शब्दकोडे १४
शब्दकोडे १४
आडवे शब्द :
१. म्हणजे सिंहासारखा शूर,
५. उत्पन्न किंवा बाजारात येणारा माल,
७. रुची, गोडी किंवा द्रवपदार्थ,
८. वधूबरोबर देण्याच्या वस्तूंचे लग्नाच्यावेळी मांडलेले प्रदर्शन,
१०. शस्त्रे साफसूफ करणारा,
११. गर्व, ताठा,
१३. देखभाल, काळजी,
१५. पांढऱ्या रुईचे झाड किंवा समुद्र मंथनाच्यावेळी रवी म्हणून वापरण्यात आलेला पर्वत,
१६. परीट, धोबी,
१९. एक फळ ज्याला ग्रीक ‘कैरिका’ असे संबोधायचे,
२०. विजांचा कडकडाट,
२३. मोहल्ला, गल्ली,
२४. हे प्रकरण चोरीचे असेल तर हळूहळू बोंबलावे,
२६. तात्पयार्थ किंवा कालवणाचा एक प्रकार,
२७. सुईचे दोरा ओवण्याचे भोक,
२९. दुकान असलेली झोपडी किंवा खोके,
३०. राजापुढे चांदीची काठी घेऊन चालणारा,
३१. वाणी, बत्तीशी,
३२. छताचा घरातील भाग, झोप लागली नाही तर याकडे पाहात पडून राहावे लागते,
३३. अकस्मात, अचानक
उभे शब्द :
१. शेवटच्या प्रवासाला जाताना केलेली व्यवस्था,
२. खुंटी किंवा खिळा, याला लावल्याशिवाय प्रश्न सुटत नाही,
३. चंद्रग्रहणाचा एक प्रकार जेव्हा चंद्र पूर्णपणे झाकला जात नाही आणि त्याची पृथ्वीवर काळी सावलीदेखील पडत नाही,
४. जिचे अवयव सुंदर आणि रेखीव आहेत अशी,
५. डौल, उसने अवसान,
६. गावातील मानकरी, गाव जमीनजुमला इनाम मिळालेला,
९. गाढव किंवा घासण्याचा कागद,
१२. लवण, खारट पदार्थ,
१४. समुद्राच्या लाटांचा आवाज,
१५. तुळशीचा वगैरे तुरा, शिरोभूषण,
१७. नकली दंतपंक्ती,
१८. श्रीगणेशा, प्रारंभ,
२१. सर्द, ओलसर,
२२. तिन्हीसांजेची उजळणी,
२३. नापसंती, थोडा विरोध करणे,
२५. लांबलचक, कंटाळवाणे भाषण,
२८. पदार्थ करण्याची किंवा अन्न शिजवण्याची क्रिया,
३१. बाजूबंद, स्त्रियांचा दंडात घालण्याचा दागिना