शब्दकोडे २१
शब्दकोडे
आडवे शब्द :
१. खेळातील नाणेफेक, छापकाटा,
३. कातडे घोटण्याचे हत्यार किंवा कचका, झपाटा,
५. अत्तराचा बोळा,
८. आस्तित्वाची खोटी जाणीव किंवा एक प्राचीन संस्कृत नाटककार,
१०. फौजेबरोबर असणारी अनावश्यक माणसे,
११. पूर्वीच्या राजेरजवाड्यांचा शिकारीचा खेळ,
१२. संतप्त, रागावलेला,
१३. तीन रस्ते मिळण्याची जागा,
१४. दर्दी, माहितगार,
१७. केळीचे संपूर्ण पान,
१८. तादात्म्य, तल्लीन,
२१. वधूबरोबर देण्याच्या वस्तूंचे लग्नाच्यावेळी मांडलेले प्रदर्शन,
२४. पाय किंवा पंख ज्याचा कावळा करतात,
२५. नेमका कोणता निर्णय घ्यावा याच्या संभ्रमात पडणे,
२७. मालमत्ता ताब्यात घेण्याचा न्यायालयाचा आदेश, टांच आणणे,
२८. सोपा, ओसरी,
२९. पालखी, डोलीसारखे एक वाहन,
३०. चिंच कुस्करलेले पाणी,
३१. विहिरीतून पाणी काढण्याचे बैल जुंपलेले साधन,
३२. आनंदाने ओरडणे, जयजयकार
उभे शब्द :
१. नुकत्याच प्रसूत झालेल्या स्त्रीचे एक विशेषण,
२. पाककलेत कुशल किंवा सुंदर घरटे विणणारा एक पक्षी,
४. आतील महत्त्वाचा भाग,
६. येरझाऱ्या, त्रास,
७. बांगड्यांचा आवाज,
९. विपुल, मुबलक,
१२. निर्दय, खुनशी,
१४. सावध, दक्ष,
१५. शिंपल्यातील प्राणी,
१६. भेसूर, कुरूप,
१९. प्रांत, टापू,
२०. खुबी, रहस्य,
२२. प्रयत्न, धडपड,
२३. सोय, व्यवस्था,
२५. सावकार, कर्ज देणारा,
२६. हळू, मंदगती,
२९. बारा राशींपैकी मेंढा चिन्ह असणारी रास