ओढ मृत्तिकेची!

प्रवीण दवणे
सोमवार, 22 जुलै 2019

चिंब पावसाळा : कविता
 

तशी रात्र दे, वादळी पावसाची!
मिठी राधिकेला, जणू सावळ्याची!
इंद्रातुनि मेघ आषाढ ओले
प्राणातुनि मोर बेभान डोले
पुन्हा साद दे रे... विजेला... विजेची!
तशी रात्र दे... वादळी पावसाची - १

बुडावी तशी वाट... मागे वळावी
कडी समजुतीची... नकळत निघावी
क्षितिजास दे रेघ... घन काजळाची
तशी रात्र दे... वादळी पावसाची - २

ऐल-पैल दोन्ही... आतुरलेले
थवे काजव्यांचे... पहा दूर गेले
धराया दिवा तो... ओढ मृत्तिकेची
तशी रात्र दे... वादळी पावसाची! - ३

Tags

संबंधित बातम्या