वार्षिक राशिभविष्य (१६ नोव्हेंबर २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१)

-प्रा. रमणलाल शहा
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

वार्षिक राशिभविष्य (१६ नोव्हेंबर २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१)

वेगवान प्रगती 
मेष ः

 शौर्य, धाडस, धडाडी, साहस, धैर्य, निग्रह, निश्‍चय, मनोनिग्रह या गोष्टी आपणाला उपजतच मिळालेल्या आहेत. 
आरोग्य : आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे. अनुकूल कालखंड - २४ डिसेंबर ते १३ एप्रिल, २० जुलै ते ५ सप्टेंबर, २१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर. 
व्यवसाय व आर्थिक स्थिती : व्यवसायाच्या दृष्टीने हे वर्ष असामान्य प्रगतीचे आहे. आपण व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. जीवनाकडे गांभीर्याने पहाल. यावर्षी व्यवसायात धाडस करण्यास हरकत नाही. शत्रुपिडा नाही. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार आहे. अनुकूल कालखंड - १७ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर, ४ जानेवारी ते १६ मार्च, ४ ते २८ मे, १७ जुलै ते ११ ऑगस्ट, ५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर. 
नोकरी : नोकरदारांसाठी अत्यंत चांगले वर्ष. संपूर्ण वर्षभर गुरू व शनी अनुकूल आहेत. बढती मिळू शकते. योग्य ठिकाणी बदली लाभू शकते. अनुकूल कालखंड - १७ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर, १६ डिसेंबर ते १३ जानेवारी, १३ फेब्रुवारी ते १४ मार्च, १३ एप्रिल ते १६ जुलै, १६ ऑगस्ट ते १६ ऑक्टोबर. मात्र १५ मार्च ते १५ एप्रिल, १६ जुलै ते १५ ऑगस्ट, १७ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर हे कालखंड नोकरीतील व्यक्तींना प्रतिकूल आहेत. 
वैवाहिक सौख्य : वर्ष संमिश्र राहील. विवाहेच्छू मुलामुलींना संपूर्ण वर्षभर गुरूबळ आहे. मात्र काही व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात मतभेद राहणार आहेत. ढोबळमानाने ५ एप्रिल ते १४ सप्टेंबर हा कालखंड अधिक सौख्यकारक आहे. १६ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर, २ जून ते २० जुलै, ११ ऑगस्‍ट ते ५ सप्टेंबर, २ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर हे कालखंड वैवाहिक जीवनात प्रतिकूल आहेत. १६ डिसेंबर ते १४ मार्च, १४ मे ते १४ जून, १७ ऑगस्ट ते १६ सप्‍टेंबर या कालखंडात आपणाला मान, प्रतिष्ठा लाभेल. मानसन्मानाचे योग येतील. राजकारणात अधिकारपद लाभेल. 
सारांश, मेष व्यक्तींना हे वर्ष यशाचे व लाभाचे आहे. संततिसौख्य आहे. घरात मंगलकार्य होईल. प्रवासाच्या दृष्टीने चांगले वर्ष आहे. विद्यार्थ्यांना तसेच बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रांतील व्यक्तींना चांगले आहे. तुमच्या आकांक्षा व मनोरथ पूर्ण होतील.
  
