शब्दकोडे २

किशोर देवधर
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021

शब्दकोडे २

आडवे शब्द : 
१.     कसली काळजी, घोर नसलेला, विलासी, 
४.     देवापुढील उभ्या दांड्याचा दिवा, 
६.     दर तीन वर्षांनी येणारा अधिक महिना, 
८.     गावचा नदीच्या पलीकडील भाग, 
९.     टवाळी, अपाय करणे, 
१०.     बाजू, पंधरवडा किंवा राजकीय संघटना, 
११.     पोपट किंवा व्यासपुत्र ज्याच्यासारखे वैराग्य असावे, 
१२.     वसंत ऋतू किंवा दशावतारातील विनोदी पात्र, 
१३.     अलंकार, दागिना, 
१६.     सतर्क, सावध, 
१७.     शेळपट, तोंडावरची माशी न हलणारा,
१८.     देवाचा निर्णय किंवा छतावरील मातीचे पन्हाळ, 
१९.     अंगात त्राण नसलेला, ढिला, 
२१.     माहीतगार, जाणकार, 
२२.     तगमग, जीव वरखाली होणे, 
२५.     वंचना, फसवणूक, 
२८.     उपडा, उताणा, 
२९.     पायाच्या दुसऱ्‍या बोटात घालण्याचा स्त्रियांचा एक अलंकार

उभे शब्द : 
१.     कुरकुरीत, 
२.     आंदोलन, दोन हात करणे, 
३.     पैशाच्या चौथ्या हिश्याचे किंवा दहा- बारा कवड्यांच्या किमतीचे नाणे,
४.     भंडारा, प्रसादाचे जेवण, 
५.     चामखीळ, तीळ, 
७.     एकदाचा काय तो बरा वाईट निकाल लावणे, 
९.     डोक्याला झालेली जखम, 
११.     नीरस, कोरडे, 
१४.     नायनाट, समूळ नाश, 
१५.     वेगळा विचार, मतभेद, 
१६.     पाणथळ, चिखलाची जागा, 
१७.     विनम्रता, मर्यादा पाळून वागणे, 
२०.     लठ्ठ, जाडजूड, 
२२.     तेल काढण्याचे यंत्र, 
२३.     नवला, गवंड्याचे एक हत्यार, 
२४.     बैल गेल्यावर ही कुंपणाच्या दाराची झडप लावून काय उपयोग?, 
२५.     रूढी, चाल, 
२६.     तंतू, 
२७.     बंदरातील माल चढवण्या उतरवण्याची जागा, डॉक.

संबंधित बातम्या