नोंद ठेवावी असे

सायली काळे 
सोमवार, 31 मे 2021

नोंद ठेवावी असे

आंतरराष्ट्रीय
कोलंबो पोर्ट सिटीला हिरवा कंदील 

 • श्रीलंकेच्या संसदेने गुरुवार, ता. २० मे रोजी चीन पुरस्कृत कोलंबो पोर्ट शहराच्या शासनव्यवस्थेशी निगडित कायद्यांचे एक वादग्रस्त विधेयक मंजूर केले.
 • मूळच्या विधेयकातील कायद्यांमुळे देशाच्या सार्वभौमत्वास चीनकडून धोका संभवत असल्याच्या शेकडो याचिका विरोधक आणि काही नागरी संघटनांकडून आल्या होत्या. त्यानंतर श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यात काही सुधारणा सुचवल्या आणि त्या मान्य करूनच संसदेने हे विधेयक पारित केले आहे.
 • ‘कोलंबो पोर्ट सिटी’चा १.४ अब्ज डॉलर्सचा हा भव्य प्रकल्प राजपक्षे सरकारच्या पहिल्या कार्यकाळात २०१४ साली सुरू करण्यात आला होता.
 • शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर कोलंबोतील कोळीबांधव आणि पर्यावरण कार्यकर्त्यांचा विरोध झुगारून 
 • तेथील प्रसिद्ध किनाऱ्यावर या प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले.
 • सध्याच्या पारित झालेल्या कोलंबो बंदरी शहर आर्थिक महामंडळ विधेयकामुळे देशातील थेट परकीय गुंतवणुकीत वाढ होऊन त्यातून सुमारे १५ अब्ज डॉलर्स एवढ्या रोजगारांची निर्मिती होणार असल्याचे सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे.
 • विरोधकांनी संसदेत युक्तिवाद करताना म्हटले,
 • की हा प्रकल्प म्हणजे श्रीलंकेस मदत केल्याचे दाखवत देशाच्या डोक्यावर कर्ज आणि खर्चीक प्रकल्पाचा आर्थिक बोजा टाक्याचे चीनचे मनसुबे आहेत.

पर्यावरण

‘यास’ चक्रीवादळाचे संभाव्य संकट

 • ‘तौते’ वादळाने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांना झोडपून काढल्यानंतर आता बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याने तयार झालेले ‘यास’ चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकणार आहे.
 • भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू अंदमानातील पोर्ट ब्लेअरच्या वायव्य दिशेस ६०० किलोमीटर, ओडिशाच्या पॅरादीपपासून ५४० किलोमीटरवर तर प. बंगालमधील दिघाच्या दक्षिण व आग्नेय दिशेदरम्यान ६३० किलोमीटरवर आहे.
 • चोवीस तारखेनंतर पुढील ४८ तासांत या वादळाचा वेग आणि तीव्रता वाढत जाऊन २६ तारखेपर्यंत ‘यास’ ओडिशाच्या किनाऱ्यास धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 • या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा साठा करता यावा म्हणून ओडिशा राज्यसरकारने २४ ते २६ मे या कालावधीसाठी कोविडमुळे लागू केलेल्या लॉकडाउनचे नियम शिथिल केले आहेत.
 • सुरुवातीच्या काळात वादळाच्या वाऱ्यांचा वेग ४५ ते ६५ किलोमीटर प्रतितास एवढा होता.
 • वादळाचे स्वरूप लक्षात पूर्व रेल्वेच्या २४ ते २९ मे दरम्यानच्या २५ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे (NDRF) ९५० जवान तैनात केले आहेत, शिवाय २६ हेलिकॉप्टर्स तयार ठेवण्यात आली आहेत.
 • वादळाच्या दृष्टीने सज्जता आणि किनाऱ्यापासून दूर समुद्रात काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची योग्य वेळेत सुरक्षित स्थलांतर यांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २३ मे रोजी एक उच्चस्तरीय बैठकही घेण्यात आली आहे.

