...या लॅपटॉप्सची आहे चलती

शलाका मुंगी 
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

शॉपिंग स्पेशल
ऑफिसवर्क असेल किंवा वर्क फ्रॉम होम, सर्वांचे काम व्यवस्थित पूर्ण होऊ शकते ते लॅपटॉपमुळे. पण आपले काम आणखी सोईस्कर होण्यासाठी किंवा कमीत कमी वेळात होण्यासाठी, व्हिडिओ कॉलद्वारे कोणाशी बोलण्यासाठी, तसेच कामातून बोअर झाल्यावर गेम्स खेळण्यासाठी किंवा मित्र मैत्रिणींशी गप्पा मारण्यासाठी हा लॅपटॉपच उपयोगी पडतो... मग तुम्हीपण नवीन लॅपटॉप खरेदी करणार? तर, मग वाचा कोणत्या नवीन लॅपटॉप्सची सध्या मार्केटमध्ये आहे चलती...

लॅपटॉप बाजारात सध्या गेमिंग लॅपटॉप्सची एन्ट्री झाली असून 'लेनोव्हो'ची 'योगा' सीरिज ग्राहकांना आकर्षित करत आहे. हे जग टेक्नॉलॉजीबरोबर धावतेय. बाजारात वरचढ अशा लॅपटॉप्सची एन्ट्री होत असतानाच बिझनेस ट्रॅव्हल लॅपटॉप्सची अधिक चलती दिसते. वजनाला जड आणि आकाराने मोठे अशा लॅपटॉप्सची जागा आकाराने लहान आणि वजनाने हलक्या लॅपटॉपने तर केव्हाच घेतली होती. आता त्यात अधिकाधिक गुणवत्तेच्या लॅपटॉपची एन्ट्री बाजारात झालेली आहे. विद्यार्थी किंवा नोकरदार, व्यावसायिकांसाठी 'लेनोव्हो'ने खास लॅपटॉप्स बाजारात लॉंच केले आहेत, तर गेम लव्हर्ससाठी 'असूस' नवीन काहीतरी घेऊन आला आहे. तुम्ही जर लॅपटॉप्स खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर या लॅपटॉप्सचा विचार नक्कीच करू शकता.

लेनोव्होने आयपॅड सीरिजमध्ये S145 लॅपटॉप लॉंच केला आहे. विद्यार्थ्यांसाठी हा सर्वांत चांगला पर्याय सध्या बाजारात दाखल झाला आहे. यामध्ये 4GB RAM असून त्याच्या किमती २६ हजार रुपयांपासून सुरू होतात. हा लॅपटॉप विद्यार्थी आणि घरगुती कामासाठी उपयुक्त आहे.

गेम प्रेमींसाठी लेनोव्होने दोन पर्याय बाजारात दाखल केले आहेत. IPAD L340 आणि Legion Y540. या लॅपटॉपने गेमिंगचा अपडेटेड अनुभव घेता येणार आहे. अर्थात IPAD L340 च्या कार्यप्रणालीविषयी प्रथम जाणून घेऊयात. IPAD L340 मध्ये डॉल्बी ऑडिओ आणि ॲडव्हान्स साऊंड टेक्नॉलॉजी असून मल्टिपल स्पीडमुळे गेमिंगचा आणि कामाचा वेग वाढणार आहे. वजनाला हलका आणि सहज हाताळणीसाठी डिझाईन केलेल्या या लॅपटॉपची किंमत ६० हजार रुपयांपासून पुढे सुरू होते. तर Legion Y540 हा बजेट गेमर लॅपटॉप आहे. ७२ हजार रुपयांपासून पुढे या लॅपटॉपची किंमत सुरू होते.

IPAD S540 हे स्टायलिश आणि अपडेटेड मॉडेल आहे. विद्यार्थी आणि विशेष करून नोकरदार, व्यावसायिकांसाठी हा लॅपटॉप डिझाईन केला आहे. 10TH generation चा हा लॅपटॉप दीर्घकाळ बॅटरी बॅकअप देणारा आहे. हाताळण्यासाठी सहज, स्लिम आणि डायमंड कट फिनिशिंग यास आकर्षक लूक देते. १२ तासांचे बॅटरी बॅकअप आणि सुपर चार्जरने १५ मिनिटांत ८० % बॅटरी चार्ज होते. स्ट्रॉंग कुलिंग सिस्टीम, डॉल्बी ऑडिओ, HD डिस्प्लेसह ब्लू, कॉपर आणि मिनरल ग्रे या तीन रंगात सध्या बाजारात उपलब्ध झाला आहे.

