शब्दकोडे - ५
शब्दकोडे - ५
उभे शब्द
१. सकाळची कामे, नित्यकर्मे,
२. एक सुवासिक वनस्पती,
३. साखर गाळल्यानंतर राहिलेला मद्यार्क तयार करण्याचा भाग, मोलॅसिस,
४. गवताचा भारा, पेंढी,
५. तपस्वी, बैरागी,
७. जादूची काठी,
९. समक्षता, ताडून पाहाणे,
१०. चानी किंवा लोणच्यातील द्राव,
१२. पोळीचा किंवा भाकरीचा पाव भाग,
१३. गाढवावरून काढलेली अप्रतिष्ठेची मिरवणूक,
१४. तुटलेली मने पुन्हा जुळणे, राजकारणात ही कधी कुणाशी होईल सांगता येत नाही,
१५. हिंमत, अंगातील शक्ती,
१६. आघात किंवा समुद्र किनार्यावरील बोटी लागण्याची जागा,
१७. ऊर्मी, लहर,
२०. जमिनीची नोंद असलेला सरकारी उतारा,
२२. व्रण, जखम,
२३. साचा, ठसा,
२५. कलाकाराचे मानधन,
२७. परीट, धोबी,
२९. जाच, त्रास
आडवे शब्द
१. पंचकोशांपैकी एक,
४. फार मोठे संकट,
६. खोगिरावरील गादी किंवा कमरेजवळ पडणारी घडी,
७. अंबवलेली पेज,
८. दया, कृपा,
१०. समुद्राच्या भरतीचे पाणी जेथवर जाते तेथवरचा नदीचा भाग,
११. स्वागत करताना फुंकून वाजवण्याचे वाद्य,
१२. लांब व अरुंद खड्डा,
१४. घुबड,
१५. अगदी उघडउघड,
१८. खोड, दुर्गुण,
१९. अमसुलाचे फळ,
२०. तात्पयार्थ किंवा कालवणाचा एक प्रकार,
२१. दालन, विभाग,
२३. गिळून चूप बसण्याचे द्विदलधान्य,
२४. हत्तीवर अंकुश ठेवणारा,
२६. कोल्ह्याच्या जातीचा हिंस्र पशू,
२८. पार्सल गुंडाळण्याचे कापड,
३०. कोकणात आढळणारा जांभा जातीचा घडीव दगड,
३१. नाणी पाडण्याचा कारखाना