समृद्धीने परिपूर्ण देश

आशा रमेश होनवाड
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

मलेशिया हा असा देश आहे जेथे मलाया, चायनीज, भारतीय व श्रीलंकन अशा विविध वंशाचे लोक आनंदाने, शांतपणे एकत्र नांदतात. जुन्या, नव्या परंपरांचा समतोल येथे दिसतो. या तांत्रिक देशाचे आर्किटेक्‍चर साऱ्या जगभर प्रसिद्ध आहे. उंच उंच गगनचुंबी इमारती, फाईव्हस्टार हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स या साऱ्या गोष्टी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. ‘रिंगेट’ हे येथील चलन आहे. मलेशियातील क्वालालंपूर, पेनांग, लॅंगकावी या ठिकाणी आम्ही भेट दिली. क्वालालंपूर अतिशय सुनियोजित शहर ही मलेशियाची राजधानी आहे. येथील ‘इस्ताना नगारा’ हे मलेशियाच्या राजाच्या राहण्याचे ठिकाण ओल्ड पॅलेसमध्ये वस्तुसंग्रहालय आहे.

मलेशिया हा असा देश आहे जेथे मलाया, चायनीज, भारतीय व श्रीलंकन अशा विविध वंशाचे लोक आनंदाने, शांतपणे एकत्र नांदतात. जुन्या, नव्या परंपरांचा समतोल येथे दिसतो. या तांत्रिक देशाचे आर्किटेक्‍चर साऱ्या जगभर प्रसिद्ध आहे. उंच उंच गगनचुंबी इमारती, फाईव्हस्टार हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स या साऱ्या गोष्टी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. ‘रिंगेट’ हे येथील चलन आहे. मलेशियातील क्वालालंपूर, पेनांग, लॅंगकावी या ठिकाणी आम्ही भेट दिली. क्वालालंपूर अतिशय सुनियोजित शहर ही मलेशियाची राजधानी आहे. येथील ‘इस्ताना नगारा’ हे मलेशियाच्या राजाच्या राहण्याचे ठिकाण ओल्ड पॅलेसमध्ये वस्तुसंग्रहालय आहे. के एल टॉवरला वरपर्यंत लिफ्टने जाता येते. बाल्कनीतल्या काचेवरुन चालताना काचेखालून संपूर्ण शहर दिसते. सर्व देशांचे टॉवर्स येथे चित्रफितीमध्ये पाहायला मिळतात. ‘नॅशनल मूव्हमेंट’ येथे देशासाठी आहुती देणाऱ्या वीर जवानांचे स्तंभ व पुतळे दिसतात. छोटे तलाव व फुलझाडांनी आजूबाजूचा परिसर सुशोभित केला आहे. ओल्ड केटीएम हे ब्रिटिश काळातले जुने स्टेशन आहे. मर्डेका स्क्वेअर येथे ३१ ऑगस्ट १९५७ चा स्वातंत्र्यदिन या चौकात साजरा होतो. ‘के एल बर्ड पार्क’ हे शहराच्या मध्यभागी आहे. २० एकरमध्ये पसरलेले हे बर्ड पार्क सुंदर आहे. मुक्तपणे फिरणारे रंगीबेरंगी पक्षी बघत २-३ तास कसे निघून जातात ते समजतही नाही. 

पेट्रोनास जुळे मनोरे 
क्वालालंपूर शहरातील जुळ्या गगनचुंबी इमारती म्हणजे हे ट्विन टॉवर. १९९८ मध्ये याचे बांधकाम पूर्ण झाले. हे मनोरे ८६ मजली असून ८४ व्या मजल्यापर्यंत जाता येते. प्रशस्त मॉल्स, कॅसिनो, मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ, विविध रेस्टॉरंट, मोठमोठे एलसीडी टीव्ही, म्युझिक, लायटिंग अशा या रंगीत दुनियेत ४-५ तास मजेत घालवता येतात.  इथल्या बाटू केव्ह बघायला २७० पायऱ्या चढून जावे लागते. गणपती, शंकर पार्वती, मारुती यांची मंदिरे या गुहेत आहेत. कार्तिकेयचा मोठा पितळी पुतळा येथे आहे. चॉकलेट आऊटलेट येथे सगळ्या प्रकारची चॉकलेट्‌स मिळतात.

