सौर रस्त्यांचा अभिनव पर्याय

रोहित हरीप
गुरुवार, 11 जानेवारी 2018

नोंदी
भारताने २०३० पर्यंत बॅटरीवर चालणारे जास्तीत जास्त वाहने रस्त्यावर वापरली जातील या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. जी वाहने बॅटरीवर चालतात त्यांचे चार्जिंग करणे या महामार्गावर सहज शक्‍य होणार आहे. या महामार्गाची निर्मीती करताना तीन थरांची रचना करण्यात आली आहे.

अपारंपारिक ऊर्जास्रोत ही काळाची गरज आहे हा बाब आता पुरेशी स्पष्ट झाली आहे. विकसित आणि विकसनशील देशांनी या स्रोतांचे महत्त्व लक्षात घेऊन त्याप्रकारे पुढील पन्नास वर्षांचे नियोजन सुरूही केले आहे. भारतानेदेखील २०३० पर्यंत बॅटरीवर चालणारे जास्तीत जास्त वाहने रस्त्यावर वापरली जातील या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.
आपला शेजारी चीननेदेखील महत्त्वाची पावले टाकण्यास सुरवात केली आहे. चीनच्या पुर्व भागातील शॅंडोग भागात फोटोव्होलटॅनिक महामार्गाची यशस्वी चाचणी घेतली आहे. जी वाहने बॅटरीवर चालतात त्यांचे चार्जिंग करणे या महामार्गावर सहज शक्‍य होणार आहे. या महामार्गाची निर्मीती करताना तीन थरांची रचना करण्यात आली आहे. सर्वांत पहिल्या थरात क्रॉकिंटचा अत्यंत पातळ पण पारदर्शक आणि मजबूत थर रचण्यात आला आहे. या थराखाली सोलर पॅनेल लावण्यात आले आहेत. शेवटच्या थरात या सोलर पॅनेलचा बचाव करण्यासाठी तसेच साठवण्यात आलेली ऊर्जा साठवण्यासाठी इनस्युलेटिंग मटेरियचा वापर करण्यात आला आहे. सध्या केवळ एक किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यात आला आहे. 
या रस्त्यावर लावण्यात आलेल्या सोलर पॅनेलच्या माध्यमातून एक महिन्यात सुमारे आठशे किलोवॅट वीजेची निर्मीती करण्यात येते. ही वीज थेट चीनच्या राष्ट्रीय वीज महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात येते.
या प्रकारच्या महामार्गाची निर्मिती करणारा चीन हा जगातील दुसरा देश आहे. चीनच्या आधी २०१६ मध्ये फ्रान्सने अशा प्रकारच्या महामार्गाची बांधणी केली होती.

संबंधित बातम्या