लेनोव्होसह आसूसनेदेखील तीन नवे मॉडेल्स स्पर्धेत उतरवले आहेत. आसूस ही तैवानची कंपनी असून गेमिंग लॅपटॉपची निर्मिती करण्यासाठी अधिक प्रचलित आहे. गेमिंगचा अनुभव अधिक आनंदायी करण्यासाठी आसूसने ROG Zephyrus हा स्पेशल गेमिंग लॅपटॉप लॉंच केला आहे. या लॅपटॉपमध्ये विशेषकरून इंटेलिजन्ट कुलिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे. त्यासह सेल्फ-क्लिनिंग थर्मल मॉड्यूल, अँटी डस्ट टनेल फॅन्स, त्यामुळे लॅपटॉपचे आयुष्य वाढते. या लॅपटॉपची किंमत ८० हजार रुपयांपासून पुढे सुरू होते. गेमिंग लॅपटॉप असल्याने स्पीड, बॅटरी लाइफसह लूकदेखील स्टायलिश असल्याने गेम लव्हर्समध्ये या लॅपटॉपची चालती आहे. यासह ASUS TUF हीदेखील गेमिंग सीरिज बाजारात उपलब्ध करण्यात अली आहे. ज्याची किंमत ५५ हजार रुपयांपासून पुढे सुरू होते.

आसूसने लॉंच केलेली झेनबूक सीरिज ही प्रोफेशनल्ससाठी खास डिझाइन करण्यात आली आहे. या लॅपटॉपविषयी सांगायचे झाले, तर नक्कीच लूक जबरदस्त आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी ग्राहकांना आकर्षित करण्यास आसूसचे लॅपटॉप्स यशस्वी ठरतात. हॅंडलिंगसाठी लाइटवेट आणि स्लिम असल्याने हे ट्रॅव्हल फ्रेंडली, तर आहेतच त्यासह नऊ तास बॅटरी बॅकअप यास वर्क फ्रेंडलीदेखील करतो. याची किंमत ५० हजार रुपयांपासून पुढे सुरू होते. कामाच्या व्यापानुसार लॅपटॉपची निवड केली जाते. पण त्यात भर पडली आहे ती पोर्टेबिलिटीची. लेनोव्हो, आसूस आणि एचपीसह एसर, डेल, अॅपल असे अनेक लॅपटॉप निर्माते नवीन टेक्नॉलॉजीसह लॅपटॉप्स स्पर्धेत उतरवत आहेत. यासह ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ॲक्सेसरीजदेखील लॉंच केल्या जातात. नजीकच्या काळात जे लॅपटॉप्स लॉंच करण्यात आले आहेत त्यात विशेष आकर्षक ॲक्सेसरीज नसल्या तरी जे गेमिंग लॅपटॉप्स लॉंच झाले आहेत त्यासाठी विशेष अशा डिझाइन केलेल्या बॅग्ज ऑनलाइन आणि बाजारातदेखील उपलब्ध आहेत. 

IDEAPAD S145

 • Processor - Up to 8th Gen Intel® Core™ i7-8565u
 • Operating System - Windows 10 Home
 • Display - Up to 15.6" FHD (1920 x 1080), 220 nits, 45% color gamut
 • Memory - Up to 12GB
 • Battery - Up to 6 hours
 • Audio - Dolby Audio™ speaker system
 • Weight - Starting at 1.85kg / 4.08lbs
 • Color Options - Granite Black Glossy, Granite Black Texture, Platinum Grey 
 • Glossyprice -  26,000+

IDEAPAD L340

 • Processor -  9th Gen Intel® Core™ i7-9750H
 • Operating System- Windows 10 Home
 • Graphics- NVIDIA® GeForce® GTX 1650
 • Memory - 16GB DIMM
 • Battery -Up to 9 hours
 • Storage - 16GB Intel® Optane™
 • Audio -  Dolby® Audio®
 • Camera - HD 720p with dual-array mic and physical shutter
 • Weight - Starting at 2.2kg / 4.8lbs
 • Color Options - Granite Black
 • Price - 60,000+

