शब्दकोडे १७
शब्दकोडे १७
आडवे शब्द :
१. कलंक लागण्याजोगे,
४. भोवतालची परिस्थिती, वातावरण,
६. मेव्हणा, बायकोचा भाऊ,
८. धावत्या किंवा उडत्या गोष्टीचा नेम साधणारा,
१२. क्षार, खारट पदार्थ,
१३. वरपक्षाकडील पाहुण्यांच्या उतरण्याची जागा,
१५. गायन आणि वादन यांचा ताळमेळ,
१७. गंमत, मजा,
१८. क्रांतिवृत्ताच्या सत्तावीस भागांपैकी प्रत्येक, यासारखे रूप असावे पण हे हातावर मात्र पडू नये,
१९. लेखी डावपेचाने गळा कापणारा,
२३. उपमर्द, अवमान,
२६. शरीराची प्रमाणबद्धता, सौंदर्य,
२८. सह्याद्री पर्वतराजीतील एक आदिवासी जमात,
२९. समुद्राच्या भरतीचे पाणी जेथवर जाते तेथवरचा नदीचा भाग,
३०. निषेधार्थ किंवा शोक प्रदर्शनार्थ पाळलेला बंद,
३१. वऱ्याचे तांदूळ
उभे शब्द :
१. कुत्र्यासारखा शेपूट हलवत केलेला लाळघोटेपणा,
२. विड्याच्या पानाची लता,
३. स्थिती किंवा वस्त्राच्या टोकाची सुते,
४. साखरेचा द्राव,
५. कोंडा,
७. वशिला, संधान,
९. मासे पकडणारा कोळी,
१०. समर्थाघरच्या या कुत्र्यालाही सर्व मान देतात,
११. मुष्टिप्रहार, गुद्दा,
१३. सतरंजी, बैठक,
१४. प्रदक्षिणा, फेरी,
१६. कर्नाटकामधील एक लोककलेचा प्रकार ज्यावरूनच मराठी संगीत नाटकांचा प्रारंभ झाला,
१७. इस्लामी धर्मशिक्षक,
२०. धाकटा, सर्वात लहान,
२१. त्वेष, स्पर्धा,
२२. बीजकोश किंवा भजे,
२३. एकार देणारी अक्षरावरची तिरपी रेघ किंवा औषधाचे प्रमाण,
२४. लहान कट्यार,
२५. आडमुठा, याच्या कपाळी काठी मारावी लागते,
२६. सुवास, केशर,
२७. गुदाम, माल साठवण्याची जागा ००००००