जर हवेतला ऑक्सिजन संपून गेला तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 31 मे 2021

‘जर तर’च्या गोष्टी

 

 

 

डॉ. बाळ फोंडके

‘हवेतला ऑक्सिजन सिलिंडरमध्ये बंद केला तर हवेतला ऑक्सिजन आटेल असं वाटत असेल, तर त्याची काळजी करण्याचं तुला काहीच कारण नाही. उद्या परवाच काही ऑक्सिजन नष्ट होणार नाही. निदान अजून एक अब्ज वर्षं तरी हवेत पुरेसा ऑक्सिजन राहणार आहे.’

चिंतू धावतधावत आला तेव्हाच मी ओळखलं की कोणती तरी नवीन चिंता त्याला छळतेय. त्याला लागलेली धाप आवरून तो बोलेपर्यंत मी गप्पच राहिलो. हातातला पेपर फडफडवत त्यानं म्हटलं, ‘हे पाहिलंस, ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ऑक्सिजन न मिळाल्यानं लोकांचे प्राण कंठाशी आले आहेत. त्यावर उपाय म्हणून हे कोणीतरी सांगताहेत की हवेतला ऑक्सिजन शोषून घेऊन त्याचा पुरवठा करावा.’

‘तो एक उपाय आहे, पण अखेरचा. इतर उपायांनी पुरवठा योग्य तितका झाला नाही तर त्याची सोय करावी लागेल. तेही वाटतं तितकं सोपं नाही. पण वेळ आलीच तर तोही उपाय अमलात आणावा लागेल.’

‘अरे, पण लक्षात कसं येत नाही तुझ्या! अशा रीतीनं सर्वच जण हवेतला ऑक्सिजन सिलिंडरमध्ये बंद करायला लागले तर सगळा ऑक्सिजन आटून नाही का जाणार! मग तुला मला श्वासोच्छ्वासातून तो कसा मिळणार?’

संबंधित बातम्या