आयुर्विमा पॉलिसी घेताना...

सुधाकर कुलकर्णी 
गुरुवार, 5 एप्रिल 2018

अर्थविशेष

आजकाल सुशिक्षित लोकांनी कोणती ना कोणती आयुर्विमा पॉलिसी घेतली असल्याचे दिसून येते असे असले तरी यातील बहुतेकांनी घेतलेली आयुर्विमा पॉलिसी योग्य असेलच असे नाही किंबहुना असे आढळून येते की बहुतांश लोकांनी चुकीची आयुर्विमा पॉलिसी घेतली असल्याचे दिसून येते. आयुर्विमा पॉलीसीबाबतच्या आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन विमा एजंट चुकीच्या पॉलिसी आपल्या गळ्यात मारीत असतो.

आयुर्विमा पॉलिसी घेताना होणाऱ्या चुका.

  • आयुर्विमा पॉलिसी घेण्यामागचा मूळ उद्देश, अकाली निधन झाल्यास आपल्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांसाठी पुरेशी आर्थिक तरतूद करणे हा अपेक्षित असतो. त्यादृष्टीने आपल्याला नेमक्‍या किती रकमेचे विमा संरक्षण (कव्हर) आवश्‍यक आहे याचा विचार करून पुरेसे कव्हर घेणे गरजेचे असते. (आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या सुमारे १२ ते १५ पट कव्हर असणे आवश्‍यक असते.) मात्र आपल्याला किती प्रीमियम देणे शक्‍य आहे हे पाहून आयुर्विमा पॉलिसी घेतली जाते. यामुळे अपुरे कव्हर घेतले जाते.
  • आयुर्विमा पॉलिसी घेतल्याने प्राप्तिकर वाचतो या बाबीस महत्त्व दिले जाऊन विमा कव्हर ही बाब महत्त्वाची मानली जात नाही. (कारण प्रीमियमची रक्कम प्राप्तिकर कलाम ८० सी नुसार करपात्र उत्पन्नातून वजावटीस पात्र असते.)
  • यानिमित्ताने काही बचत होत असल्याने तसेच मुदती नंतर आयुर्विमा पॉलिसी कव्हरच्या सुमारे दुप्पट ते तिप्पट इतकी मिळणार असते त्यामुळे बचतीचा हा एक पर्याय मानला जातो, मात्र यातून मिळणारा रिटर्न केवळ ५ ते ६ टक्के इतकाच असतो ही बाब ध्यानात येत नाही व यापेक्षा बचतीसाठी अन्य चांगल्या पर्यायाकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामत: भविष्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद होऊ शकत नाही.

वरील चुकांमुळे पॉलिसीच्या कालावधीत पॉलीसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास पॉलिसी कव्हर व साठलेल्या बोनसइतकी तुटपुंजी रक्कम मिळते व अशा अपुऱ्या रकमेमुळे वारसांठीची आर्थिक तरतूद अल्प कालावधीसाठीच होते.

आयुर्विमा पॉलिसी कशी घ्यावी.
कमीत कमी प्रीमियम देऊन जास्तीत जास्त कव्हर देणारी टर्म पॉलिसी घेणे जास्त योग्य ठरते यासाठी ‘टर्म पॉलिसी’ म्हणजे काय, तिची वैशिष्ट्ये व ती कशी घेता येते हे जाणून घेऊ.

  • टर्म पॉलिसी सर्वसाधारणपणे किमान १० व कमाल ४० वर्षाच्या कालावधीसाठी घेता येते मात्र पॉलिसीचा कालावधी व वयाची ७५ वर्षे यातील जे आधी असेल तेवढ्या कालावधीसाठी घेता येते. उदा: वयाच्या पंचविसाव्या वर्षी घेतल्यास वयाच्या पासष्ट वर्षापर्यंतच मिळू शकते. मात्र वयाच्या चाळीसाव्या वर्षी घेतल्यास वयाच्या पंचाहत्तरीपर्यंच (३५ वर्षासाठीच) घेता येते. एखाद्या निरोगी व्यक्तीने वयाच्या २५ व्या वर्षी रु. १ कोटीचे कव्हर घेतल्यास सुमारे रु. ८ ते ९ हजार इतका वार्षिक प्रीमियम पडू शकतो. (विमा कंपनीनुसार प्रीमियम कमी अधिक असू शकतो.) वाढत्या वयानुसार नव्याने घेण्यात येणाऱ्या पॉलिसीचा प्रीमियम वाढत जातो. मात्र एकदा ठरलेला प्रीमियम संपूर्ण पॉलिसी कालावधीसाठी बदलत नाही.
  • या पॉलिसीमध्ये फक्त ‘डेथ क्‍लेम’ दिला जातो. म्हणजे पॉलीसीधारकाचा पॉलिसी कालावधीत मृत्यू झाल्यास वारसास पॉलिसी कव्हरची रक्कम विमा कंपनीकडून दिली जाते. मात्र जर पॉलीसीधारक मुदती नंतर या पॉलिसीमध्ये येत असेल त्याला काहीही मिळत नाही.
  • टर्म पॉलिसीस सरेंडर व्हॅल्यू नसल्याने तारण ठेवून कर्ज मिळत नाही मात्र असाइन करता येते.
  • या पॉलिसीसोबत अपघाती मृत्यू, अपंगत्व यासारखे रायडर वाढीव प्रीमियम देऊन घेता येतात.

एन्डोमेंट पॉलिसी व टर्म पॉलिसी यातील टर्म पॉलिसी घेणे कसे फायद्याचे आहे हे खालील उदाहरणावरून लक्षात येईल.

सुनील व अनिल हे दोघेही ३० वर्ष वयाचे आहेत. यातील सुनीलने रु. १० हजार वार्षिक प्रीमियमची ३० वर्षे मुदतीची १ कोटी कव्हर असणारी टर्म पॉलिसी घेतली आहे. अनिलने ५० हजार वार्षिक प्रीमियमची  ३० वर्षे मुदतीची १० लाख कव्हर असणारी एन्डोमेंट पॉलिसी घेतली आहे असे समजू व पुढील प्रसंगात किती रक्कम मिळेल हे पाहू.

    सुनील                                                   अनिल
१) वयाच्या ४५ व्या वर्षी निधन     १ कोटी वारसास डेथ क्‍लेम मिळेल    रु. १७.५ लाख डेथ क्‍लेम 
    (हजारी रु. ५० प्रतिवर्षी बोनस प्रमाणे)
सुनीलने उर्वरित रु. ४०००० दरवर्षी गुंतविले आहेत असे गृहीत धरून
७ टक्के दराने १५ वर्षानंतर    १०.०५ लाख रुपये    
१२ टक्के दराने १५ वर्षानंतर    १४.९१ लाख रुपये    
१५ टक्के दराने १५ वर्षानंतर    १९.०३ लाख रुपये    
२) वयाच्या ६०व्या वर्षी दोघेही 
ह्यात असल्यास    काहीही रक्कम मिळणार नाही.    सुमारे ४० लाख रुपये मिळतील
सुनीलने उर्वरित रु. ४०००० दरवर्षी        
गुंतविले आहेत असे गृहीत धरून        
७ टक्के दराने ३० वर्षानंतर    ३७.७८ लाख रुपये    
१२ टक्के दराने ३० वर्षानंतर    ९६.५३ लाख रुपये    
१५ टक्के दराने ३० वर्षानंतर    १७३.८९ लाख रुपये    

संबंधित बातम्या