Asus ROG GU501

 •   CPU - Intel Core i7-8750H CPU 2.2GHz
 •   Operating System - Windows 10 Home
 •   RAM - 16GB
 •   RAM - Upgradable to   
 •   Hard Drive Size- 128GB SSD
 •   Hard Drive Speed    
 •   Hard Drive Type-  PCIe m.2 SSD
 •   Secondary Hard Drive Size -1TB
 •   Secondary Hard Drive Speed -5,400-RPM
 •   Secondary Hard Drive Type - SATA Hard Drive
 •   Display Size -  15.6
 •   Highest Available Resolution- 1920 x 1080
 •   Native Resolution - 1900x1080
 •   Video Memory- 6GB
 •   USB Ports - 5
 •   Warranty/Support - 1 year
 •   Size- 15.1 x 10.3 x 0.7 inches
 •   Weight - 5.4 pounds
 •   Price – 80,000+ 

IDEAPAD S540

 • Processor - Up to 10th Gen Intel® Core™ i7
 • Operating System - Windows 10 Home
 • Graphics      - Intel® integrated graphics
 • Memory - Up to 12GB DDR4
 • Battery - Up to 12 hours
 • Display - Up to 14" FHD (1920 x 1080), IPS, antiglare, 300 nits, 72% NTSC
 • Audio - Dolby Audio™ Sound System
 • Weight - Starting at 1.5 kg / 3.3 lbs
 • Colors-Abyss Blue , Copper , Mineral Grey
 • Price - 70,000

Asus ZenBook UX305

 • CPU - 900MHz Intel Core M3-6Y30 (dual-core, 4MB cache, 2.2GHz with Turbo Boost)
 • Graphics - Intel HD Graphics 515
 • RAM - 8GB DDR3L (1,866 MHz SDRAM)
 • Screen - 13.3-inch, 1,920 x 1,080 IPS display
 • Storage - 256GB SSD (M.2 2280)
 • Ports - 3 x USB 3.0, SD card reader, micro HDMI, headset jack
 • Connectivity : Integrated 802.11ac
 • Camera - 2MP HD webcam
 • Weight - 2.6 pounds (1.18kg)
 • Size - 12.8 x 8.9 x 0.48 inches (32.5 x 22.6 x 1.23cm; W x D x H)
 • Price – 50,000+

लॅपटॉप सध्याच्या काळात एक महत्त्वाचे उपकरण म्हणावे लागेल. पूर्वी जसे जड लॅपटॉप यायचे आता मात्र त्यात खूप क्रांती झाली आहे. ग्राहकाच्या गरजेनुसार अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नव्याने जे लॅपटॉप्स लाँच झाले आहेत ते प्रामुख्याने ट्रॅव्हल फ्रेंडली आणि वर्क फ्रेंडली आहेत. लेनोव्हो सीरिजसह सध्या असूसच्या गेमिंग सीरिजचीदेखील मागणी वाढते आहे.
- श्रद्धा पाचंगे, विक्रेती, लॅपटेक सोल्युशन्स, टिळक रोड

ग्राहक लॅपटॉप खरेदी करताना आजकाल बजेटपेक्षा वजनाने हलका आणि वापरास सहज अशा लॅपटॉप्सना अधिक प्राधान्य देतात. बाजारातही सध्या असेच लॅपटॉप्स लाँच करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने लेनोव्हो आणि असूसचा समावेश आहे. लेनोव्होने लाँच केलेली योगा सीरिजची डिमांडदेखील चांगली आहे. विद्यार्थी आणि नोकरदार वर्गासाठी वेगवेगळे फीचर्स लॅपटॉप्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे बॅटरी बॅकअप आणि कुलिंग सिस्टीमच्या अॅडिशनमुळे लॅपटॉप्सचे आयुष्य तर वाढले आहे, तसेच वर्क फ्रेंडली लॅपटॉप्सने ग्राहकदेखील खूश होतो.
- आशुतोष सरनोट, डीलर, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन, टिळक रोड

संबंधित बातम्या