सुयश लाभेल
वृषभ ः

आपल्याला स्वास्थ्य आणि शांतता हवी असते. कोणतेही काम आपण चिकाटीने व सातत्याने करता. आपले कुटुंब बरे व आपण बरे असा आपला स्वभाव आहे. आपण आनंदी व आशावादी असता. 
आरोग्य : या वर्षात आरोग्य चांगले राहणार आहे. जीवनाकडे तुम्ही आशावादी नजरेने पाहू शकता. अनुकूल कालखंड - ११ डिसेंबर ते ३ जानेवारी, २४ जानेवारी ते १० एप्रिल, ४ ते २८ मे, २२ जून ते ५ सप्टेंबर, २ ते ३० ऑक्टोबर.
व्यवसाय व आर्थिक स्थिती : आपणाला संपूर्ण वर्षभर गुरू व शनी अनुकूल असल्याने या वर्षाकडे आपण आशावादी राहून पाहू शकता. तुमचे निर्णय व अंदाज अचूक येतील. व्यवसायासाठी चांगले कालखंड -२८ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर, ५ जानेवारी ते १६ एप्रिल, १ मे ते २२ सप्टेंबर, १ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर. विशेषतः ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर हा कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने अत्यंत चांगला जाणार आहे. या कालखंडामध्ये तुम्ही शेअर्समध्ये व व्यवसायात बाजारपेठेचा अभ्यास करून धाडस करू शकता. 
नोकरी : नोकरीतील व्यक्तींना हे वर्ष सौख्याच्या व प्रगतीच्या दृष्टीने चांगले जाणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभणार आहे. आपल्या प्रगतीच्या आड कोणीही हितशत्रू येऊ शकत नाहीत. अनुकूल कालखंड - २० नोव्हेंबर ते १६ डिसेंबर, १४ जानेवारी ते १० एप्रिल, २८ मे ते १६ सप्टेंबर, १२ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर. याशिवाय ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर या कालखंडात आपणाला पदोन्नती मिळेल. तुमच्या जबाबदारीत वाढ होईल. बदली हवी असेल तर योग्य ठिकाणी बदली मिळेल. 
वैवाहिक सौख्य :  वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे. वृषभ राशीच्या विवाहोत्सुक मुलामुलींसाठी २० नोव्हेंबर ते १३ जुलै हा कालखंड  साखरपुडा, विवाह यासाठी अनुकूल आहे. या कालखंडात कोणतीही शुभकार्ये आपण करू शकता. 
वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अनुकूल कालखंड - २१ फेब्रुवारी ते ९ एप्रिल, ४ मे ते १० जुलै, १७ जुलै ते ११ ऑगस्ट, २ ते ३० ऑक्टोबर.
मान, प्रतिष्ठा, सार्वजनिक जीवनात यश ः राजकारण, समाजकारण सार्वजनिक जीवन यामध्ये आपणाला पद, प्रतिष्ठा या सर्व गोष्टी लाभणार आहेत. विद्यार्थ्यांना यशाचे आहे. बौद्धिक, शैक्षणिक, कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात यश मिळेल. प्रॉपर्टी व प्रवासाला वर्ष चांगले आहे. अनुकूल कालखंड- १३ फेब्रुवारी ते १० मार्च, १० जून ते ११ जुलै, १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर
सारांश, वृषभ राशीला हे संपूर्ण वर्ष सर्वांगिण प्रगतीला चांगले ठरणार आहे. संततिसौख्य, वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.

अडथळे आहेत, जागरूकता हवी
मिथुन

आपली रास बुद्धिप्रधान आहे. आपल्याकडे ग्रहणशक्ती आहे, तीव्र स्मरणशक्ती आहे, प्रसंगावधान, समसूचकता, हजरजबाबीपणा, चातुर्य, मुत्सद्दीपणा आहे. बौद्धिक क्षेत्रात आपण यशस्वी होवू शकता. 
आरोग्य : आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष सर्वसामान्य आहे. फक्त पुढील कालखंड आरोग्याच्या दृष्टीने चांगले जातील. १६ ते २८ नोव्हेंबर, १७ डिसेंबर ते ५ जानेवारी, २६ जानेवारी ते २९ एप्रिल, २६ मे ते २५ जुलै, ८ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर. विशेषतः ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर हा कालखंड आरोग्याला अत्यंत चांगला जाणार आहे. उर्वरित काळात आरोग्याची काळजी घ्यावी.
व्यवसाय व आर्थिक स्थिती :  हे वर्ष सर्वसामान्य आहे. आपल्या पत्रिकेमध्ये वर्षभर आठव्या स्थानात राहणारा शनी व्यवसायात चढ-उतार करेल; आर्थिक अडचणी आणेल. आपले अंदाज चुकण्याची शक्यता आहे. १६ नोव्हेंबर ते ५ एप्रिल हा कालखंड बराचसा प्रतिकूल आहे. तेव्हा यावर्षी व्यवसायात धाडस करताना बाजारपेठेचा चौफेर अभ्यास केला पाहिजे. आर्थिक लाभाला चांगले कालखंड - २५ डिसेंबर ते २० फेब्रुवारी, २० एप्रिल ते ३० मे, १७ जुलै ते ५ सप्टेंबर. स्थूलमानाने ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर हा कालखंड आपणाला समाधानकारक ठरेल. तरीसुद्धा आपण आर्थिक व्यवहारात अतिशय सावध राहणे गरजेचे आहे. 
नोकरी : संपूर्ण वर्ष शनी आठव्या स्थानात असणे ही गोष्ट नोकरीच्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल नाही. काही महिने गुरूही आठव्या स्थानात राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहारात चौफेर विचार करावयास हवा. नोकरीतील व्यक्तींना अनुकूल कालखंड- १३ फेब्रुवारी ते १० मार्च,  १३ एप्रिल ते १४ मे, १५ जून ते १६ जुलै, १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर
वैवाहिक सौख्य : वैवाहिक सौख्याच्या, विशेषतः विवाह जमण्याच्या व होण्याच्या दृष्टीने गुरू अनुकूल असावा लागतो. आपल्या राशीला हा गुरू ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर एवढ्याच कालखंडापुरता अनुकूल आहे. हा कालखंड नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन शुभ कार्य करणे, साखरपुडा, विवाह यासाठी चांगला आहे. वरील कालखंड वैवाहिक सौख्यासाठी अनुकूल आहे. वैवाहिक सौख्याला प्रतिकूल कालखंड - २२ फेब्रुवारी ते १३ एप्रिल, २ जून ते २० जुलै, ५ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर. 
मानसन्मान, अधिकारपद, प्रतिष्ठा, कीर्ती यासाठी पुढील कालखंड अनुकूल आहेत. १३ फेब्रुवारी ते १३ एप्रिल, ११ जून ते १६ जुलै, १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर. सारांश, मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष कमी-अधिक प्रमाणात संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहे. ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर हा कालखंड मात्र अनेक दृष्टीने चांगला जाईल.  

