ऑस्कर गोज टू...

Sakal Saptahik
बुधवार, 21 मार्च 2018

विशेष

आंतरराष्ट्रीय चित्रपट रसिकांचे लक्ष लागलेला नव्वदावा आॅस्कर चित्रपट पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लॉस एंजलीस येथे पार पडला. ऑस्कर सोहळा हा केवळ चित्रपटांसंबंधी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांपुरता मर्यादित नसतो, तर जगभरात घडणाऱ्या सामाजिक - राजकीय व आर्थिक घडामोडींचे पडसाद या सोहळ्यात उमटत असतात. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा अनेक कारणांनी गाजला. तब्बल तेरा मानांकने मिळवूनही केवळ चार ऑस्कर पुरस्कार मिळवणारा ‘द शेप ऑफ वॉटर’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणाऱ्या फ्रान्सिस मॅकडरमॉण्डने पुरस्कार स्वीकारताना चित्रपटसृष्टीत महिलांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीवर तिखट शब्दात टीका केली. तर लैंगिक शोषणामुळे चर्चेत राहिलेल्या हार्वी वाईन्स्टिन आणि या निमित्ताने लैंगिक शोषणाविरुद्ध सुरू झालेल्या #MeToo मोहिमेचा प्रभाव या सोहळ्यावर जाणवत होता.

सर्वोत्कृष्ट चित्रपट : दी शेप ऑफ वॉटर
नामांकन 

 •  कॉल मी बाय युवर नेम
 •  डार्केस्ट अवर
 •  डंकर्क 
 •  गेट आउट
 •  लेडी बर्ड
 •  फॅंटम थ्रेड
 •  द पोस्ट
 •  थ्री बिलबोर्डस आउटसाइड एबिंग

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : गिआर्मो डेल तोरो 
(दी शेप ऑफ वॉटर)

नामांकन 

 •  ख्रिस्तोफर नोलन (डंकर्क)
 •  जॉर्डन पिले (गेट आउट)
 •  ग्रेटा जर्विग (लेडी बर्ड) 
 •  पॉल थॉमस अँडरसन 
 •    (फॅंटम थ्रेड)

सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट : 
अ फॅंटास्टिक वुमन (चिली)

नामांकन 

 •  द इन्सल्ट (लेबनॉन)
 •  लव्हलेस (रशिया)
 •  ऑन बॉडी ॲण्ड सोल (हंगेरी)
 •  द स्क्वेअर (स्वीडन)

सर्वोत्कृष्ट अभिनेता : गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट अवर)
नामांकन 

 •  टिमोथी शॅलमेट (कॉल मी बाय युवर नेम)
 •  डॅनिअल डे-लेविस (फॅंटम थ्रेड)
 •  डॅनिअल कालूया (गेट आउट)
 •  डॅन्झेल वॉशिंग्टन (रोमन जे इस्राईल)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : सॅम रॉकवेल 
(थ्री बिलबोर्ड्‌स आउटसाइड एबिंग)
नामांकन 

 •  विल्यम डफेई (द फ्लोरिडा प्रोजेक्‍ट)
 •  वूडी हॅरेलसन (थ्री बिलबोर्डस आउटसाइड एबिंग)
 •  रिचर्ड जेनकिन्स (द शेप ऑफ वॉटर)
 •  ख्रिस्तोफर प्लमर (ऑल द मनी इन द वर्ल्ड)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : सॅम रॉकवेल 
(थ्री बिलबोर्ड्‌स आउटसाइड एबिंग)
नामांकन 

 •  विल्यम डफेई (द फ्लोरिडा प्रोजेक्‍ट)
 •  वूडी हॅरेलसन (थ्री बिलबोर्डस आउटसाइड एबिंग)
 •  रिचर्ड जेनकिन्स (द शेप ऑफ वॉटर)
 •  ख्रिस्तोफर प्लमर (ऑल द मनी इन द वर्ल्ड)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रान्सिस मॅकडरमॉण्ड 
(थ्री बिलबोर्डस आउटसाइड एबिंग)
नामांकन 

 •  सॅली हॉकिन्स (द शेप ऑफ वॉटर)
 •  मार्गोट रोबी (आय टोन्या) 
 •  मेरिल स्ट्रीप (द पोस्ट)
 •  सेओरिस रोनन (लेडी बर्ड)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : ॲलेक्‍झांडर डेसप्लॅट (दी शेप ऑफ वॉटर)
नामांकन :  हान्स झिमर, (डंकर्क)   जॉनी ग्रीनवूड (फॅंटम थ्रेड)   
                 कार्टेल बरवेल (थ्री बिलबोर्डस आउटसाइड एबिंग)

सर्वोत्कृष्ट संपादन : डंकर्क
नामांकन 

 •  बेबी ड्रायव्हर
 •  आय टोन्या
 •  द शेप ऑफ वॉटर
 •  थ्री बिलबोर्डस आउटसाइड एबिंग

सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट : कोको
नामांकन 

 •  द बॉस बेबी
 •  द ब्रेडविनर
 •  फर्डिनांड
 •  लव्हिंग विन्सेंट

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री 
ॲलिसन जॅनी (आय टोन्या) 
नामांकन 

 •  मेरी ब्लिज (मडबाऊंड)
 •  लेस्ले मॅनव्हिले (फॅंटम थ्रेड)
 •  लॉरी मेटकाफ (लेडी बर्ड)
 •  ऑक्‍टाव्हिया स्पेन्सर (द शेप ऑफ वॉटर)

ऑस्कर सोहळ्याची वैशिष्ट्ये

 • जेम्स आयव्हरी या ८९ वर्षीय लेखकाने सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा या विभागात पटकावलेला पुरस्कार.
 • मेक्‍सिकोचे दिग्दर्शक गिआर्मो डेल तोरो यांनी पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांच्यावर टीकेचे आसूड ओढले.
 • भारताचे दिवंगत अभिनेते शशी कपूर आणि लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी यांना या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली.
 • ‘अ फॅंटास्टिक वूमन’ (चिली) या चित्रपटाची अभिनेत्री डॅनीयला वेगा ही ऑस्कर पटकवणारी पहिला महिला ट्रान्सजेंडर कलाकार ठरली.

फोटो फीचर

संबंधित बातम्या