शब्दकोडे २०

किशोर देवधर
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022

शब्दकोडे २०

आडवे शब्द : 
१.     षडानन, कार्तिकस्वामी, 
४.     छत्रपती शिवाजी महाराज घालत तसा डोक्याचे रक्षण करणारा मुकुट, 
७.    शोध, सुगावा किंवा कापड विणण्याचे यंत्र, 
९.     घाबरणे, मागे पुढे पाहणे, 
१०.     पाऊल किंवा अधिकाराची जागा, 
१२.     अनुशासन, 
१४.     अवनी, पृथ्वी, 
१६.     युद्धातील नौबत, 
१९.     जेवणापूर्वी ताटाच्या बाजूला काढून     ठेवलेले लहान घास, 
२१.     जमिनीची नोंद असलेला सरकारी उतारा, 
२४.     इतर खर्चासाठी पगाराव्यतिरिक्त     मिळणारी रक्कम किंवा सुकी भेळ, 
२५.     खोकल्याची उबळ पण बाईचा असेल तर मात्र तोरा, 
२७.     स्त्रियांच्या कर्णभूषणाचा एक प्रकार किंवा चिकट रस असलेले एक फळ, 
२९.     भोजनापूर्वी किंवा नंतर केलेले आचमन, 
३०.     स्त्रियांचे मकर संक्रांतीचे हळदीकुंकू, 
३२.     हा मोठा दगड कुणी सुखासुखी आपल्या पायावर पाडून घेत नाही, 
३३.     मासे पकडणारा कोळी किंवा पालखी वाहणारा

उभे शब्द : 
१.     वार्ता अशी होणे म्हणजे सर्वांच्या कानावर पडणे, 
२.     आजोबांचे आजोबा, 
३.     अस्थमा, 
५.     नर्मदा नदीचे एक संबोधन, 
६.     प्रभावाखाली दबलेला, हरलेला, 
८.     अफवा, बोलवा, 
११.     दहिवर, पहाटे पानाफुलांवर दिसणारे जलबिंदू, 
१२.     शिजवण्याचे धान्य, 
१३.     पंडिता, विद्वान स्त्री, 
१५.     जिचे डोळे सुंदर आहेत अशी, 
१७.     हिममानव, 
१८.     दान टाकण्याचा ठोकळा, 
१९.     सर्वात वेगाने धावणारा प्राणी, 
२०.     जरब, धाक, 
२२.     कडीपाट, लाकडी फळ्यांचे छत, 
२३.     निबर, खरखरीत, 
२४.     निर्जन, उजाड, 
२६.     कितीही रंग बदलले तरी या प्राण्याची धाव कुंपणापर्यंतच, 
२७.     जीवनातील दुःख, 
२८.     उबदार मुलायम पांघरूण, 
३१.     एक अप्सरा किंवा केळीचा गाभा

संबंधित बातम्या