क्विझ
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018
क्विझ
क्विझचे उत्तर ः १) ब. २) क. ३) ड. ४) अ. ५) ब. ६) क. ७) ड. ८) ड. ९) ब. १०) अ. ११) ड. १२) ब. १३) अ. १४) क. १५) ड. १६) ड
- माजी केंद्रीय मंत्री रघनाथु झा यांचे निधन झाले. ते कोणत्या राज्यातले नेते होते?
अ) झारखंड ब) बिहार क) उत्तरप्रदेश ड) मध्यप्रदेश
- ICRA च्या अहवालानुसार, भारतात आरोग्यसेवेवरील सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक ही देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) च्या _____ पेक्षा कमी आहे.
अ) २.५ टक्के ब) ३.५ टक्के क) १.५ टक्के ड) ३ टक्के
- तुर्कस्तानच्या सरकारने कोणत्या जिल्ह्यासाठी ४५ किलोमीटर (२८ मैल) लांबीचा नियोजित कालवा मार्ग सुरू केला आहे ?
अ)अंकारा ब) पामक्कालुे क) अंताल्या ड) इस्तंबूल
- आधार कार्डाच्या सुरक्षिततेसाठी नवे वैशिष्ट्य सुरू करणार आहे. ते कोणते ते ओळखा.
अ) चेहऱ्याची ओळख ब) डी. एन. ए.
क) अ. आणि ब. ड) वरीलपैकी नाही.
- ’नेशन्स कप टूर्नामेंट फॉर ज्युनिअर ॲण्ड युथ वूमन २०१८‘ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
अ) टेबल-टेनिस ब) मुष्टियुद्ध
क) भारोत्तोलण ड) धावशर्यत
- पंतप्रधान मिहाई ट्युडोज यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या दक्षिण-पूर्व युरोपियन देशाचे पंतप्रधान होते?
अ) झेकोस्लोवाकिया ब) उरुग्वे क) रोमानिया ड) युगांडा
- सवोच्च न्यायालयाने अतिमहत्त्वपूर्ण प्रकरणांच्या सुनावणीसाठी भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ५ न्यायाधीशांचे एक संवैधानिक खंडपीठ तयार केले. या खंडपीठात कोणाचा समावेश नाही?
अ) न्या. ए. के. सिक्री ब) न्या. ए. एम. खानविलकर
क) न्या. डी. वाय. चंद्रचूड ड) न्या. जोसेफ कुरियन
- भारत सरकारच्या ‘खेलो इंडिया’चे गीत जाहीर झाले. त्यासंदर्भात कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा.
I - या गीताची संकल्पना ओगिलवाईद्वारे तयार केली गेली.
II - या गीताला फेडरल बॅंकद्वारा तयार केले गेले.
III - या गीताचे चलचित्रीकरण ‘निर्वाणा फिल्म्स‘ कडून केले गेले.
अ) I आणि II ब) I क) II आणि III ड) I आणण III
- जून २०१५ मध्ये आशियातल्या ’BBIN वाहन करारनामा’ (MVA) --- मध्ये कोणत्या देशाचा समावेश नाही?
अ) भारत ब) भूतान क) नेपाळ ड) बांगलादेश
- भारताचे राष्ट्रीय ज्ञान जाळे (NKN) आणि कोणत्या देशाच्या ’LEARN‘ जाळ्यादरम्यान गिगाबाईट कनेक्टिव्हिटी प्रस्थापित करण्यात आली?
अ) श्रीलंका ब) नेपाळ क) भूतान ड) अफगाणिस्तान
- भारतीय लष्कराचा स्थापना दिवस म्हणून दरवर्षी १५ जानेवारीला ‘लष्कर दिन‘ साजरा केला जातो. यावर्षी कितवा लष्कर दिन साजरा होत आहे?
अ) ३० वा ब) ४५ वा क) ६० वा ड) ७० वा
- राजस्थानच्या बिकानेरमध्ये कोणत्या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला?
अ) वाळवंट ब) उंट क) म्हारो देस ड) यांपैकी नाही.
- ’मेक इन इंडिया २.०‘ कार्यक्रमाचा शुभारंभ कोणत्या महिन्यात केला जाणार आहे?
अ) फेब्रुवारी २०१८ ब) मार्च २०२०
क) एप्रिल २०१८ ड) एप्रिल २०१९
- भारताच्या कोणत्या शेजारी राष्ट्रामध्ये चीनने इंटरनेट सेवा सुरू केली?
अ) बांगलादेश ब) पाकिस्तान क) नेपाळ ड) भूतान
- कोणत्या आखाती प्रदेशातील देशात महिलांना प्रथमच फुटबॉल क्रीडा मैदानामध्ये सामना प्रत्यक्ष बघण्याकरिता प्रवेश देण्यात आला?
अ) इराण ब) इराक क) कतार ड) सौदी अरेबिया
- सवोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यामधील वादात समेट घडवून आणण्यासाठी भारतीय बार मंडळाकडून समिती स्थापन करण्यात आली. या चार न्यायाधीशांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही?
अ) जे. चेलमेश्वर ब) रंजन गोगोई
क) एम. बी. लोकूर ड) ए. एम. खानविलकर