शब्दकोडे ९

किशोर देवधर
सोमवार, 13 डिसेंबर 2021

शब्दकोडे ९

आडवे शब्द : 
१.     मोठ्या कष्टाने होणारे काम, 
३.     आगमन होताच चांगली गोष्ट घडून येण्याचा योग, 
५.     डोक्यात शिरणारे वेड, 
७.     दुःख वगैरे दूर करणे, 
८.     पुस्तकातील प्रारंभीचे निवेदन, 
१०.     तक्रार, फिर्याद, 
११.     जवस किंवा त्या आकाराचे हातावरील चिन्ह, 
१३.     या वाळवलेल्या आल्यावाचून खोकला गेला तर उत्तमच, 
१४.     गाण्यातील हजार वार रेशीम घेऊ शकणारा श्रीमंत मामा, 
१६.     सोपे, अगदी सहज होण्यासारखे, 
१९.     वाळा, सुगंधी तृण 
२०.     हे जळते लाकूड माकडाच्या हाती देऊ नये, 
२१.     गोणीची दोरी, 
२४.     गुदाम, खजिना, 
२५.     विटीदांडू किंवा गोट्यांच्या खेळातील खाच, 
२६.     पराभव, नाश, 
२७.     फोलपट, साल, 
३०.     शरीराचे अवयव, 
३१.     जलदेवता

उभे शब्द : 
१.     दृढ निर्धार, 
२.     बारीक ताप, अंग मोडून येणे, 
३.     जात्याचा दगड किंवा कानाची कड, 
४.     मंडईतील दलाल, अडत्या, 
५.     एखादी गोष्ट स्मरणात राहावी म्हणून ही पदराला बांधतात, 
६.     मेंदी, 
८.     निर्माणकर्ता, नेता, 
९.     अरण्यात राहून भोगावे लागणारे कष्ट, 
१२.     येणे असलेली गोष्ट परत मिळवणे, 
१३.     हा जळाला तरी पीळ कायम राहातो, 
१५.     कलम, लिहिण्याचे साधन, 
१७.     अगदी निलाजरा, निर्ढावलेला, 
१८.     उठाणू, गळू, 
२०.     काकडी वगैरे दह्यात घालून केलेले तोंडीलावणे, 
२१.     पोत्याचा तुकडा, 
२२.     जडजवाहिरांचा व्यापारी, सोनार, 
२३.     अलौकिक, अद्‍भुत, 
२८.     निरुपयोगी वस्तू, जुनी वृत्तपत्रे, 
२९.     रोम किंवा रामाच्या एका मुलाचे नाव

संबंधित बातम्या