करंट अफेअर्स
गुरुवार, 8 मार्च 2018
राष्ट्रीय
अस्मिता योजनेला हिरवा कंदील
राष्ट्रीय
अस्मिता योजनेला हिरवा कंदील
- राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अस्मिता योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
- या योजनेनुसार ग्रामीण भागातील शाळकरी मुली व महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन्स मिळणार आहेत.
- येत्या आठ मार्चपासून महिलादिनाचे निमित्त साधत सुरू होणारी ही योजना ग्रामविकास खात्याच्या उमेद अभियानामार्फत चालवली जाणार आहे.
- शाळकरी मुलींचे आरोग्य राखत त्यांच्या शाळेतल्या उपस्थितीत सातत्य राखणे हा या योजनेचा हेतू आहे.
आयएनएस करंज
- स्कॉर्पियन श्रेणीतील ‘आयएनएस करंज‘ तिसऱ्या पाणबुडीची जलावतरण चाचणी माझगाव डॉक येथे यशस्वीरीत्या घेण्यात आली.
- १५६५ टन वजनाच्या या पाणबुडीत अधिक काळ पाण्याखाली राहण्याच्या दृष्टीने ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था करण्यात आली आहे.
- टोर्पीडो आणि ॲण्टीशिप क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असणाऱ्या आयएनएस करंजेस पाण्याखालून जमिनीवर देखील मारा करणे शक्य आहे.
- ’मेक इन इंडिया’अंतर्गत फ्रान्सच्या मदतीने स्कॉर्पियन श्रेणीतील संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ६ पाणबुड्यांच्या निर्मितीचा ‘प्रकल्प ७५‘ मागील वर्षी सुरू झाला.
- आयएनएस करंज पूर्वी माझगाव डॉक येथील कारखान्यातच आयएनएस कलवरी आणि आयएनएस खांदेरी यांची निर्मिती
- व जलावतरण चाचणी झाली असून काहीच दिवसांपूर्वी आयएनएस कलवरी ही भारतीय नौसेनेच्या ताफ्यात दाखलही झाली.
- सर्व ६ पाणबुड्यांची २०२० पर्यंत निर्मिती करून त्या भारतीय नौदलात सामील करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
थार लिंक एक्स्प्रेस अजून तीन वर्षे
- पाकिस्तानच्या विनंतीवरून भारताने भारत व पाकिस्तान यांना जोडणाऱ्या ’थार लिंक एक्सप्रेसला’ तीन वर्षांची मुदतवाढ दिली असून त्यानुसार ३१ जानेवारी २०२१ पर्यंत ही एक्स्प्रेस गाडी चालू राहील.
- भारत व पाकिस्तानमधील लोकसंबंध सुधारण्यासाठी २००६ मध्ये झालेल्या करारानुसार भारताकडून सुरू करण्यात आलेल्या या एक्सप्रेसची १ फेब्रुवारी २०१८ रोजी मुदत संपत होती.
- ही गाडी आठवड्यातून एकदा दर शनिवारी भारतातील राजस्थान राज्यातील बारमेर जिल्ह्यातील ’मुनाबावो’ या ठिकाणापासून पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील ‘खोकारापार‘ या ठिकाणापर्यंत धावते.
- भारत पाकिस्तानमधील हा सर्वांत सुलभ व स्वस्त मार्ग आणि एकमेव रेल्वेमार्ग असून याची निर्मिती ब्रिटिशांनी केली.
- राजस्थानी वाळवंटातील राणी म्हणून ओळखली जाणारी ही एक्स्प्रेस १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर बंद करण्यात आली होती. ती २००६ च्या करारानुसार पुन्हा सुरू करण्यात आली.
प्रजासत्ताक दिन सोहळा
- ‘आसियान‘च्या १० राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षांना ६९ व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
- आसियान या आग्नेय आशियायी राष्ट्रसंघटनेच्या स्थापनेस ५०
- वर्षे तर भारत-आसियान संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत त्यांना हा बहुमान देण्यात आला.
- मोटरसायकलस्वार ‘सीमा भवानी‘ या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचालानातील मुख्य आकर्षण ठरल्या.
पारितोषिक विजेते चित्ररथ :
प्रथम क्रमांक महाराष्ट्र शिवराज्याभिषेकाचा देखावा
द्वितीय क्रमांक आसाम सत्रस सणाचा देखावा
तृतीय क्रमांक छत्तीसगड कालिदासाच्या मेघदूतावर नृत्य देखावा
विज्ञान-तंत्रज्ञान
‘मिहीर’ संगणक
- उत्तरप्रदेशातील नोईडा येथील national सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टीग येथे ‘मिहीर‘ या महासंगणकाचे (High Performance Computer) उद्घाटन करण्यात आले.
