शब्दकोडे क्र. २७ 

किशोर देवधर
सोमवार, 18 एप्रिल 2022

शब्दकोडे क्र. २७ 

उभे शब्द
१.     घाईगर्दीत बिघडवलेले काम, 
२.     जरब, धाक, 
३.     बर्फाळ प्रदेशात आढळणारा केसाळ प्राणी, 
५.     चव कळणारे इंद्रिय, जीभ, 
६.     अज्ञातवासात असताना अर्जुनाने घेतलेले रूप, 
८.     सुंदर स्त्री, 
११.     वशिला, संधान, 
१३.     संन्यासी, विरक्त, 
१५.     निष्ठावंत उपासक, 
१६.     खांद्याचा गोल, 
१७.     पूल, 
१८.     जीव, आत्मा, 
१९.     मुंगूस किंवा पाच पांडवांपैकी चौथा, 
२०.     केळीच्या घडांचा ढीग, 
२२.     ही चालत्या गाडीला किंवा कामाला घालून ते थांबवतात, 
२४.     खरेदी,  
२५.     विड्याची पाने तोडण्याचे वाकडे हत्यार, 
२७.     बायकोच्या बहिणीचा नवरा, 
२८.     प्रयोगशाळेतील एक उपकरण, नाळके, 
२९.     ठिसूळ दगड किंवा तारुण्यपीटिका, 
३१.     जन्मपत्रिका, 
३३.     नाशवंत, नष्ट होणारे, 
३५.     तलवारीचा घाव किंवा आठवड्यातील दिवस

आडवे शब्द 
१.     पदर पसरणे, काकुळतीची विनंती, 
४.     रंग किंवा माणसापेक्षा दसपट असलेले कपड्याचे तेज, 
७.     दिशाभूल किंवा हंसाच्या जातीचा एक पक्षी, 
९.     दोन देशांमधील सीमा, 
१०.     अंड्यातील पिवळा भाग, 
१२.     पत्रातील प्रारंभीचा मजकूर, 
१४.     तबल्याचा जोडीदार, 
१६.     फेटा, पागोटे, 
१८.     प्रारब्ध, दैव, 
२०.     जोराने वाहणारा पाण्याचा मोठा प्रवाह किंवा खूप मोठ्या प्रमाणावर माणसे, 
२१.     दाक्षायणी किंवा दक्षिणेकडचा वारा, 
२३.     मृग, हरण किंवा दोन पाती असलेले कापण्याचे एक हत्यार, 
२५.     हा सापडला म्हणून कुणी घोडा आणत नाही, 
२६.     धातूची मात्रा किंवा एक शास्त्र, 
३०.     हा धरला तर संयम आणि दिला तर आधार, 
३२.     नीरस, कोरडे, 
३४.     संन्याशाचे जलपात्र, 
३५.     घराबरोबर फिरणारा मोठा खांब, 
३६.     हिरव्या रंगाचे रत्न, पाचू, 
३७.     तिळासारखे काळ्या रंगाचे बी ज्याची चटणी लोकाप्रिय आहे.

संबंधित बातम्या