शब्दकोडे ३३
शब्दकोडे ३३
आडवे शब्द :
१. द्वाररक्षक,
४. सरळ कच्ची शिवण,
७. रात्री पडणारा पाऊस किंवा एक पक्षी,
८. एकाच राक्षसाच्या शरीरातून जन्मलेल्या दोन ग्रहांपैकी एक, याला छायाग्रही किंवा कालाग्नी म्हणतात,
९. कठीण, अवघड वाटचाल,
१२. धुमाकूळ, हैदोस,
१३. ढगांचा समूह,
१५. खालच्या पातळीचे, दर्जाचे,
१७. धमकीवजा इशारा,
१८. थाप मारून वाजवण्याचे चर्मवाद्य,
१९. गणवेष किंवा आगमनाची सूचना,
२०. मनसुबा, योजना,
२२. विटीदांडू किंवा गोट्यांच्या खेळातील खाच,
२३. जाडसर कणीदार पीठ,
२४. काम संपवण्याचा झपाटा, कार्यशक्ती,
२६. ही जात्यावर बसल्याशिवाय सुचत नाही,
२७. पखालीचे पाणी भरण्याचे तोंड किंवा एक नदी,
२८. कोल्हापूरचा प्रसिद्ध दागिना,
३०. स्वर्गस्थ वाडवडील,
३२. ही ठोकर पुढच्यास लागल्यास मागच्याने शहाणे होणे अपेक्षित असते,
३३. वैयक्तिक चिटणीस,
३४. मेंढा किंवा एक रास
उभे शब्द :
१. मारहाण, जुलूम करून अंमल गाजवण्याची पद्धती,
२. हा द्रवरूप धातू चढला की तीव्र संताप,
३. अतिशय निर्लज्ज, निर्ढावलेला,
५. धाक, जरब,
६. अपराधी,
९. आपल्या राष्ट्रीय फुलातील धागे,
१०. निवडुंगाच्या जातीतील एक बहुगुणी वनस्पती,
१४. तापट, अविचारी,
१६. आश्चर्य, अदभूत गोष्ट,
२०. असूया, मत्सर,
२१. लांब व अरुंद खड्डा,
२२. सभा सुरू करण्यासाठी असलेली आवश्यक संख्या,
२३. घुसळण्याचे साधन,
२४. नसते उद्योग,
२५. अंगरख्याचा बंद किंवा लांब व अरुंद पिशवी,
२६. तेजस्वी, प्रभावी,
२९. आनंदोत्सव, विजयोत्सव,
३१. ठसा, साचा