मोठमोठ्या उंच इमारती, लहान पण स्वच्छ सुंदर रस्ते, सुरळीतपणे चालणारी वाहतूक, प्रदूषणमुक्त, मोठमोठे मॉल्स, शॉपिंग सेंटर, फ्लाय ओव्हर्स, रस्त्याच्या चौकाचौकात लावलेले प्रचंड मोठे एलसीडी हे सर्व बघताना येथील लोकांची सधनता, ऐश्‍वर्य संपन्नता दिसून येते. गर्व्हमेंटच्या विनामूल्य आरामदायी बससेवेचा अनुभव ट्‌वीन टॉवरचे रात्रीचे लायटिंग बघायला गेलो तेव्हा घेतला. रात्रीच्या वेळी रस्त्यावर खूपच झगमगाट व मनोरंजनाचे कार्यक्रम असतात. ऐतिहासिक वास्तूंची जपणूक चांगल्या प्रकारे केली आहे. एकंदरीत क्वालालंपूर शहर एकदमच आवडले. 

पूत्रजया
ही मलेशियाची प्रशासनिक राजधानी. गर्व्हमेंटची सर्व ऑफिसेस या भागात आहेत. प्राइम मिनिस्टर कार्यालय खूप छान आहे. 

फोर्ट कॉर्नवॉलिर
हा किल्ला ब्रिटिश इंडिया कंपनीने १७८६ मध्ये बांधला. १९५७ साली ब्रिटीशांकडून मलेशियाकडे पेनांग बेट परत आले. तेव्हापासून या वास्तूला ऐतिहासिक दर्जा प्राप्त झाला. किल्ल्याच्या आतील मैदानावर आजही राष्ट्रीय समारंभ साजरे केले.

बोटॅनिकल गार्डन 
येथे छोट्या मिनीकारमधून पूर्ण बागेत फिरवतात. गार्डनचा परिसर मोठा असून खूप दाट झाडी आहे.  २-३ ठिकाणी धबधबा, फुलझाडे यांचे सौंदर्य अनुभवता येते. समुद्रावर बांधलेला पेनांग ब्रीज आशिया खंडातील एक मोठा ब्रीज असून त्याची लांबी २४ किमी आहे. बाटु फिरंगी बीच, चहा, कॉफी आऊटलेट, बाटीक न्युटीक ही ठिकाणेही आवर्जून पहावीत.

लॅंगकावी
पेनांग ते लॅंगकावी हा अडीच तासांचा फेरीबोटीचा प्रवास अत्यंत आवडते ठिकाण. हे आयलॅंड आणि इथले बिचेस अतिशय सुंदर आहेत. निसर्गरम्य परिसर, हिरवीगार दाट झाडी, कुठेही गेल्यावर भेटणारे स्वच्छ मुलायम रेतीचे समुद्रकिनारे, छोटी १-२ मजली घरे व अवघी १ लाख लोकवस्ती असलेले हे बेट पाहता क्षणीच आवडून जाते. सुंदर सुंदर टेकड्या, दऱ्या, जंगल, समुद्रकिनोर, धबधबे या साऱ्याचा अनुभव लॅंगकावीत घेता येतो. 

रेडिश ब्राऊन इगल (गरुड पक्षी) हा लॅंगकावीचा सिम्बॉल आहे. इगल स्क्वेअर येथे गरुडाचा खूप मोठा स्तंभ अगदी प्रशस्त जागेत बांधला आहे. जवळच्या शॉपिंग सेंटर्समध्ये ईगलच्या अनेक वस्तू ठेवल्या आहेत. येथे लकी टेम्पल हे चायनीज लोकांचे मोठे टेम्पल आहे. ब्लॅक सॅण्ड बीचला वाळू काळ्या रंगाची दिसते. तानजंग (tan jung) हा एक पांढऱ्या वाळूचा समुद्र किनारा आहे. हॉट स्पिंगप्रमाणे येथे गरम पाण्याचे झरे आहेत. हॅंडीक्राफ्ट कॉम्लेक्‍समध्ये मलेशियातील हाताने तयार होणाऱ्या सर्व वस्तू विक्रीसाठी असतात. 

समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी आयलंड हॉपिंग टूर करायला हवी. ही एकूण तीन तासाची फास्ट स्पीड बोट फेरी असते. आयलंडच्या वेगवेगळ्या भागातून आपण फिरतो. लॅंगकावी स्काय केबलकारने वरती उंच गेल्यावर वरून दिसणारे सृष्टिसौंदर्य अवर्णनीय असते. वरती फिरण्यासाठी एक मिनीट्रेन आहे. खाली स्कायडोम, स्काय रेक्‍स व थ्री डायमेन्शनल फोटो स्टुडिओ आहे. येथे सेलिब्रेटी व इतर अनेक वेगवेगळे फोटोज काढता येतात. हा जगातला दोन नंबरचा मोठा स्टुडिओ आहे.