संमिश्र स्थिती
कर्क

आपल्या राशीवर चंद्राचे स्वामित्व असल्याने आपण भावनाप्रधान, प्रेमळ व दयाळू आहात. परंतु चंद्राचा या राशीवर अंमल असल्यामुळे आपल्या स्वभावात सतत चढ-उतार होत असतात. कर्क राशीच्या व्यक्तींना लोकप्रियता भरपूर लाभते. आपण समाजात प्रसिद्ध असता. सामाजिक व राजकीय कार्यात आपणाला यश मिळते.  
आरोग्य : हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे आहे. यावर्षी आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यावर्षी आपणावरील जबाबदारीचे प्रमाण वाढणार आहे. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. अनुकूल कालखंड - १७ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर, १६ मार्च ते २८ मे, २५ जुलै ते ८ ऑगस्ट, ५ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर.
व्यवसाय व आर्थिक स्थिती : वर्ष संमिश्र स्वरूपाचे आहे. विशेषतः ज्यांचा प्रॉपर्टी, जागा, जमिनी व बिल्डरचा व्यवसाय आहे त्यांना हे वर्ष सामान्य आहे. ज्यांना एकदाच घर घ्यायचे आहे त्यांनी शक्यतो खरेदीचा बेत पुढच्या वर्षावर ढकलावा. आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगले कालखंड - नोव्हेंबर १७ ते ११ डिसेंबर, २४ जानेवारी ते २१ फेब्रुवारी, १७ मार्च ते १४ एप्रिल, १७ जुलै ते १८ ऑगस्ट, ५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर.
नोकरी : फार मोठ्या यशाची, बढतीची आशा करणे योग्य ठरणार नाही. काहीजणांना बदलीचे योग आहेत व नको त्या ठिकाणी बदलीच्या ठिकाणी जावे लागेल. अधिक जबाबदारीमुळे कामात अस्वस्थता राहील. अधिक जबाबदारीने वागाल, आपल्या कामाकडे लक्ष द्याल. अनुकूल कालखंड - १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर, १४ एप्रिल ते १४ जून, १७ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर.
वैवाहिक सौख्य : वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे, बरेचसे प्रतिकूलच आहे. कर्क राशीच्या मुलामुलींना २० नोव्हेंबर ते ५ एप्रिल एवढाच काळ अनुकूल आहे. उर्वरित संपूर्ण कालखंडात गुरू प्रतिकूल असल्याने विवाहेच्छूंनी या कालखंडात विवाह उरकून घ्यावेत. वैवाहिक सौख्याला अनुकूल कालखंड - १७ मार्च ते १३ एप्रिल, ५ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर.
मान, प्रतिष्ठा, सार्वजनिक जीवनात यश ः ग्रहस्थिती जरी संमिश्र स्वरूपाची असेल तरीही आपला जनतेमधील वावर कमी करू नये. जनतेशी एकरूप राहावे. अनुकूल कालखंड - १६ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर, १४ एप्रिल ते १४ मे, १५ जुलै ते १४ ऑगस्ट. सारांश, हे वर्ष सामान्य आहे. ५ एप्रिल ते १४ सप्टेंबर अशा मोठ्या कालखंडात गुरू नवव्या स्थानात असल्याने हा कालखंड काही प्रमाणात अनुकूल ठरेल. इतर कालखंड यश मिळण्यासाठी फारसे अनुकूल नाहीत. प्रॉपर्टीचे व्यवहार कटाक्षाने टाळावेत. 
 
