शब्दकोडे ४६
शब्दकोडे ४६
आडवे शब्द :
१. हिंदू मान्यतेनुसार विवाहाच्या आठ प्रकारांपैकी एक,
३. मजबूत भिंत, हा छातीचा करतात,
५. कोरड्या खोकल्याची उबळ,
६. गाईचा बछडा,
८. मुंबईतील एक शोभेचे पद, शेरीफ,
११. अफवा, बोलवा,
१२. प्रतिबंध, मज्जाव,
१५. नुकतीच फुटलेली मिशी,
१७. विष्णूचे वाहन, पक्ष्यांचा राजा,
१९. प्रतारणा, फसवणूक,
२१. मनातील पूर्वदूषित ग्रह,
२२. मगज, फळातील भाग,
२३. हाताच्या बोटाच्या टोकांना होणारा एक विकार,
२५. त्रिदोषांपैकी एक, श्लेष्मा,
२७. कसेही वाकणारे, ताणले जाणारे,
३१. त्वचेवरील केस किंवा रामाचा एक मुलगा,
३३. उघडा पडणारा मिश्रधातू,
३४. दिखाऊ, मनापासून नसलेले,
३५. गोजी, कालवड
उभे शब्द :
१. प्रारब्ध, दैव,
२. डोंगरमाथ्यावरील सपाट जमीन,
३. पूर्वीचे अंतराचे एक परिमाण, साधारणपणे दोन मैलाइतके,
४. ओढ, सततचे चिंतन,
५. तलवारीच्या घावापासून बचाव करण्याचे साधन,
६. गावाजवळची लहान वस्ती,
७. रजत, चांदी,
९. खूप खोल खड्डा,
१०. हरणाचे पिल्लू,
११. जास्त भाजलेल्या खव्याचे प्रसिद्ध सातारी पेढे,
१२. विद्रोह, उठाव,
१३. अश्व, घोडा,
१४. पाण्यावरील तेलाचा थर,
१५. काचेचा मुलामा,
१६. हळूहळू, मंदगतीने चाललेले काम,
१७. लहान किल्ला किंवा सोनाराचे एक हत्यार,
१८. हा मारून दुसऱ्याचे द्रव्य लंपास करतात,
२०. उसाचा रस काढण्याचे यंत्र,
२१. आपलेच म्हणणे खरे करण्यासाठी अडून बसणारा,
२४. पूर्व दिशा,
२६. नावाची पाटी,
२८. अंगावरील मारहाणीच्या खुणा,
२९. समुद्रातील एका प्राण्याचे कवच, देवीचे उपासक याची माळ घालतात,
३०. पतदार, प्रतिष्ठित,
३२. नवरदेव किंवा आशीर्वाद