शब्दकोडे ३२
शब्दकोडे ३२
आडवे शब्द :
१. सर्व दिशा जिंकणारा, जगज्जेता,
३. पखालीने पाणी भरणारा पाणक्या,
५. नेत्र, डोळे,
६. नदीचा प्रारंभ,
८. झंझावात, वावटळ,
९. बग्गी, घोडागाडी,
१०. दोन बोटांचे माप,
१२. एक वृत्त किंवा चवरी,
१३. अर्धी ओंजळ,
१६. ओंडका टाकून तात्पुरता उभारलेला पूल,
१८. उडणाऱ्या वा धावणाऱ्या गोष्टीचा नेम साधणारा,
१९. हा कुणाचा कुणाच्या पायात नसणे म्हणजे सावळा गोंधळ,
२१. अंतर्भाव, सामील केलेले,
२३. स्वैर. अमर्याद,
२४. सुशिक्षित, नम्र,
२५. रस्त्यावर प्राण्यांचे खेळ, जादूचे प्रयोग करणारा,
२७. खेळातील सोंगटी,
२८. धुंद करणारी तरुणी
उभे शब्द :
१. रोजनिशी,
२. एकत्रित करणे, गोळा करणे,
३. बौद्ध मठाधीश,
४. घोटाळ्याचा प्रश्न किंवा हातोडीने ठोके वाजवण्याचे घड्याळ,
५. एकमेकांवर रचलेल्या वस्तू,
६. शानदार, चांगला,
७. वात्सल्य, प्रेम,
११. धान्य पाखडण्याचे हे साधन वाजले की सोहळ्याची सांगता होते,
१२. नोकरीपेशाचा माणूस,
१४. सुस्वभावी, प्रामाणिक,
१५. एखाद्या घटनेने प्रक्षोभक वातावरण निर्माण होऊ शकतो असा भाग,
१७. स्मृती, आठवण,
१९. बंधन, फास,
२०. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा हा पालनकर्ता नाही,
२१. सूर्याचे एक नाव,
२२. कामाचा मोबदला, पगार,
२५. हत्तीच्या गंडस्थळातून स्रवणारा रस,
२६. कागद मोजण्याचे एक परिमाण