शब्दकोडे ४४

किशोर देवधर
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

शब्दकोडे ४४

आडवे शब्द : 
१.     या झाडाची फळे दिसतात पण फुले नाहीत, कारण दत्तगुरूंनाच माहिती, 
३.     डोक्याने केलेला जोराचा आघात, 
५.     अगदी पांढरा स्वच्छ दगड, 
७.     भृंगराज, 
९.     खांबावर आडवी टाकलेली तुळई, 
११.     पुष्कळ चिखल किंवा कामाचा पसारा, 
१३.     तळपायाचा मागचा भाग, 
१५.     तिन्हीसांजेची उजळणी,
१८.     अळे, खाचर, 
२०.     ताकाला बेसन लावून केलेले कालवण, 
२२.     लेखणी किंवा घटनेतील भाग, 
२३.     ढाक्याचे प्रसिद्ध तलम कापड, 
२५.     कुंकवाची वगैरे छोटी डबी, 
२७.     प्रेतावरील वस्त्र, 
३०.     इस्लाम धर्मशिक्षक, 
३२.     सावधान म्हणून इशारा दिला तरी विवाह, लग्न, 
३५.     पलंग, 
३७.     पूर्ण भरतीची वेळ किंवा संवत्सर, 
४०.     मासे पकडण्याचे साधन किंवा ही घालून भरीस पाडतात, 
४१.     आपल्याकडील शेतीचा पहिला हंगाम, 
४२.     हत्तीच्या ओरडण्याचा आवाज

उभे शब्द : 
१.     प्रवेशद्वारावरील उंचवटा, 
२.     विष्णूची पत्नी, लक्ष्मी, 
४.     चारित्र्य, अब्रू, 
६.     खोदण्याचे हत्यार, कुदळ, 
८.     हा स्वतःच्या पायात घुसला तर     लगेच काढावा पण दुसऱ्‍याचा काढताना विचार करावा, 
१०.     अफवा, बोलवा, 
१२.     वाम किंवा कमी महत्त्वाचा, 
१४.     ठिणगी किंवा छोटी लढाई, 
१६.     रेतीवरील रेषा किंवा फाशांवरून शकुन पाहण्याची विद्या, 
१७.     आगमनाची खूण, पावलांचा आवाज, 
१९.     ऐटबाज, सुंदर, 
२१.     दरिद्री पण नशीब असेल तर याचा राव होतो, 
२३.     अंतःकरण, चित्त, 
२४.     विचार विनिमय, चर्चा, 
२६.     सुताराचे लाकूड तासण्याचे एक हत्यार, 
२८.     मैलाचा आठवा भाग, २२० यार्ड, 
२९.    कलश किंवा एक रास, 
३१.    मसालेदार, चमचमीत, 
३२.     वैराग्यासाठी लौकिक असलेले व्यासमुनींचे पुत्र किंवा पोपट, 
३३.     तुळशीचा तुरा, 
३४.     रोग प्रतिबंधक औषध, 
३६.     म्हातारपणी लागणारे वेड, 
३८.     किल्ल्याभोवतालची सपाट जागा, 
३९.     वेडे चाळे, लोक नावे ठेवतील असे वागणे
                        ००००००

संबंधित बातम्या