शब्दकोडे २०
शब्दकोडे २०
आडवे शब्द :
१. निष्कारण लावण्यात येणारा बट्टा,
५. हा बांधणे म्हणजे प्रतिज्ञा, निर्धार,
७. पाणथळ, चिखलाची जागा,
१०. नक्षीदार ताट,
११. कुंभ, घडा,
१२. पुष्प, फूल,
१४. क्रमिक पुस्तकातील पाठ, शिकवण,
१५. हत्तीचे तोंड असलेला गणपती,
१८. चांगले पीक आल्यानंतरचे आनंदी दिवस,
१९. नाजूक, चंचल,
२०. मऊ, सौम्य, मवाळ,
२१. जन्माच्यावेळी पोटाजवळ चिकटलेले चर्मतंतू,
२२. शेतीवरील कर,
२४. ज्योतिषात यांची संख्या बारा आहे किंवा ढीग,
२६. उपवन, बाग,
२८. काकडीची मोठ्या आकाराची जात,
२९. अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ आणि समारोप या गणपतीच्या दर्शनाने होतो,
३१. पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारे मंडळ जे १८९२पासून सुरू झाले
उभे शब्द :
१. अल्प, मोजके,
२. थेऊरचे प्राचीन नाव,
३. शरीरयष्टी किंवा सोवळ्याचे वस्त्र, मुकटा,
४. हर्ष, आनंद,
६. संस्कृतमध्ये मुद्गल पुराण प्रकाशित करणारे कर्नाटकाच्या केंपवाड येथील गणेशभक्त संत,
८. गायन आणि वादन यांचा ताळमेळ,
९. तगादा, मागणीचा आग्रह,
१०. अंधार, काळोख,
१२. पीयूष, अमृत,
१३. धान्य साठवण्याचे तळघर,
१४. द्रव्य, पैसा,
१६. संगीताची मैफल,
१७. सतर्क, सावध,
१८. ईश्वर, देव,
१९. बूड, खालचा भाग किंवा छावणी,
२०. शीर, धमनी,
२१. वळणावळणाचे,
२३. पोपट किंवा दळलेली हळद,
२४. पौर्णिमा,
२५. नाशवंत, नष्ट होणारे,
२७. अनेक दिवस चांगले राहणारे, भक्कम,
३०. ऊस असा वाकडा असला तरी रस गोडच असतो