- क्षमता आणि कार्यशिलतेच्या दृष्टीने मिहीर आजवरचा सर्वांत अधिक वेगवान महासंगणक ठरणार असून देशातील ५०० महासंगणक सुविधांच्या यादीतील भारताचे स्थान ३६८ व्या स्थानावरून ३०व्या स्थानावर पोहोचणार आहे.
- हवामान अंदाज सुविधेमध्ये हा भारतीय महासंगणक जागतिक पातळीवर जपान, इंग्लंड आणि अमेरिकेनंतर चौथ्या स्थानी असेल.
- हवामानाच्या कमाल व किमानतेच्या पातळीबद्दल माहिती, चक्रीवादळे आणि मान्सूनबद्दल अतिसूक्ष्म आणि अचूक अंदाज, वातावरणाच्या गुणवत्तेचे परीक्षण करणे ही कामे ‘मिहीर‘मार्फत केली जाणार आहेत.
आंतरराष्ट्रीय
भारत-व्हिएतनाम संयुक्त लष्करी सराव
- संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतील समन्वयाच्या सरावासाठी भारताकडून एक संयुक्त लष्करी सराव मध्यप्रदेशातील जबलपूर येथे २९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
- २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी अशा या सहा दिवसांच्या संयुक्त लष्करी सरावाला VINBAX असे नाव देण्यात आले असून भारत आणि व्हिएतनाम मध्ये संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- सदर सरावासाठी भारतीय भूदल आणि व्हिएतनामी पीपल्स आर्मीमधून प्रत्येकी १५ अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती.
- दक्षिण चीनी समुद्र विभागातील चीनचा वाढता साम्राज्यवाद लक्षात घेता भारताने आपले व्हिएतनामशी असणारे संबंध सामरिक पातळीवरही दृढ करावेत या उद्देशाने हा सराव घेण्यात आला आहे.
- भारत-व्हिएतनाम सामरिक सहकार्य संबंधांना १९९४ मध्ये सुरवात झाली त्यानंतर , २००७ आणि २००९ अशा वेळोवेळी हे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न झाले आहेत.
अर्थसंकल्प २०१८
- अडीच हजार दशकोटी (ट्रीलियन) डॉलर्ससह भारतीय अर्थव्यवस्था जगात ५व्या स्थानावर.
- गेल्या तीन वर्षांत विविध रचनात्मक बदलांना सक्षमपणे सामोरे गेलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ७.५ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे.
- आगामी काळात व्यवसाय सुलभतेकडून जीवनसुलभतेकडे वाटचाल करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात येणार आहे.
- यावर्षीच्या अर्थसंकल्पात सक्षमीकरणाच्या दृष्टीने विशेष भर देण्यात आलेली क्षेत्रे : १. कृषी, २. शिक्षण, ३. आरोग्यसुविधा ४. पायाभूत सुविधा
कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था
- रब्बी पिकांप्रमाणे आता खरिपाच्याही सर्व पिकांच्या रास्त हमी दरात दीडपटीने वाढ
- देशातील एपीएमसींची कमतरता भरून काढण्यासाठी ‘ग्रामीण हाटांना‘ त्यांचा दर्जा देऊन त्यांचे ‘ग्रामीण शेतकी बाजारात‘त (GrAM) रूपांतर करण्यात येणार त्यांना e-NAMशी जोडण्यात येणार आहे.
- ‘ग्रीन्स‘ मोहीम - सामान्यतः भारतीय आहारात अधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे उत्पादन वाढविण्यात येणार असून सहकारी शेती आणि अन्नप्रक्रिया केंद्रांचा विकास करण्यात येणार आहे.
- ’प्रधानमंत्री कृषी संपदा’ योजनेअंतर्गत ४२ मेगा फूड पार्क्स उभारण्यात येणार आहेत.
- किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या कक्षेत मासेमारी आणि पशुपालनाचा व्यवसाय करणाऱ्यांनाही समाविष्ट करणार असून या दोन्ही व्यवसायांच्या वृद्धीकारिता १० हजार कोटी रुपये निधीची तरतूद.
- बांबू मोहीम : बांबूच्या शेतीत त्याच्या तोडणी प्रक्रियेस सरकारी परवानग्यांची बाधा येऊ नये म्हणून त्या झाडास वृक्षप्रकारातून काढले. (हा नियम केवळ वनक्षेत्राच्या बाहेर उगवलेल्या बांबूला लागू असेल.) आर्थिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या अशा या ‘हिरव्या सोन्या‘च्या लागवडीसाठी १२९० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे.
- हवेच्या प्रदूषणाच्या समस्येने ग्रस्त असणाऱ्या दिल्ली व हरियाना येथील शेतकऱ्यांसाठी विशेष योजनेची तरतूद
- बचत गटांच्या विकासावर भर देण्यात आला असून त्यांना कर्जाच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या निधीत ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.