नोकरी, व्यवसायात प्रगती
सिंह ः

सिंह ही राज राशी आहे. आपल्याकडे स्वाभिमान आहे. धाडस आहे. आपण उदार, दिलदार आहात. आपल्याला नेतृत्वाची आवड असते. केवळ सिंह रास आहे म्हणून आपण आपल्या क्षेत्रात पुढे येऊ शकता.
आरोग्य : ढोबळमानाने ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर हा कालखंड आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. एकूण वर्ष चांगले आहे. आरोग्याला प्रतिकूल कालखंड - १४ जानेवारी ते १३ फेब्रुवारी, १५ मार्च ते १३ एप्रिल, १६ जुलै ते १५ ऑगस्ट.
व्यवसाय व आर्थिक स्थिती :  व्यवसायाच्या दृष्टीने व आर्थिक लाभाच्या दृष्टीने हे वर्ष अत्यंत यशदायक आहे. व्यवसायाची वाढ होऊ शकते. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू 
करू शकता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. यावर्षी बाजारपेठेचा व शेअर्सचा अभ्यास करून तुम्ही व्यवसायात व आर्थिक क्षेत्रात धाडस करू शकता. आर्थिक लाभाला चांगले कालखंड - २४ डिसेंबर ते २७ जानेवारी, २० फेब्रुवारी ते ९ मार्च, १५ एप्रिल ते १८ जून, २० जुलै ते ३० ऑगस्ट, ५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर
नोकरी : नोकरदारांना चांगले वर्ष. आशाआकांक्षा सफल होतील. काहीजणांना बढतीचे योग. तुमच्यावर अधिक जबाबदारी सोपवली जाईल. अनुकूल कालखंड - २२ फेब्रुवारी ते १३ एप्रिल, २० एप्रिल ते १४ जुलै, १७ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर.
वैवाहिक सौख्य : संमिश्र स्वरूपाचे, बरेचसे प्रतिकूल वर्ष. सिंह राशीच्या विवाहेच्छू मुलामुलींना विवाहासाठी ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर हा कालखंड अनुकूल आहे. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने चांगले कालखंड - २१ फेब्रुवारी ते १७ मार्च, १० एप्रिल ते १ जून, १७ जुलै ते ११ ऑगस्ट, ५ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर. मात्र १६ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर व २ जून ते १६ जुलै हे कालखंड वैवाहिक सौख्याला प्रतिकूल आहेत.
मान, प्रतिष्ठा, सार्वजनिक जीवनात यश ः  सिंह राशीच्या व्यक्तींना हे वर्ष राजकीय, सामाजिक व सार्वजनिक कार्याच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे. अनेक जणांना अधिकार मिळू शकतो. पद मिळू शकते. मानसन्मानाचे योग येतील. चांगले कालखंड - २५ फेब्रुवारी ते १० मार्च, १५ एप्रिल ते ३० मे, १८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर.
सारांश, हे वर्ष सिंह राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय, आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. संततिसौख्यासाठी ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर हा कालखंड चांगला आहे. सिंह व्यक्तींना आगामी वर्षाकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहता येईल.

कामे मार्गी लागतील
कन्या ः

आपली रास बौद्धिक क्षेत्रात यश मिळविणारी आहे. कल्पकता, चांगली स्मरणशक्ती, बुद्धिचातुर्य आहे. शिक्षण, विज्ञान, संशोधन या क्षेत्रात आपल्याला यश मिळत असते.
आरोग्य : आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष सर्वसामान्य आहे. तरीसुद्धा आपण आरोग्याची काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहू शकते. चांगले कालखंड - १७ नोव्हेंबर ते २ जानेवारी, १ मे ते १५ जुलै, २६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर, २ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर.
व्यवसाय व आर्थिक स्थिती :  व्यवसायाच्या व आर्थिक दृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. व्यवसायाच्या दृष्टीने व आर्थिक लाभाच्या दृष्टीने ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर हा चांगला आहे. आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगले कालखंड - २५ नोव्हेंबर ते १ जानेवारी, १५ मे ते २३ जुलै, १ ते २५ सप्टेंबर, १० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर.
नोकरी : नोकरीतील व्यक्तींना चांगले वर्ष. २१ नोव्हेंबर ते ५ एप्रिल या काळात नवीन संधी मिळेल. तुमचे निर्णय बरोबर येतील. ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर या कालखंडामध्ये बढती मिळू शकते. पगार वाढ होऊ शकते. अतिशय लाभदायक कालखंड - १६ नोव्हेंबर ते ९ जानेवारी, २० मे ते १४ जुलै, १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर.
वैवाहिक सौख्य : बरेचसे प्रतिकूल वर्ष आहे. विवाहेच्छू मुलामुलींचे विवाह सहजासहजी जमणार नाहीत. चांगले कालखंड - १७ मार्च ते १० एप्रिल, ४ मे ते १६ जुलै, २४ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर.
मान, प्रतिष्ठा, सार्वजनिक जीवनात यश ः हे वर्ष प्रतिष्ठेच्या दृष्टीने समाधानकारक आहे. अनुकूल कालखंड - १५ मे ते १६ जुलै, १२ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर. 
सारांश, कन्या राशीच्या व्यक्तींना हे वर्ष, विशेषतः 
वर्षाचा पूर्वार्ध संततिसौख्याला चांगला आहे. तसेच नोकरी, व्यवसाय व सामाजिक स्थिती या दृष्टीने चांगला आहे. फक्त वैवाहिक जीवन व भागीदारी व्यवसाय यासाठी हे वर्ष प्रतिकूल आहे.  

