शब्दकोडे १०
शब्दकोडे १०
आडवे शब्द :
१. बाळंतिणीच्या कळा,
४. उडालेला थेंब, तुषार,
६. व्यापार,
७. मुख, तोंड,
९. द्रवपदार्थ साठवण्याचे मोठे उभट पात्र,
१०. घुसळण्याचे साधन,
१२. कुबड, पाठीत आलेला बाक,
१३. मारुतीचे शस्त्र,
१५. पाटी, मोठी टोपली,
१६. चव कळणारे इंद्रिय, जीभ,
१८. सोस, प्रबळ इच्छा,
२०. कोहळा किंवा राखाडी रंगाचा,
२१. ढोलाबरोबर वाजवण्याचे चर्मवाद्य,
२३. देहान्ताचे शासन देण्यासाठी जमिनीत पुरलेला अणकुचीदार खांब,
२४. दोन मोठ्या जलप्रवाहांना जोडणारी पाण्याची चिंचोळी पट्टी,
२५. भले, कल्याण,
२८. लाल भोपळ्याची गोड पुरी,
३०. मत्स्यकन्या,
३१. स्तुतिपाठक, गोडवे गाणारा,
३२. जारणमारणाचा एक प्रकार
उभे शब्द :
१. धेंड, बडे खटले,
२. इनाम मिळालेले गाव, जमीनजुमला किंवा मायदेश,
३. स्थिती, अवस्था किंवा वस्त्राच्या टोकाची सुते,
४. जंगली खजुरीचे झाड,
५. घुसळण्याच्या रवीच्या आकाराचे शस्त्र,
६. विडंबन,
७. मनातील वैरभाव, सूडबुद्धी,
८. जिन्नस, वस्तू किंवा पर्वत,
११. सांसारिक गोष्टींचा त्याग,
१२. अनाथ, डोक्यावर छत्र नसलेला,
१४. आगआग, जळजळ,
१७. येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव,
१९, मागील भागापेक्षा पुढील भाग रुंद असलेला भूखंड, हा लाभत नाही असे म्हणतात,
२२. कुंपणावर वगैरे लावला जाणारा लांब देठांची सुंदर फुले येणारा एक वेल, याला ‘रंगून वेल’ असे म्हटले जाते,
२३. वळले तर हे नाहीतर भूत किंवा यावरून स्वर्ग गाठतात,
२५. हिंमत, अवसान,
२६. या झाडाच्या लाकडापासून विड्यात घालण्याचा कात तयार करतात,
२७. ताज, मुकुट,
२८. डोंगरावरील रस्ता,
२९. आतील महत्त्वाचा भाग,
३०. बस्तान, स्थिरस्थावरता