शब्दकोडे ७

किशोर देवधर
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

शब्दकोडे ७

आडवे शब्द : 

१.     सरिता, नदी, 
४.     वाघ्याचे लाकडी भिक्षापात्र, 
६.     देवघरातील शंखाची बैठक, 
७.     स्नान न केलेला, 
८.     कळवळा, उमाळा, 
९.     विष्णूचा एक अवतार, डुक्कर, 
१०.     नियमित आहार, हा दुधाचा घालतात, 
१२.     भांडकुदळ, 
१४.     नसते पराक्रम करणारा, 
१५.     महिषा, रेडा, 
१६.     लसणाची पाकळी किंवा दह्याची कवडी, 
१७.     सटरफटर, किरकोळ, 
२१.     पिष्टमय, वात निर्माण करणारे, 
२२.     सजावटीचे चंदेरी तंतू, 
२४.     फार श्रेष्ठ, थोर दैव, 
२५.     लांब व अरुंद खड्डा, 
२६.     कच्चे टिपण, आराखडा किंवा एक झणझणीत तोंडीलावणे, 
२७.     लहान मुलांचे लोंबते कर्णभूषण

उभे शब्द : 
१.     सत्यांश, खरेपणा, 
२.     पर्वतावर स्वारी करणारा, 
३.     मंद बुद्धीचा, मूर्ख, 
५.     काम टाळण्यासाठी केलेला चेंगटपणा, उगाचच वेळ काढणे, 
७.     हा द्रवरूप धातू चढला की तीव्र संताप, 
९.     परमुलुखात जाऊन एकत्रित वस्ती करणारे, इंग्रजांसारखे, 
१०.     गुर्मी, ताठा, 
११.     फुशारकी, प्रौढी, 
१३.     जाड कापडाचा बिनबाह्यांचा अंगरखा, हा मंत्र्याकडे हवाच, 
१६.    गल्ली, अरुंद रस्ता, 
१७.     झाडावरून कच्ची काढून शिजवून वाळवलेली सुपारी, 
१८.     सुताराचे लाकूड कापण्याचे हत्यार, 
१९.     काठीला पोलादी टोक असलेले आपल्याला एकमेव सुवर्णपदक मिळवून देणारे शस्त्र, 
२०.     वाटप, 
२२.     शेळीचे पिल्लू, 
२३.     बाटलीच्या तोंडात दाबून बसवण्याचे झाकण

संबंधित बातम्या