आशाआकांक्षा पूर्ण होतील
तूळ ः

आपल्याकडे साहित्य, कला व संगीत, नाट्य या विषयी खास आकर्षण आहे. आपली रास न्यायी, सुसंस्कृत आहे. समाजामध्ये आपण विशेष काम करू शकता. राजकारण, समाजकारण यामध्ये आपल्याला विशेष यश लाभू शकते. कोणत्याही विषयात आपली भूमिका टोकाची नसते. समन्वय व विचारांची देवाण-घेवाण यावर आपला भर असतो. 
आरोग्य :  आरोग्यासाठी चांगले वर्ष. जीवनाकडे आपण सकारात्मक दृष्टीने पहाल. आपल्या जीवनात वैचारिक प्रगती होणार आहे. १५ फेब्रुवारी ते १६ मार्च, १० एप्रिल ते ४ मे, २८ मे ते ४ जून, ५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हे कालखंड आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
व्यवसाय व आर्थिक स्थिती : व्यवसायाच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे. व्यवसायातील निर्णय योग्य येणार आहेत. जागा, जमिनी, प्रॉपर्टी, बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स यांना हे वर्ष विशेष चांगले आहे. व्यवसाय वाढणार आहे. आर्थिक लाभाला व व्यवसायाला चांगले कालखंड - १७ नोव्हेंबर ते १० डिसेंबर, १३ एप्रिल ते २० मे, २८ मे ते ३ जून, २० जुलै ते ५ सप्टेंबर, २ ते ३० ऑक्टोबर.
नोकरी : नोकरीतील व्यक्तींसाठी समाधानकारक, नोकरीमध्ये स्वास्थ्य मिळण्याचे हे वर्ष आहे. बढती मिळण्याची शक्यता आहे. प्रगतीच्या दृष्टीने चांगले कालखंड - १६ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर, १३ फेब्रुवारी ते १५ मार्च, १३ एप्रिल ते १५ मे, २० जून ते २० जुलै, १८ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर.
वैवाहिक सौख्य : वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. मात्र, विवाहेच्छू मुलामुलींचे विवाह फक्त ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर याच कालखंडात होणार आहेत. हा कालखंड साखरपुडा, शुभ कार्यासाठी चांगला आहे. चांगले कालखंड - २४ डिसेंबर ते २२ फेब्रुवारी, १४ एप्रिल ते २ जून, १९ जुलै ते ११ सप्टेंबर.
मान, प्रतिष्ठा, सार्वजनिक जीवनात यश ः प्रतिष्ठा, मानसन्मान, हाती घेतलेल्या कामात यश, सुसंधी, अधिकार, मानसन्मान, कीर्ती, यश या दृष्टीने चांगले कालखंड - १६ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर, १३ फेब्रुवारी ते १५ मार्च, १५ एप्रिल ते १० मे, २० जून ते १७ जुलै, १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर. 
सारांश, तूळ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष सर्वांगीण प्रगतीसाठी चांगले आहे. तुम्हाला या वर्षी संधी मिळणार आहे.

परिश्रम कारणी लागतील
वृश्‍चिक :

आपल्याकडे प्रचंड ऊर्जा आहे. निग्रह आहे, मनोबल आहे. आत्मविश्‍वास आहे. कोणतेही काम चिकाटीने, सातत्याने व निश्‍चयाने तडीस नेणे हे आपले वैशिष्ट्य आहे. वृश्‍चिक व्यक्ती जीवनात सामान्यतः: यशस्वी होतात. 
आरोग्य : आरोग्याच्या दृष्टीने ग्रहमान चांगले आहे. अनुकूल कालखंड - १६ नोव्हेंबर ते ४ जानेवारी, २२ फेब्रुवारी ते १३ एप्रिल, २० जुलै ते २१ ऑक्टोबर.
व्यवसाय व आर्थिक स्थिती : यावर्षी व्यवसायात तुम्ही नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. व्यवसाय वाढवू शकाल. चांगले  कालखंड - १६ नोव्हेंबर ते २० जानेवारी, १३ फेब्रुवारी ते १४ एप्रिल, १५ मे ते १६ जून, १७ ऑगस्ट ते १६ ऑक्टोबर.
नोकरी : अत्यंत चांगले वर्ष. बढती मिळण्याची फार मोठी शक्यता आहे. तुमच्यावर एखादी मोठी जबाबदारी सोपवली जाईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. बदली हवी असणाऱ्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. अनुकूल कालखंड  - १६ डिसेंबर ते १६ जानेवारी, १३ फेब्रुवारी ते १३ जून, १६ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर 
वैवाहिक सौख्य : विवाहेच्छू मुलामुलींचे विवाह होण्याच्या दृष्टीने २१ नोव्हेंबर ते ५ एप्रिल व १५ सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर हा कालखंड चांगला आहे. उर्वरित कालखंडात वृश्‍चिक राशीला गुरूबळ नाही. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने खालील चांगले कालखंड - १६ डिसेंबर ते ४ जानेवारी, २४ जानेवारी ते २१ फेब्रुवारी, १३ मार्च ते ९ एप्रिल, ४ ते २८ मे, २२ जुलै ते ११ ऑगस्ट, २ ते ३० ऑक्टोबर.
मान, प्रतिष्ठा, सार्वजनिक जीवनात यश ः प्रतिष्ठा, मानसन्मान, सुसंधी, अधिकार, यश मानमान्यता, कीर्ती चांगले कालखंड -१६ डिसेंबर ते १३ जानेवारी, १५ फेब्रुवारी ते १० मार्च, २२ एप्रिल ते १० जून, १७ ऑगस्ट ते २० सप्टेंबर
सारांश,  वृश्‍चिक व्यक्तींना हे वर्ष व्यवसायाला, आर्थिक लाभाला चांगले आहे. प्रॉपर्टीची खरेदी ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर या कालखंडात करावी. हा कालखंड प्रवासासाठी सुद्धा चांगला आहे. 

