभ, पवित्र, 
११.     प्रयत्नांची शर्थ, धडपड, 
१२.     तीर, बाण, 
१५.     गल्ली, अरुंद रस्ता, 
१६.    मोठे मतभेद, 
१७.     पुरुषांचे चार मोत्यांचे कर्णभूषण, 
२०.     सुभा, प्रांत, 
२२.     प्रभुत्व, वर्चस्व, 
२३.     संगीतातील सामना, 
२४.     स्त्रियांचा कपाळावर लोंबणारा अलंकार, 
२७.     शत्रूला हे घालणे म्हणजे ठार मारणे, 
२९.     बांगड्यांचा दुकानदार, 
३१.     नवीन कामाचा मुहूर्त किंवा निर्धार, 
३२.     चर्मकार

आडवे शब्द
१.     कपाळावर बांधण्याचे एक आभूषण, 
४.     गुरे बांधण्याची लांब दोरी, 
७.     दुकानात जमणारे विक्रीचे पैसे, 
९.     पिशाच्च, भूत, 
११.     अंधाऱ्या रात्री आकाशात दिसणारा तारकांच्या गर्दीतून वाहणारा दुधाळ प्रवाह, मिल्की वे, 
१३.     तोकडा, अपुरा, 
१४.     रममाण, मग्न, 
१५.     गप, अफवा, 
१८.     शरीरातील हा पिवळा रस कधीकधी खवळतो, 
१९.     नीरस, कंटाळवाणे, 
२१.    चिटोरा, कागदाचा तुकडा, 
२४.     ही गुप्त गोष्ट फोडण्याची धमकी दिली जाते, 
२५.     बट्टा, कलंक किंवा किमती नग, 
२६.     मोठा विंचू, 
२७.     सातारी पेढ्याचा प्रकार, 
२८.    जबरी चोरी, दरोडा, 
३०.     बाजार भरण्याचे ठिकाण किंवा शहरातील भाग, 
३३.     ठराविक चौकटीतले, 
३४.     समारंभात पदवी स्वीकारणारा, 
३५.     हत्तीच्या ओरडण्याचा आवाज, 
३६.     पलाण, खोगीर

संबंधित बातम्या