अवकाशातले सूक्ष्मजीव

रोहित हरीप
गुरुवार, 11 जानेवारी 2018

नोंदी
अंतराळात संशोधन करण्यासाठी नासा संस्थेने एक कायमस्वरूपी स्थानक अंतराळात उभारले आहे. या स्थानकाने अंतराळात आढळलेल्या काही सुक्ष्मजीवांचे नमुने पृथ्वीवर पाठवले आहेत. हा नमुनांच्या आधारे पृथ्वीबाहेर जीवसृष्टी आस्तिवात असल्याच्या दाव्याला बळकटी मिळाली आहे.

अमेरिकेतील नासा संस्था पृथ्वीबाहेर पसरलेल्या प्रचंड अवकाशात काय घडामोडी सुरू असतात याचा वेध घेण्याचे महत्त्वपूर्ण काम सातत्याने करत असते. या संस्थेच्या आजपर्यंतच्या संशोधनामुळे खगोलशास्त्राच्या विज्ञानात अत्यंत मोलाची भर टाकली आहे. 

अंतराळात संशोधन करण्यासाठी नासा संस्थेने एक कायमस्वरूपी स्थानक अंतराळात उभारले आहे. या स्थानकाने अंतराळात आढळलेल्या काही सुक्ष्मजीवांचे नमुने पृथ्वीवर पाठवले आहेत. हा नमुनांच्या आधारे पृथ्वीबाहेर जीवसृष्टी आस्तिवात असल्याच्या दाव्याला बळकटी मिळाली आहे. या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करून त्यांच्या डीएनएची रचना समजण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय अंतराळात जे अंतराळवीर मुक्काम करतात त्यांच्यावर वेळोवेळी औषधोपचार करण्यास मदत होणार आहे.

या सूक्ष्मजीवांच्या अभ्यासामुळे परग्रहावरील जीवसृष्टीची जनुकीय रचना, त्यांचे स्वरूप, त्यांची उत्क्रांती या बाबींचा उलगडा होण्यास मोठा हातभार लागणार आहे. अंतराळात एखाद्या सजीवांचे अस्तित्व सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. नासाकडून हे संशोधन करताना ’मिनियन’ नावाच्या विशेष उपकरणाचा वापर करण्यात आला.
 

संबंधित बातम्या