शब्दकोडे ३७
शब्दकोडे ३७
आडवे शब्द :
१. काम, क्रोध वगैरे माणसाचे सहा शत्रू,
४. कुंपणाचे लाकडी किंवा लोखंडी मोठे दार,
६. बेपर्वा, बेफिकीर,
८. धुरा, जोखीम,
११. तमाशाचा संच किंवा कुस्त्यांचे सामने,
१२. ढाक्याचे प्रसिद्ध तलम कापड,
१४. पिंपांना लाकडी फळ्या बांधून केलेले तरंगण्याचे साधन,
१६. दमलेला, थकलेला,
१८. आच्छादन, वेढणे,
१९. भूषणावह,
२०. या मोहरीचा पर्वत करतात,
२१. फणसातील फळ,
२३. किल्ली किंवा वेदनेची चमक,
२५. तात्पयार्थ किंवा कालवणाचा एक प्रकार,
२६. निःसत्त्व, बेचव पाणी,
२७. महाभारतातील सैन्याची एक विशिष्ट रचना,
२८. वाळवलेल्या या आल्यावाचून खोकला गेला तर उत्तमच,
२९. छतावर घालण्याचा धातूचा पातळ तक्ता,
३०. वरच्या मजल्यावरची पडवी, बाल्कनी
उभे शब्द :
१. संगीतातील पहिला स्वर,
२. घोड्यावर स्वार होतांना पाय अडकवण्याचे कडे,
३. घाम, घर्मबिंदू,
४. जेवणाला खाडा, उपवास,
५. फोलपट, साल,
६. कढवलेले लोणी गाळून राहिलेला भाग,
७. पूर्वीचे एक अर्ध्या शेराइतके वजन,
९. बढाईखोर, प्रौढी मिरवणारा,
१०. गुलामगिरी,
१२. जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रकार,
१३. कापडाचा एक अतिशय मुलायम प्रकार,
१४. घालमेल, जीव वरखाली होणे,
१५. बरगडीची हाडे,
१७. घोड्याची देखभाल करणारा,
२०. एक अत्यंत ज्वालाग्राही पदार्थ,
२२. हिंग,
२३. जनावरांचा समूह,
२४. उज्जैनचा राजा किंवा उच्चांक,
२५. शौर्य, पराक्रम
००००००