पाऊस शब्दकोडे
पाऊस शब्दकोडे
आडवे शब्द
१. मृग नक्षत्रात आढळणारा पावसाची चाहूल देणारा पाठीवर सहा ठिपके असणारा एक कीटक, याला इंद्रगोप किंवा सोमकिडा असेही म्हणतात,
५. आपल्या पारंपरिक पद्धतीनुसार पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाचे संबोधन,
७. पाकळी, पान किंवा सैन्य,
८. शरीरातील हवा किंवा दिव्यातील दोरी,
१०. लुगड्याची किंवा धोतराची कमरेजवळ बांधलेली गाठ जिला पैसे अडकवतात,
११. मनोहर, सुंदर,
१४. मे ते सप्टेंबर या काळात नैऋत्येकडून येणाऱ्या पावसाचे संबोधन किंवा पावसाची झड लागल्यावर पडणाऱ्या दुष्काळाचे संबोधन,
१५. कमळाचे देठ,
१६. गाडीचे छत,
१८. कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज किंवा मशिदीतून केलेला पुकारा,
१९. पाण्यात राहून याच्याशी वैर करू नये,
२२. तात्पयार्थ किंवा कालवणाचा एक प्रकार,
२४. झुंड, टोळी,
२५. आपल्या पूर्वापार पद्धतीनुसार पूर्वा नक्षत्राला पडणाऱ्या पावसाला हिचा पाऊस असे म्हटले जाते कारण तो पिकास चांगला असतो,
२७. हद्द, मर्यादा,
२८. बडबड्या,
३१. कापडी भिंत,
३२. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील एक वर्षा पर्यटन स्थळ जेथील पावसाचे सरासरी प्रमाण ७,५०० मि.मी. आहे,
३३. रात्री पडणारा पाऊस,
३४. ओढा, रोख,
३७. झाकण असलेले लहान पात्र, करंडा,
३८. सोशिक, संयमी
उभे शब्द
१. पावसाळी हवेचे एक विशेषण,
२. गोंगाट, कोलाहल,
३. एक पालेभाजी,
४. वाम किंवा कमी महत्त्वाचा,
६. मुळशीहून माणगावला जाणाऱ्या या घाटात गेली काही वर्षे चेरापुंजीपेक्षादेखील जास्त पाऊस पडला होता, तेथील पर्जन्यमान ६,४९८ मि.मी. आहे,
९. आपल्या पारंपरिक पद्धतीनुसार पुनर्वसू नक्षत्राला पडणाऱ्या पावसाला असे म्हटले जाते,
१२. पडक्या घराचे सामान,
१३. कुबेराचा सेवक,
१५. पाण्याच्या अस्तित्वाचा आभास,
१७. अर्धी ओंजळ,
२०. मघा नक्षत्राला पडणाऱ्या पावसाला आपल्याकडे असे म्हटले जाते कारण मेघगर्जना होऊन हा पाऊस पडतो,
२१. जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे मेघालय राज्यातील ठिकाण जेथील सरासरी ११ हजार ८७३ मि.मी. आहे,
२३. मार्गस्थ, प्रयाण केलेला,
२६. या मगरीचे अश्रू म्हणजे खोटे दुःख,
२९. पावसाची प्रतीक्षा करणारा पक्षी,
३०. समाजशिक्षण,
३१. दरवाजा, दार,
३५. रोग प्रतिबंधक औषध,
३६. बलरामाचे शस्त्र, नांगर