शब्दकोडे क्र. 4
शब्दकोडे क्र. 4
उभे शब्द
१. अशोभनीय, अयोग्य कृत्य,
२. अंदाज वर्तवण्याचा जुगार,
३. सैन्याला कुमक,
४. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर आकाशात दिसणारी तांबूस छटा,
५. रोजकीर्द, रोजचा हिशेब लिहिण्याची वही,
८. रसिकांनी दिलेली पसंतीची पावती,
९. लहान तंबू,
१०. कैवल्य, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता,
१२. वराला घोडीवरून मिरवत आणताना पुढे नाचणारा वधूचा भाऊ,
१४. म्हणजे पत्नी, बायको,
१५. घोड्याला दाणा चारण्याची पिशवी,
१८. ओढ, सततचे चिंतन,
२०. अतिरेक, कमाल,
२१. स्वार्थी, मतलबी,
२२. पुरुषात श्रेष्ठ कृष्णासारखा,
२४. चातुर्वर्णांपैकी लढवय्या,
२५. नियम, कायदा,
२८. नहर, कालवा किंवा जमिनीवर बसण्याचे लाकडी आसन,
२९. पूर्ण भरतीची वेळ किंवा संवत्सर,
३०. शेंडीभोवतालचे केसांचे वर्तुळ
आडवे शब्द
१. विस्तृत, पसरलेले,
६. आश्रयस्थान किंवा नियामक, डीन,
७. निषिद्ध, टाकाऊ,
८. पात्राच्या तोंडावर आवळून बांधलेले वस्त्र,
१०. हर्ष, आनंद,
११. हातावर तुरी देणे, फसवून निसटणे,
१३. खिडकी, झरोका,
१५. फिरवून उघडण्याचा किंवा बंद करण्याचा नळ,
१६. तीर, बाण,
१७. आग विझवणारे वाहन,
१९. जरब, वचक,
२१. बंदुकीच्या पुढील भागाला लावलेले पाते,
२३. बळजबरीने केलेले लग्न,
२६. आपल्याकडील शेतीचा दुसरा हंगाम,
२७. ओंडका टाकून तात्पुरता उभारलेला पूल,
२८. अग्नीने राजा दशरथाला दिलेला प्रसाद, खीर,
३१. घोड्यावरून मारलेला फेरफटका,
३२. खडकाळ जमीन