आरोग्य

म्युकरमायकोसिस साथीच्या रोगांमध्ये समाविष्ट 

 • कोविडमधून बरे होताना काळ्या बुरशीने होणाऱ्या म्युकरमायकोसिस या रोगाची लागण होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने या रोगाची नोंदणी १८९७च्या साथीच्या रोगांच्या कायद्याअंतर्गत खबरदारीच्या रोगांमध्ये करावी असे देशातील सर्व राज्यांना सुचवले आहे.
 • म्युकरमायकोसिसची तपासणी, निदान आणि उपचार यांसाठी केंद्र सरकार आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) यांनी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे सर्व राज्य सरकारांना आणि खासगी आरोग्य सेवादारांना बंधनकारक असतील.
 • याशिवाय सर्व संभाव्य आणि लागण झालेल्या रुग्णांचे तपशील सरकारी आरोग्य विभागास पुरवणेदेखील बंधनकारक असणार आहे.
 • मधुमेहाचा विकार असणाऱ्या कोविड रुग्णांना असणारा धोका आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या कोविड रुग्णांना स्टेरॉईड वर्गातील औषधांची देण्यात आलेली कमीअधिक मात्रा लक्षात घेता केंद्र सरकारने उपरोक्त बंधने जारी केली आहेत.
 • या संदर्भात केंद्र सरकारने मंगळवार १८ मे रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवले होते आणि त्यानंतर तेलंगणा, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, पंजाब, हरयाणा या राज्यांनी तातडीने पावले उचलली आहेत.

आयसीएमआरकडून प्लाझ्मा उपचार पद्धती रद्द

 • भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (ICMR) कोविड उपचार मार्गदर्शक तत्त्वांमधून प्लाझ्मा उपचार पद्धती वगळली आहे. त्याची परिणामकारकता अतिशय कमी असल्याने हे बदल केले असल्याचे ‘आयसीएमआर’कडून सांगितले जात आहे. 
 • यापूर्वीदेखील २३ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये प्लाझ्मा उपचार पद्धतीला शेवटचे स्थान दिले होते व त्याचा उपयोग केवळ अतिसौम्य संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी अथवा संसर्ग झाल्यापासून पहिल्या सात दिवसांत उपचारांसाठी आलेल्या रुग्णांसाठीच करावा असे सुचवण्यात आले होते.
 • आयसीएमआरच्या राष्ट्रीय कार्य बल आरोग्य मंत्रालयातील तज्ज्ञांच्या संयुक्त विद्यमाने उपचारांशी निगडित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये वेळोवेळी सुधारणा करत असतात. मात्र हे बदल सूचना स्वरूपाचे असल्याने देशातील कोणत्याही रुग्णालय अथवा डॉक्टर यांसाठी ते बंधनकारक नसतात.
 •  आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर अतिशय दुर्मीळ असून या उपचार पद्धतीतून कोरोना विषाणूचे अधिक प्रमाणात उत्परिवर्तन (mutation) होण्याची शक्यता असल्याची चिंता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
 •  सध्याच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सौम्य संसर्गाच्या रुग्णांसाठी हायड्रोक्लोरोक्वीन आणि आयव्हरमार्कटिन या औषधांचा वापर सुरू ठेवावा असे सुचवण्यात आले आहे. मात्र त्यांच्या परिणामकारकतेचे दाखलेसुद्धा कमीच असल्याचे नमूद केले आहे.

सांस्कृतिक

भारतातील युनेस्को प्रमाणित वारसास्थळांमध्ये वाढ

 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने (UNESCO) भारतातील सहा स्थळांचा संभाव्य वारसास्थळांमध्ये समावेश केला असल्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी बुधवार, ता. १९ मे रोजी जाहीर केले. 
 • या सहा स्थळांमध्ये वाराणसीतील गंगा नदीचा घाट, तामिळनाडूतील कांचीपुरम येथील मंदिर, मध्यप्रदेशातील सातपुडा व्याघ्रप्रकल्प, जबलपूर येथील नर्मदेच्या खोऱ्यातील भेडाघाट व लम्हेटाघाट, महाराष्ट्रातील किल्ले आणि कर्नाटकातील हिरे बेंकाल ही मोठ्या खडकांची भूमी यांचा समावेश आहे.
 • या वारसास्थळांच्या यादीसाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाकडून नऊ स्थळांच्या यादीचा अर्ज करण्यात 
 • आला होता, मात्र त्यातील सहा स्थळांची निवड संभाव्य (tentative) स्थळांच्या यादीसाठी करण्यात आली आहे.
 • युनेस्कोच्या वारसाथळांच्या अंतिम यादीत समावेश करण्यापूर्वी कोणत्याही स्थळाचा समावेश हा संभाव्य स्थळांच्या यादीत केला जातो आणि साधारण वर्षभराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून कागदपत्रांची पूर्तता झाल्यास त्यांचा अंतिम यादीत समावेश होतो.
 • उपरोक्त स्थळे धरून आत्तापर्यंत भारतातील ४८ स्थळांचा युनेस्कोच्या संभाव्य वारसास्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या