शब्दकोडे क्र. 15

किशोर देवधर
सोमवार, 24 जानेवारी 2022

शब्दकोडे क्र. 15

उभे शब्द
१.     रस्त्यावर अडवून लुटण्याचा धंदा, 
२.     राजीनामा, 
३.     काव, तांबडी माती, 
४.     उभा दावा, फार जुने कट्टर शत्रुत्व, 
५.     महत्त्वाची जबाबदारी, अग्रभाग, 
७.     कपड्याला आतून लावलेले कापड, 
८.     संगीतातील सातवा स्वर किंवा कोळी, पारधी जमात, 
९.     बोटाच्या टोकाला होणारा एक विकार, 
१०.     नाटकातील भरतवाक्य, शेवटचा भाग, 
११.     अजिबात, थोडेदेखील, 
१५.     या घरात एकावेळी एकच तलवार राहते, 
१६.     योगी, तपस्वी, 
१७.     प्राशन करण्याचे पवित्र जल, 
१८.     श्वास रोखून धरून निपचित पडून राहण्याचे आसन, 
१९.     पाहताच कलीजा खलास होणारी मुलगी, 
२०.     गप, अफवा, 
२३.     जबरी चोरी, दरोडा, 
२५.     लहान मुलांचे लोंबते कर्णभूषण

आडवे शब्द
१.     कामात काम साधून घेणे किंवा चलती आहे तोवर आपला मतलब साधून घेणे या अर्थाचा वाक्प्रचार, 
६.     सत्कारमूर्तीचा गौरव करताना त्याच्या स्तुतिपर लेख, 
७.     नियमबाह्य, बेकायदा, 
९.     तिरपी धार असलेला शस्त्रक्रियेचा चाकू, 
१०.     उजाडण्याची वेळ, प्रभात, 
१२.     चारही पायांवर, घोडे असे उधळते, 
१३.     हिंस्र जनावर, 
१४.     वेचक, ठेवणीतला, 
१६.     पेशवाईतील सखारामबापू बोकील, विठ्ठल सुंदर, देवाजीपंत चोरघडे आणि नाना फडणवीस यांचे संबोधन, 
१९.     अगदी लहान मुलालाही समजेल इतके सोपे, 
२१.     तलवारीचा घाव किंवा आठवड्यातील दिवस, 
२२.     तगादा, मागणीचा आग्रह, 
२४.     पूर्वीचे साधारणपणे दोन मैलाइतके परिमाण, 
२६.     सिंहिणीचा बछडा, 
२७.     तिरळा, चकणा, 
२८.     उंटाच्या नाकाला बांधलेली दोरी

संबंधित बातम्या