शब्दकोडे ४०

किशोर देवधर
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

शब्दकोडे ४०

आडवे शब्द : 
१.     उंचावरून, पक्ष्याच्या नजरेतून दिसणारे दृश्य, 
४.     बाटलीच्या तोंडात दाबून बसवण्याचे झाकण, 
६.     कोळीष्टके, 
८.     बगलबच्चा, कोणतेही हुकूम पाळणारा हाताखालचा खास माणूस, 
१०.     आपल्या राष्ट्रीय पक्ष्याचा अलंकार, 
१२.     व्यसन लावण्यास हा एकच चषक पुरेसा होतो, 
१३.     बूड, खालचा भाग किंवा छावणी, 
१४.     कमी वजनाचा किंवा किमतीचा, 
१६.     होमात आहुती टाकण्याची क्रिया, 
१७.     रेशीम कीटकाचा कोशिटा किंवा भालचंद्र नेमाडे यांची एक कादंबरी, 
१८.     जास्तीत जास्त, कहर, 
२०.     गवताची पेंढी, 
२१.     त्वरा, घाई, 
२३.     नांगराच्या टोकाचे लोखंडी पाते, 
२४.     मृदंगाच्या तोंडाभोवतालचे कातडी कडे, 
२५.     स्त्रियांच्या कर्णभूषणाचा एक प्रकार, 
२६.     शूर, योद्धा, 
२७.     अरबी समुद्रात सापडणारा एक मासा ज्याला ‘ड्रमफिश’ असेही संबोधले जाते, 
२८.     खस किंवा लहान मुलांच्या पायातील एक दागिना, 
२९.     दुसरे लग्न करणारी, 
३१.     हे जळते लाकूड माकडाच्या हाती देऊ नये, 
३२.     शरीरातील हवा किंवा दिव्यातील दोरी, 
३३.     काळोख, अंधार, 
३४.     अंबवलेली पेज, 
३५.     दोलायमान, अस्थिर

उभे शब्द : 
१.     एखाद्या प्रकल्पामुळे घरादारावर पाणी सोडावे लागलेला, बेघर झालेला, 
२.     गुंफलेली फुले, 
३.     घामावर चिकटलेली धूळ, हा हातचा असेल तर अत्यंत सोपी गोष्ट, 
४.     नवीन कल्पना किंवा भांगेचा तुरा, 
५.     मंदावलेला, आळशी, 
७.     उदास, खिन्न, 
८.     शंकराने पचवलेले जहाल विष, 
९.     साक्षात यमदूतासारखा भयंकर माणूस, 
११.     कुणीतरी असाच अविवक्षित माणूस, 
१४. बोकड वगैरे कापण्याची एक पद्धत जी क्रूर असली तरी पवित्र मानली जाते, 
१५.     श्राद्धाच्यावेळी कावळ्यासाठी काढून ठेवलेला भाताचा गोळा, 
१९.     शोध, तपास किंवा कापड विणण्याचे यंत्र, 
२२.     अव्यवस्थित, वेष असा असला तरी अंतरी नानाकळा असाव्यात, 
२३.     सोडचिठ्ठी, एखाद्या विचारापासून दूर जाणे, 
२६.     उबग, कंटाळा, 
२८.     चिवट, सहजपणे न तुटणारे, 
२९.    थर, सपाटी, 
३०.     ललना, सुंदर स्त्री, 
३२.     डावा किंवा प्रतिकूल
                

संबंधित बातम्या