येथून आमचे राहण्याचे ठिकाण ५ ते १० मिनिटांच्या अंतरावर होते. अतिशय निसर्गरम्य परिसर, निळ्याशार डोंगरांच्या कुशीत व रिसॉर्टला लागूनच खाली अथांग समुद्र रिसॉर्टचा परिसर खूप मोठा व सर्व सुखसोयींनी युक्त असा आहे. 

नीरव शांतता व निसर्गरम्य परिसरातले लॅंगकारी बेट पाहताक्षणीच आवडते. 

सिंगापूर 
दक्षिणपूर्व आशिया खंडात सिंगापूर हे जगातले प्रमुख पर्यटन व व्यापाराचे केंद्र आहे. निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेला लहानसा पण विकसित असा हा देश सर्व सुखसोयींनी समृद्ध आहे. 
पर्यटन हा येथील प्रमुख उद्योग दरवर्षी लाखो पर्यटक सिंगापूरला भेट देतात. आर्थिक केंद्र, शॉपिंग सेंटर्स, आलिशान हॉटेल्स, टेस्टी फूड, नाईट लाइफ व मनोरंजन नगरी या सगळ्यांसाठी सिंगापूर प्रसिद्ध आहे. या सर्वांसाठी जगातल्या पाच देशामध्ये सिंगापूरचा समावेश होतो. 

सिंगापूरमधील गार्डन्स जगात प्रसिद्ध आहे. ‘गार्डन बाय दी बे’ हे जगातल्या दहा गार्डनमधील एक गार्डन आहे. या गार्डनचे वर्णन शब्दात करणेच कठीण. या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी. येथील लाइट अँड म्युझिक शो रोज रात्री ८ वाजता असतो. तो पण अप्रतिम असतो. 

सेंटोसा
 हे सिंगापूरमधील पर्यटकांचे एक महत्त्वाचे आकर्षण केंद्र आहे. किल्ला, ऐतिहासिक म्युझियम, ॲक्वेरिअम, टायगर स्काय टॉवर, कॅसिनो, युनिव्हर्सल स्टुडिओ, मादाम तुसाड्‌स, मरिना बे सॅण्ड रिसॉर्ट ही सर्व प्रेक्षणीय ठिकाणे याच भागात येतात. या सर्व गोष्टी बघण्यात आठ दिवस घालवले, तरी ते कमीच पडतात. युनिर्व्हसल स्टुडिओतल्या चित्तथरारक राईडस्‌, हॉलिवूड, कॅरॅक्‍टर शोज, वॉटर वर्ल्ड, ज्युरासिक पार्क हे सगळं अनुभवताना आपण एका वेगळ्याच जगात जातो. 

मरिना बे येथेही पर्यटक आवर्जून भेट देतात. मरिना बे सॅंड रिसॉर्ट, सिंगापूर फ्लायर येथून सिंगापूर शहर बघता येते. मरलायन पार्क येथील लायन हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. याच्या जवळचा ज्युबिली ब्रीज व समोरचा हेलिक्‍स ब्रीज दोन्हीही अतिशय सुंदर आहेत. मरिना बे सिटी गॅलरी, आर्टस, सायन्स म्युझियम ही सर्व प्रेक्षणीय ठिकाणे याच भागातली. सिंगापूर सिव्हरच्या बाजूने हा सर्व परिसर उंच उंच इमारती, मॉल्स, हॉटेल्स, रिसॉर्टस्‌, ब्रीज यांनी सजलेला आहे. रात्रीची ही झगमगती दुनिया लाइट अँड म्युझिक शो मधून नदीच्या किनाऱ्यावर बसून बघण्यात वेगळाच आनंद आहे. 

ज्युराँग बर्ड पार्क
हे आशियातले एक मोठे बर्ड पार्क आहे. अनेक देशातले वेगवेगळे ५ हजार पक्षी येथे दिसतात. दोन बर्ड शोज सकाळी १० व ११ वाजता असतात. बर्डस आय टूर गाडी किंवा ट्राम राईडने पूर्ण पार्क बघता येते. खरेदीसाठी मुस्तफा मार्केटला भेट द्यायला हवी. 

चाळीस मिनिटांच्या ट्राम राईडमध्ये जंगलातून रात्री फिरणे व जंगलात मोकळे फिरणारे प्राणी डोळ्याने बघणे हा वेगळा अनुभव नाईट सफारीत घेता येतो. 
सर्व सुखसोयींनी समृद्ध असलेले स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त असे हे दोन्ही देश. या देशांनी केलेली प्रगती बघून आपण स्तिमित होऊन जातो.

फोटो फीचर

संबंधित बातम्या