आर्थिक सुयश
धनू :

गुरूच्या प्रभावाखाली असलेल्या आपल्या राशीवर अनेक साधूसंत जन्माला आलेले आहेत. आपल्याकडे खरेपणा, स्वामीनिष्ठा, मनाचा उमदेपणा व गतिमानता आहे. सुसंस्कृतपणा व नि:स्पृह वृत्ती आहे.
आरोग्य :  आरोग्याच्या फारशा अडचणी येणार नाहीत. साडेसाती सामान्यतः अजून दोन वर्षे आहे. मात्र, त्रास, अडचणी खूपच कमी झालेल्या आहेत. आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल कालखंड -१७ नोव्हेंबर ते १४ जानेवारी, १३ फेब्रुवारी ते १३ एप्रिल, २६ मे ते २२ जून, १७ जुलै ते ४ सप्टेंबर, २५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर
व्यवसाय व आर्थिक स्थिती : व्यवसाय व आर्थिक लाभ या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे. अडचणी कमी होतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. दळणवळण क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होतील. व्यवसाय व आर्थिक लाभासाठी चांगले कालखंड - १७ डिसेंबर ते २ जानेवारी, २५ जानेवारी ते ३ फेब्रुवारी, ९ ते २७ मार्च, १४ एप्रिल ते १ मे, ५ ते २४ जुलै, १२ ऑगस्ट ते २० सप्टेंबर, ४ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर.
नोकरी : वर्षाचा पूर्वार्ध म्हणजे १६ नोव्हेंबर ते ५ एप्रिल व नंतर १५ सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर हा कालखंड धनू व्यक्तींना बढतीच्या दृष्टीने चांगला आहे. या कालखंडात आपल्या प्रगतीच्या व बढतीच्या आड कोणीही येऊ शकणार नाही. अनुकूल कालखंड - १४ जानेवारी ते १३ फेब्रुवारी, १५ मार्च ते १४ मे, १६ जून ते १२ जुलै, १६ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर.
वैवाहिक सौख्य : धनू राशीच्या विवाहेच्छू मुलामुलींना विवाहाच्या दृष्टीने २० नोव्हेंबर ते १३ जुलै हा संपूर्ण कालखंड अनुकूल आहे.  वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अनुकूल कालखंड - १९ ते ३१ डिसेंबर, ८ ते २५ मार्च, १७ ते ३० एप्रिल, ७ ते २४ जुलै, १४ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर, ८ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर.  
मान, प्रतिष्ठा, सार्वजनिक जीवनात यश ः समाजकारण, राजकारण, सार्वजनिक जीवन या सर्व दृष्टीने हे वर्ष यशदायक आहे. विशेषतः १६ नोव्हेंबर ते ५ एप्रिल व १५ सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर हा कालखंड तुमच्या कार्यक्षेत्रात अधिकारपद लाभण्याचा आहे. तुम्हाला पद, अधिकार, मानसन्मान लाभू शकतो. सुसंधीच्याही दृष्टीने हे वर्ष चांगले आहे. चांगले व अनुकूल कालखंड - ५ फेब्रुवारी ते ४ मे, १७ ऑगस्ट ते ४ नोव्हेंबर. सारांश, हे वर्ष व्यवसायात यश, आर्थिक लाभ, बढती, प्रतिष्ठा या दृष्टीने चांगले आहे. तसेच संततिसौख्याच्या दृष्टीने चांगले आहे. विद्यार्थ्यांना व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना 
व प्रॉपर्टीसाठी १६ नोव्हेंबर ते ५ एप्रिल पर्यंतचा कालखंड 
चांगला आहे.

