शब्दकोडे १३

किशोर देवधर
सोमवार, 10 जानेवारी 2022

शब्दकोडे १३

आडवे शब्द : 
१.     मोठ्या मनाचा, 
५.     अर्धी ओंजळ, 
७.     हा देणे म्हणजे उचलबांगडी, 
८.     दुसरे लग्न करणारी, 
१०.     दर्भ, गवत किंवा रामाच्या एका मुलाचे नाव, 
११.     पूर्ण भरतीची वेळ किंवा संवत्सर, 
१२.     कोल्ह्याच्या जातीचा हिंस्र पशू, 
१४.     भानामतीचा एक प्रकार, 
१५.     प्रांत, सुभा, 
१७.     गुप्त चर्चा, 
२१.     घाईघाईने फिरवलेली नजर, 
२३.     धान्यातील खडे किंवा तबल्याची वादी, 
२४.     जुन्या धर्मरुढींना चिकटून राहणारा, सनातनी, 
२६.     तेजस्वी, पराक्रमी, 
२८.     गोंगाट, मोठा आवाज

उभे शब्द : 
१.     आकाशातून पडणारे तारे, 
२.     कौमार्याचा बहर किंवा ताप चढण्यापूर्वी अंगावर येणारे शहारे, 
३.     दोन बोटांचे माप, 
४.     वाजवीपेक्षा हुशार म्हणजेच मूर्ख, 
६.     हत्ती रिंगणात सोडून खेळला जाणारा पूर्वीचा एक खेळ, 
९.     फोलपट, साल, 
११.     ज्ञानेश्वरांनी ही संजीवन घेतली होती किंवा प्रेत दहनाच्या जागी उभारलेले तुळशी वृंदावन, 
१३.     वेडे चाळे, लोक नावे ठेवतील असे वागणे, 
१५.     बाजारातील इभ्रत, 
१६.     उमाळा, कंठ दाटून येणे, 
१७.     भारतीय मोजमापन पद्धतीनुसार एकावर दहा शून्ये ही संख्या, दहा अब्ज, 
१८.     अपुरा किंवा न वाजणारा, 
१९.     उघड्या पायाने, पादत्राणाशिवाय, 
२०.     अस्वस्थ, चंचल, 
२१.     साशंकता, मनात वाटणारी थोडी भीती, 
२२.     विष्णूचा एक अवतार, कासव, 
२४.     पतंगाच्या काड्यांना विशिष्ट प्रकारे बांधलेला दोरा, 
२५.     फसव्या, लबाड, 
२६. नहर, कालवा किंवा जमिनीवर बसण्याचे लाकडी आसन, 
२७. पत्नी, बायको

संबंधित बातम्या