शब्दकोडे ६
शब्दकोडे ६
आडवे शब्द :
१. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असलेली अमावास्या, अथर्ववेदात तर याचा अर्थच अमावास्या असा आहे तर ऋग्वेदात या काळात अपत्यप्राप्तीसाठी पूजा करावी असे म्हटले आहे,
४. कुऱ्हाड किंवा जमिनीवरील लादी,
६. अखंड, सतत,
७. फरक, अंतर,
१०. वनस्पतीचे तंतू,
१२. जीव गेलेला, मृत,
१३. डोक्यावर मारलेली हलकी चापट,
१४. खुलासा, विमोचन,
१६. यंत्राचा खटका किंवा धनुष्य,
१७. वत्सल किंवा एक पालेभाजी,
१८. गाडीचे छत,
२०. घरदार, देश सोडून गेलेला,
२३. पिता किंवा निर्माता,
२४. घोड्याची देखभाल करणारा,
२६. रेलचेल, विपुलता,
२७. कोल्हापूरचे एक संबोधन,
२८. टेकण्याची मृदंगाच्या आकाराची उशी
उभे शब्द :
१. एखाद्या कलेची किंवा शास्त्राची तात्त्विक बाजू, नियम,
२. खरेखुरे, जसे आहे तसे,
३. जवळचा मार्ग असताना वळसा घालून लांबच्या रस्त्याने जाण्याचा प्रकार, उलटा घास घेणे,
४. आदेश, हुकूम,
५. थंड किंवा यावरून भाताची परीक्षा करतात,
८. वाजवीपेक्षा जास्त, असा आत्मविश्वास म्हणजे अपघाताला निमंत्रण,
९. धिप्पाड, शक्तिशाली,
११. धडपड, प्रयत्न,
१४. व्रतसमाप्तीनंतरचा सोहळा,
१५. उदंड, अमाप,
१९. स्वतःच्या शिलकीतून केलेला खर्च,
२१. सढळ हस्ते देणारा, कर्णासारखा,
२२. पाषाण, खडक,
२४. लहान लाकडी हातोडी,
२५. माणसापेक्षा दसपट असलेले कपड्याचे तेज,
२६. हा बांधणे म्हणजे प्रतिज्ञा, निर्धार