कौटुंबिक सौख्य व सुबत्ता
मकर :

आपली रास शनीच्या अमलाखालील आहे त्यामुळे शिस्त, संयम, चिकाटी, कर्तव्याची जाणीव, कायदा पाळणे, व्यवहार चातुर्य या गोष्टी आहेत. मनोराज्यात न रमता आपण वास्तववादी विचाराने वागता. आपल्याला सुरू असलेली साडेसाती २९ मार्च २०२५ रोजी संपणार आहे. त्रास, अडचणी आर्थिक व वैवाहिक दृष्टीने कोणत्याही कामात अडथळे, विलंब राहणार आहेत. यासाठी संयम, सोशिकता व सहनशीलता याची अधिक गरज आहे.
आरोग्य : आरोग्य समाधानकारक राहील. मात्र, साडेसातीमुळे अधिक जबाबदारी, कामाचा ताण राहील. अनुकूल कालखंड - १६ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर, १७ मार्च ते २८ मे, ११ ऑगस्ट ते ३० ऑक्टोबर.
व्यवसाय व आर्थिक स्थिती : साडेसाती असल्यामुळे साधकबाधक विचार करून निर्णय घ्यावेत. धाडस करताना अधिक विचार करावा. ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर हा कालखंड व्यवसायाला व आर्थिक लाभाला अधिक चांगला आहे. अनुकूल कालखंड - २१ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर, २२ फेब्रुवारी ते १५ मार्च, १० एप्रिल ते २८ मे, १० ते ३० सप्टेंबर.
नोकरी : वर्षाचा उत्तरार्ध चांगला आहे. ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर हा कालखंड स्थूलमानाने बढतीला व पगारवाढीला चांगला आहे. प्रगतीच्या दृष्टीने लाभदायक कालखंड - १७ नोव्हेंबर ते १० डिसेंबर, १३ फेब्रुवारी ते १४ मार्च, २० एप्रिल ते १० जून, १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर.
वैवाहिक सौख्य : विवाहेच्छू मुलामुलींना हे संपूर्ण वर्ष गुरूबळ आहे. २० नोव्हेंबर ते १३ जुलै हा कालखंड विवाहांसाठी अनुकूल आहे. वैवाहिक सौख्यासाठी हे वर्ष संमिश्र आहे; मात्र, वैवाहिक जीवनातील मतभेद टोकाला जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. अनुकूल कालखंड - १७ नोव्हेंबर ते ४ जानेवारी, १७ मार्च ते २८ मे, ११ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर, ५ ते २७ ऑक्टोबर. 
मान, प्रतिष्ठा, सार्वजनिक जीवनात यश ः ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर या कालखंडात हाती घेतलेल्या कार्यात यश, सामाजिक, सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात अधिकारपद, मानसन्मान लाभू शकतो. लाभदायक कालखंड - १७ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर, २१ फेब्रुवारी ते २८ मे, १७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर.
सारांश, संततिसौख्याच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांना व शैक्षणिक कला, संगीत, नाट्य या क्षेत्रातील व्यक्तींना हे वर्ष चांगले आहे.

सामान्य स्थिती
कुंभ :

