शब्दकोडे ४५

किशोर देवधर
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

शब्दकोडे ४५

आडवे शब्द : 
१.     म्हणजे लाक्षणिक अर्थाने स्वतःचे डोके न लढवता लोक सांगतील तसे वागणारा, 
५.     कपटी, कारस्थानी, 
६.     खेकड्याची रास किंवा रोग, 
७.     सर्व बाजूंनी बंदिस्त जागेत अडकून पडण्याची स्थिती, 
८.     होन, सोन्याचे नाणे, 
९.     खडीसाखरेच्या पाकात गुलाबाच्या पाकळ्या घालून केलेला औषधी पदार्थ, 
१२.     नमुना, उदाहरण, 
१३.     बारीक ताप, अंग मोडून येणे, 
१५.     निशा, रात्र, 
१७.     हा गद्य इतिहास वाचण्यासाठी मोडीचे ज्ञान आवश्यक, 
१९.     कर्ज फेडण्यास असमर्थ, 
२०.     योगी, तपस्वी, 
२१.     प्रसन्न करणारी वाऱ्‍याची मंद लहर, 
२४.     बंधन, फास, 
२५.     अमर्यादा, फाजील सलगी, 
२६.     ढगांचा समूह, 
२८.     दोन नद्यांचे एकत्र येणे, मीलन, 
२९.     बांधकामाचे शास्त्र, 
३०.     लहान लाकडी हातोडी

उभे शब्द : 
१.     वैशाखातल्या रणरणत्या उन्हात फुलणारा एक वृक्ष, मे फ्लॉवर ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या या झाडासाठी सातारा येथे १ मे रोजी दिन साजरा करण्यात येतो, 
२.     नोकरीपेशाचा माणूस, 
३.     मग्न, कार्यरत, 
४.     पाणी वाहून नेण्याची चामडी पिशवी, 
५.     वेताची काठी, 
७.     दागिन्यातील रत्न बसवण्याची जागा, 
९.     समारंभात वगैरे सुगंधी पाणी शिंपडण्याचे विशिष्ट आकाराचे पात्र, 
१०.     धान्यातील खडे किंवा तबल्याची वादी, 
११.     या मोठ्या हातोड्याचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, 
१४.     नशिबाने जुळून येणारी गोष्ट, 
१६.     आत बदाम असलेले सुक्यामेव्यातील एक फळ, 
१८.     गाढव किंवा घासण्याचा कागद, 
२१.    झणझणीत पिठलं, 
२२.     गुहा, खबदडी, 
२३.     निर्वाणीचे, अखेरचे, 
२५.     पाहुणचारातील आपुलकी, 
२७.     तापट, अविचारी, 
२८.     कामगारांचे काम बंद ठेवण्याचे हत्यार
                        ००००००

संबंधित बातम्या