सोन्याचे जिवाणू!

रोहित हरीप
शुक्रवार, 9 मार्च 2018

नोंदी

जिवाणू हे घातक असतात. जिवाणूंमुळे साथीचे रोग , आजारांचा फैलाव होतो अशी प्राथमिक माहिती आपल्याला जीवाणूंबद्दल (Bacteria) असते. पण याशिवाय माणसाला उपयुक्त असलेले जिवाणूही असतात. काही महिन्यांपूर्वी प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणाऱ्या जिवाणूंचा शोध शास्त्रज्ञांनी लावला. या संशोधनामुळे प्लास्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येईल या गंभीर प्रश्‍नांवर आशेचा किरण दिसला. त्यानंतर आता सोन्यासारखा मूल्यवान धातू जैविक पद्धतीने तयार करणाऱ्या जिवाणूंचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.

खनिजांचे प्रमाण ज्या जमिनीत जास्त प्रमाणात आढळते त्या जमिनीतील मातीमध्ये जीवाणूंचे प्रमाण हे सर्वसामान्यपणे नगण्य असते.  ही खनिजे आणि धातू या जीवाणूंसाठी घातक ठरतात. मात्र

‘बॅक्‍टेरिया सी मेटॅलीड्युरन्स’ या नावाने ओळखले जाणारे हे चमत्कारिक जिवाणू मात्र या खनिजांचा चक्क खाद्य म्हणून वापर करतात, त्यावरच त्यांची वाढ होते. जिवाणूंची वाढ होत असताना हे जिवाणू सोन्याचे सूक्ष्म गोळे उत्सर्जित करतात. अमेरिकेतील मार्टिन ल्युथर किंग विद्यापीठ आणि जर्मनीमधील म्युनिच विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे काम करताना या जिवाणूंचा शोध लावला आहे. या जिवाणूंचा आकार दंडगोलाकारकृती आहे. हे जिवाणू हे सोन्याचे अतिसूक्ष्म गोळे मागे सोडतात  ते सोने दुय्यम प्रतीचे मानले जात असले तरी प्राचीन काळातील सोन्याच्या खाणींमध्ये या प्रकारच्या सूक्ष्मजीवांचे अवशेष आढळून आले आहेत. 

संबंधित बातम्या