शब्दकोडे १६
शब्दकोडे १६
आडवे शब्द :
१. भा. रा. तांबे यांच्या ‘मधु मागशि माझ्या...’ या कवितेत उल्लेख असलेले पांढरे बिनवासाचे फूल,
३. कुंपणाचे लोखंडी किंवा लाकडी मोठे दार,
५. कबुतर व पारवा यांच्याशी साम्य असलेला एक पक्षी,
७. चलाख, सहजपणे हाती न सापडणारा,
९. रोगप्रतिबंधक औषध,
११. धातूचा तक्ता, याचे छप्पर करतात,
१२. यांत्रिक साधन,
१३. तांब्याचे संयुग जे विषारी असते,
१४. पायऱ्या असलेली मोठी विहीर,
१५. किरण किंवा लगाम,
१६. फळफळावळ,
१७. बैलांचा म्होरक्या,
१८. बुद्धिहीन, ठोंब्या,
१९. पाऊल किंवा अधिकाराची जागा,
२१. चिक्कार, पुष्कळ,
२४. छताजवळची अडचणीची जागा,
२६. ज्योतिषातील एक मुहूर्त, आयता मिळालेला मोठा खजिना,
२७. मधुर पाणी असलेला कोवळा नारळ,
२९. डावा किंवा प्रतिकूल,
३०. खोगिरावरील गादी किंवा कमरेजवळ पडणारी घडी,
३१. भानामतीचा एक प्रकार,
३२. वर्तुळाचा मध्यबिंदू आणि त्या वर्तुळाच्या परिघावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी सरळ रेषा
उभे शब्द :
१. पेरलेल्या जमिनीतील तण काढण्याचे काम, खुरपणी,
२. हाताचा अंगठा आणि तर्जनी ताणून होणारे अंतर,
३. नांगराच्या टोकाचे लोखंडी पाते,
४. केस काळे करण्याचा द्राव,
६. लांब साखळी असलेला दीप,
८. पावलांचा आवाज,
१०. फणसाची एक जात,
१२. पोटात अन्न ग्रहण करण्याची क्रिया, जेवण म्हणजे असे नसते तर ते एक यज्ञकर्म असते,
१३. स्त्रियांचा नाकात घालण्याचा एक अलंकार,
१४. पोथी गुंडाळून ठेवण्याचे वस्त्र,
१६. शरीरातील चरबी,
१९. नौबत, डंका,
२०. टरफलासहित तांदूळ,
२२. फुटाणे, चुरमुरे यांसारखे भाजके पदार्थ करणारा,
२३. बाल्यावस्था, बालपण,
२४. बोटात घालण्याचे सोन्याचे कडे,
२५. एक तोंडीलावणे किंवा गरम स्पर्श,
२८. साद, पुकारा,
२९. नियमित तीर्थयात्रा