आपली रास शनीच्या आधिपत्याखालील आहे. ज्ञानलालसा, प्रामाणिकपणा, कोणतेही ज्ञान खोलात जाऊन घेणे, नि:स्वार्थीपणा, उत्कट ध्येयवाद ही आपली वैशिष्ट्ये आहेत. आपल्याकडे माणुसकी आहे. मैत्रीला आपण सच्चे असता. आपण परंपराप्रेमी असता व त्याचवेळी वैज्ञानिक आवड आपल्याकडे असते. आपल्याकडे संयम, शिस्त व गांभीर्य असते. 
आरोग्य : आपल्याला सुरू असलेली साडेसाती २३ फेब्रुवारी २०२० रोजी संपणार असल्याने आपण सावध व संयमी राहणे हे जास्त योग्य ठरेल. अनुकूल कालखंड -१२ डिसेंबर ते २५ जानेवारी, २० मार्च ते ८ एप्रिल, ४ मे ते १ जून , १५ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर.
व्यवसाय व आर्थिक स्थिती :  हे वर्ष समाधानकारक आहे. व्यवसाय व आर्थिक लाभासाठी चांगले कालखंड -२५ डिसेंबर ते १३ फेब्रुवारी, ४ मार्च ते २५ मे, २३ जुलै ते २९ ऑगस्ट.
नोकरी : नोकरीतील व्यक्तींना हे वर्ष सर्वसामान्य आहे. फार मोठ्या यशाची अपेक्षा नको. शनी बाराव्या स्थानात आहे. गुरूही वर्षातील काही काळ बाराव्या स्थानात आहे. अनुकूल कालखंड - २० नोव्हेंबर ते ४ जानेवारी, १६ फेब्रुवारी ते १० मार्च,२० एप्रिल ते २ जून, १७ ऑगस्ट ते १० सप्टेंबर.
वैवाहिक सौख्य : वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर हा कालखंड चांगला आहे. विवाहेच्छू मुलामुलींसाठी ६ एप्रिल ते १३ जुलै हा कालखंड अनुकूल आहे. अनुकूल कालखंड - २२ नोव्हेंबर ते ८ जानेवारी, १७ फेब्रुवारी ते १५ मार्च, २४ एप्रिल ते १ जून, २० ऑगस्ट ते ९ सप्टेंबर. 
मान, प्रतिष्ठा, सार्वजनिक जीवनात यश ः साडेसाती चालू असल्याने तसेच शनी बाराव्या स्थानात असल्याने फक्त ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर या कालखंडाची अनुकूलता  लाभेल. अनुकूल काळ -२४ डिसेंबर ते १३ जानेवारी, १३ एप्रिल ते १४ मे, १८ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर. सारांश, ६ एप्रिल ते १४ सप्टेंबर हा कालखंड आरोग्य, वैवाहिक सौख्य, संततिसौख्य, सुसंधी, संयम, सहनशीलता, जागरूकता, प्रतिष्ठा यासाठी समाधानकारक आहे.

सुसंधी लाभेल
मीन :
आपली रास गुरूच्या आधिपत्याखालील असल्याने आपला स्वभाव हा सुसंस्कृत, सभ्य व सहनशील आहे. देवभक्ती, आध्यात्मिक शक्ती, संस्कृतीचा अभिमान, व्यवहारात सरळपणा व प्रामाणिकपणा ही आपली वैशिष्ट्ये आहेत. 
आरोग्य : १६ नोव्हेंबर ते ५ एप्रिल या कालखंडात आरोग्य चांगले राहणार आहे. ६ एप्रिल ते १४ नोव्हेंबर या कालखंडात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. यावर्षी तुमच्यावर जबाबदारी अधिक पडणार आहे. कामाचा ताण जाणवेल. अनुकूल कालखंड - २८ नोव्हेंबर ते २५ जानेवारी, १ एप्रिल ते २१ जून, १२ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर, ५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर.
व्यवसाय व आर्थिक स्थिती :  २१ नोव्हेंबर ते ५ एप्रिल व १५ सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर हा कालखंड अनुकूल आहे. शनी लाभस्थानात असल्यामुळे त्याचा थोडा फायदा होणार आहे. आर्थिक लाभासाठी चांगले कालखंड - २४ डिसेंबर ते १५ जानेवारी, २ फेब्रुवारी ते २५ मार्च, ८ एप्रिल ते ३० मे, ६ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर.
नोकरी : नोकरीमध्ये यश मिळण्याच्या दृष्टीने स्थूलमानाने १७ नोव्हेंबर ते ५ एप्रिल हा कालखंड चांगला आहे. प्रगतीच्या दृष्टीने चांगले कालखंड - २० नोव्हेंबर ते ९ जानेवारी, २० मार्च ते १० जुलै, २५ ऑगस्ट ते १० ऑक्टोबर.
वैवाहिक सौख्य : विवाहेच्छू मुलामुलींच्या विवाहांसाठी तसेच साखरपुडा व कोणत्याही शुभ कार्यासाठी २१ नोव्हेंबर ते ५ एप्रिल व १५ सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर हा कालखंड अनुकूल आहे. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अनुकूल कालखंड - २८ नोव्हेंबर ते ४ जानेवारी, १६ एप्रिल ते २० जुलै, २६ ऑगस्ट ते २० सप्टेंबर, २ ते ३० ऑक्टोबर. 
मान, प्रतिष्ठा, सार्वजनिक जीवनात यश ः यशासाठी गुरू अनुकूल असावा लागतो. तुमच्या राशीला गुरूचे महत्त्व अधिक आहे. मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. अनुकूल कालखंड - २० डिसेंबर ते १२ जानेवारी, पुढे २० मेपर्यंत, १५ जून ते ९ जुलै.
सारांश, संततिसौख्य, शैक्षणिक व बौद्धिक कार्यात यश, तुमच्या क्षेत्रात सुसंधी, सार्वजनिक, राजकीय क्षेत्रात अधिकार, मानमान्यता तसेच मुलामुलींची प्रगती, प्रॉपर्टी व सर्व कामांसाठी स्थूलपणाने २१ नोव्हेंबर ते ५ एप्रिल व १५ सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर हे कालखंड चांगले जाणार आहेत.
 

संबंधित बातम्या