शब्दकोडे ११
शब्दकोडे ११
आडवे शब्द :
१. चुलीत घालण्याची लाकडे, इंधन,
४. नाकाने हुंगण्याचे औषध किंवा तपकीर,
६. छिद्र किंवा पोकळी,
७. ग्रहताऱ्यांचा संचारमार्ग,
८. वर्म, यास लागेल असे बोलतात,
९. अवखळ, खोडकर,
१०. जलाशयाकाठी उगवणारे गवत,
११. जथा, टोळी,
१२. पुळका, उमाळा,
१४. आगीचा लोळा,
१५. रेचक किंवा मोत्याचे तेज,
१६. लुगड्याच्या निऱ्यांचा उंचवटा जो अंगापेक्षा मोठा नसावा,
१७. कलेचा वगैरे आस्वाद घेणारा,
२०. तमाशाचा संच किंवा कुस्त्यांचे सामने,
२२. डागडुजी, दुरुस्ती किंवा शेतीची कामे,
२५. आजीवन, मरेपर्यंत,
२६. बरोबरील हत्ती, घोडे, नोकर वगैरे सरंजाम,
२८. विशिष्ट शैली, अदा,
२९. जखमेची खूण, डाग,
३०. वितुष्ट, वाकडे,
३१. ज्यामुळे त्वचेवरचे केस झडतात असा एक विकार,
३२. पोट फुगून लागलेली कळ
उभे शब्द :
१. सूर्याचे एक नाव,
२. आवाज, ध्वनी,
३. रोखठोक, सडेतोड,
४. गर्व, ताठा,
५. बोटाच्या नखाभोवतालची नाजूक त्वचा,
७. आस्था, आपुलकी,
८. अंतःकरणातील मायेचा झरा,
१०. क्षार, खारट पदार्थ,
११. छताला टांगलेले बिलोरी झाड,
१३. आत कोंब वाढलेला नारळ,
१५. जहांबाज, वस्ताद,
१६. बीजकोष किंवा भजे,
१८. कुशल, निपुण,
१९. व्यवसाय, धंदा,
२०. आदेश, हुकूम,
२१. अळूची मसालेदार पातळ भाजी,
२२. जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रकार,
२३. मालवाहू नौका, जहाज,
२४. एक भटकी जमात,
२७. सातूसारखे एक धान्य