शब्दकोडे २६

किशोर देवधर
सोमवार, 11 एप्रिल 2022

एंटरटेनमेंट    

आडवे शब्द : 
१.    कसेबसे हळू, मंदगतीने चाललेले काम, 
३.     एक प्रकारची तोफ किंवा बंदूक, 
६.     बायकोचा भाऊ, मेव्हणा, 
७.     डावा किंवा प्रतिकूल, 
८.     बंदिशाळा, तुरुंग, 
१०.     संशय, आरोप, 
११.     नस, धमनी, 
१२.     खड्ग, तलवार, 
१३.     पितरांना अर्पण करण्याचा भाताचा गोळा, 
१५.     झाडाच्या बुंध्यातील पोकळी, 
१६.     लुगड्याच्या निऱ्‍यांचा उंचवटा जो अंगापेक्षा मोठा नसावा, 
१७.     काहींना सुपारीच्या या तुकड्याचेही व्यसन नसते, 
१८.     अतिशोयक्तीच्या गप्पा, 
२०.     गाई म्हशीचे आंचळ, 
२३.     कुणकुण, बातमी कानावर येणे, 
२४.     ग्लानी, थकवा, 
२६.     कारखान्याची चिमणी, 
२८.     रेतीवरील रेषा किंवा फाशांवरून शकुन पाहण्याची विद्या, 
३०.     दालन, विभाग, 
३२.     सावकाश, थांबून, 
३५.     सोडमुंज 

उभे शब्द : 
१.     बिघ्याहून लहान असे जमीन मोजण्याचे एक जुने परिमाण, 
२.     असा मार्ग म्हणजे जमिनीवरून जाणारा, 
३.     लेखणी किंवा घटनेतील भाग, 
४.     टपाल, पत्रे, 
५.     पलंग विणण्याची सुती पट्टी, 
६.     स्वतः काव्यरचना करून गाणारा, पोवाडे म्हणणारा, 
९.     कृष्णाचे गोपींबरोबरचे नृत्य, 
१०.     व्रताचे आचरण करणारी, 
११.     नौकेचे कापडी अवजार, 
१३.     मुलींचा गोलगोल फिरण्याचा एक खेळ, 
१४.     हत्तीचे डोके, 
१६.     बीजकोष किंवा भजे, 
१९.     दगड माती ओढण्याचे साधन, खोरे, काहीजण याने पैसेही ओढतात, 
२०.     दिडदा दिडदा आवाज काढणारे एक तंतुवाद्य, 
२१.     लवण, खारट पदार्थ, 
२२.     अस्पष्ट, धूसर, 
२४.     पडक्या घराचे सामान, 
२५.     अष्टसिध्दींपैकी एक ज्यामुळे आपल्या शरीराला महाकाय आकार देता येतो, 
२७.     असुर, दैत्य, असा विवाह म्हणजे जबरदस्तीने केलेला, 
२९.     कामदेव, 
३१.     थांग, जलाशयाची खोली, 
३३.     कागद मोजण्याचे एक परिमाण किंवा बंदुकीचा मागचा भाग, 
३४.     दोरा ओवण्याचे सुईचे भोक
                          ००००००

संबंधित बातम्या