शब्दकोडे क्र. ४०
शब्दकोडे
उभे शब्द
१. तंतू, धागा,
२. एक पालेभाजी,
३. नखे कापण्याचे एक हत्यार,
४. खोटाखोटा, वरवरचा,
५. गोड बोलून कारस्थान करणे,
८. दिसली तर रस्ता पण लागली तर सत्यानाश,
१०. लाकडाच्या चकत्या चेंडूने पाडून त्या पुन्हा एकमेकांवर रचण्याचा खेळ,
११. हा देणे म्हणजे उचलबांगडी,
१२. भन्नाट,
१४. कोयत्यासारखे एक हत्यार,
१६. पोते, मोठी पिशवी,
१७. नकली, कृत्रिम,
१८. वार्धक्य, म्हातारपण,
२०. रजत, चांदी,
२२. पूर्वी सणासुदीला मोलकरणीला देण्यात येणारे जेवणाचे ताट,
२४. बेतास बेत, जमा आणि खर्च यांची तोंडमिळवणी,
२५. कृपण, कंजूष,
२६. बोचणी, मनातील दुःख,
३०. विष्णूचे एक नाव,
३१. माशाचा एक लोकप्रिय प्रकार,
३३. घडा, कलश
आडवे शब्द
१. लाल रंगाचे सुगंधी औषधी लाकूड,
४. फार मोठा फायदा,
६. कणखर, मजबूत,
७. पादत्राणाशिवाय, उघड्या पायाने,
९. गोजी, पाडी,
१३. कपाळावर गालावर येणारे डोक्याचे केस,
१५. स्थानकावरील गाड्या लागण्याची जागा,
१६. सरसकट, सारांश,
१९. पश्चिम दिशा किंवा मदिरा,
२१. पोपट किंवा दळलेली हळद,
२३. हातावर देऊन पलायन करण्याची डाळ,
२५. ओंगळ, किळसवाणे,
२७. मुस्लिमांची प्रार्थना,
२८. अनेक पाय असलेला कीटक किंवा रहस्य,
२९. एक भटकी जमात,
३२. दौतीत बुडवून लिहिण्याची लेखणी,
३४. खूप गर्दी,
३५. घोड्याच्या पाठीवर पांघरण्याची जाळीदार झालर