शब्दकोडे क्र. १

किशोर देवधर
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

शब्दकोडे क्र. १

आडवे शब्द 
१.     अज्ञातवासात असताना सहदेव याचे संबोधन कारण तो गुरांची देखभाल करण्याचे काम करत होता,
३.     शासन, दंड, 
५.     आकडा किंवा मांडी, 
७.     दोलायमान, अस्थिर, 
८.     भोपळ्याची एक जात, 
१०.     कणखर, मजबूत, 
११.     झाकण असलेले छोटे पात्र, करंडा, 
१३.    टरफलासहित तांदूळ, 
१४.     लावालावी, तंटा, 
१७.     डासांचे उत्पत्तिस्थान, साचलेले पाणी, 
१९.     कुटण्याचे हे दांडके स्वतःच्या डोळ्यात असेल तर दिसत नाही, 
२१.     प्राणशक्ती, बुद्धी, 
२३.     गोवऱ्‍याची आगटी, जमिनीतील खाचेत पेटवलेला विस्तव, 
२४.     रस्त्यावर प्राण्यांचे खेळ, जादूचे प्रयोग करणारा, 
२६.     गाढव किंवा घासण्याचा कागद, 
२७.     केळीचे संपूर्ण पान, 
२८.     दूध आटवून केलेला पदार्थ, 
३०.     जबाबदारी किंवा अग्रभाग, 
३१.     शिफारस, 
३२.     दुर्दैवी, कमनशिबी

त्रभे शप्द
१.     पायपीट, 
२.     अवहेलना, पायदळी तुडवणे, 
३.     साखरेचा द्राव, 
४.     सुताराचे लाकूड तासण्याचे एक हत्यार,
५.     अवकाश, 
६.     रेचक किंवा मोत्याचे तेज, 
८.     बचत, खर्चात कपात, 
९.     मैलाचा आठवा भाग, २२० यार्ड अंतर, 
१२.     ओतीव लोखंड किंवा महाराष्ट्रातील एक जिल्हा, 
१३.     अयोध्यानगरी, 
१५.     पचनास साह्य करणारा मुखरस, 
१६.     हाताचे दाखवण्याचे बोट, 
१८.     फजिती, पचका, 
२०.     अवडंबर, अवाजवी महत्त्व, 
२२.     होडी चालवणारा, नावाडी, 
२३.     किंचित प्राणांश, ही असेपर्यंत डॉक्टर आशा सोडत नाहीत, 
२५.     ग्रामीण भाषेत नवरा, 
२८.     इमारतीच्या दोन खांबांमधील जागा किंवा ओटीचे कापड, 
२९.     पोटात होणाऱ्‍या कृमी

संबंधित बातम्या