शब्दकोडे ८
शब्दकोडे ८
आडवे शब्द :
१. कामात जास्त गुंग असण्याची स्थिती, यामुळे काही कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाही,
४. किरकोळ, क्षुद्र व्यक्ती,
७. फसव्या, लबाड,
९. निबर, खरखरीत,
११. केवळ तर्कावरून एखादी गोष्ट प्रत्यक्षात कशी असेल ते ठरवणारा,
१४. धुंदी, नशा,
१५. खाण्यापिण्यावर नियंत्रण, यावर पडणे मात्र फायदेशीर,
१६. घडलेल्या घटनांचा आढावा,
१७. अळूच्या भाजीत घालण्याची आंबट पालेभाजी,
१८. आरामदायी, शानदार,
२०. चाल, पद्धत,
२२. हलक्या प्रतीची जमीन किंवा धान्य,
२४. पाणी भरण्याचे पात्र, घागर,
२५. कल्हईसाठी वापरला जाणारा खनिज क्षार,
२८. उत्तराधिकार, ठेवा,
३०. लठ्ठ पण आतून पोकळ,
३२. डोळ्यावर आलेली झोपेची गुंगी,
३४. मुख्य कार्यभार सांभाळणारा, डायरेक्टर,
३५. चाकांच्या खुणा उमटलेला रस्ता, बहुतेक याच मार्गाने जाणे पसंत करतात
उभे शब्द
१. बैलावर नियंत्रण ठेवणारी दोरी,
२. आंब्यातील बी, कोय,
३. रामबाण, खात्रीशीर,
५. तांदळाचे तुकडे,
६. व्यसनाची हुक्की,
८. बारीक बुडबुड्यांचा समूह,
१०. दोषारोप,
१२. सम्राटाच्या अधिपत्याखालील राजा,
१३. महिरप किंवा धनुष्य,
१४. बाजू सावरून धरणारा, पक्ष घेणारा,
१७. कपड्याला घातलेली दुमड,
१८. चाळिशी, चष्मा,
१९. सरकार किंवा शिक्षा,
२१. काम करण्यास दक्ष, सज्ज,
२२. फेरी, प्रदक्षिणा,
२३. धमकावणी,
२४. चित्रबलाक, लांब चोच आणि पाय असलेला एक पक्षी,
२६. तमाशातील नाटक,
२७. अदृश्य, गायब,
२९. भूपती, राजा,
३०. सरळ ओली फांदी,
३१. मूस, ठसा,
३२. झाडांना पाणी घालण्याचे विशिष्ट आकाराचे पात्र,
३३. तबल्याचा जोडीदार: