पर्यटनाचा बदलता ट्रेंड

मयूरेश कुलकर्णी
शनिवार, 13 जानेवारी 2018

युथ ट्रॅव्हल
पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रमापेक्षा एखादा अनुभव किंवा सहल जास्त शिकवून जाते. परदेशी भेटीमुळे स्वच्छता, स्वावलंबन, कृतीद्वारे अभ्यास, सॉफ्ट स्किल्स अशा वेगळ्या नीती-मूल्यांची शिकवण मिळते. एक प्रवासी म्हणून युथ ट्रॅव्हलकडे न पाहता अभ्यासक म्हणून मुलांनी अशा सहलींमध्ये पालकांबरोबर सहभाग घेतल्यास त्याचा फायदा मुलांच्या अभ्यासापुरता मर्यादित न राहता समाज घडविण्यास होऊ शकतो.

पर्यटन म्हटले की, शैक्षणिक सहली किंवा तरुण वर्ग सहली (Youth Travel) या टुरिझम क्षेत्रातले एक महत्त्वाचे अंग गणले जाते. जर्मनी, जपान, अमेरिका अशा देशांमध्ये फक्त युथ ट्रॅव्हल या विषयांवर प्रदर्शन, सेमिनार आणि परिसंवाद होतात. अशा या तरुण वर्गातील सहलींबाबत आपण जाणून घेऊ.
तरुण वर्गाचे भारतात फिरण्याचे प्रमाण सध्या कमी असले तरी बदलत्या काळात हे चित्र पालटेल. प्रथम शिक्षण, नोकरी, लग्न आणि नंतर मोठी सहल असा पूर्वीचा जो समज होता, त्यात बदल घडताना दिसतोय. तरुण मंडळींना हटके जागा पाहायच्या असतात, जास्त फिरायचे असते आणि जास्त वेळ व पैसा खर्च करायचा असतो. पुढील दहा वर्षात तरुण पर्यटकांच्या संख्येत साठ टक्के वाढ अपेक्षित आहे. काही देशांमध्ये बिझनेस ट्रॅव्हलपेक्षा युथ ट्रॅव्हलमुळे जास्त फायदा झाल्याचे दिसून येते.

नवीन युगातील फिरस्ते !
टुरिझम इंडस्ट्री अशा रूपात आपण जर पाहिले तर ‘युथ ट्रॅव्हल‘ या सेगमेंटमुळे इंडस्ट्रीला खूप मोठे फायदे होतात. या क्षेत्रात युथ ट्रॅव्हलचा प्रभाव हा फक्त आर्थिकदृष्ट्या न राहता तो सांस्कृतिकदृष्ट्या पण बदल घडवून आणतो.
WYSE Travel च्या नुसार युथ ट्रॅव्हल क्षेत्रातील काही ठळक नोंदी.

  • आंतरराष्ट्रीय सहलीत ‘युथ ट्रॅव्हल‘ क्षेत्रांमध्ये २३ टक्के सहभाग दिसून आला आणि २०१६ या वर्षात एकूण फिरस्त्यांची संख्या ही २८६ मिलियन एवढी दिसून आली.
  • वर्ष २०१६ मध्ये युथ ट्रॅव्हलमुळे ३०० बिलियन USD एवढी उलाढाल झाली. बॅक पॅकर्स, गॅप- इयर स्टुन्डट्‌स, इंटर्न्स, असे जे टुरिस्ट आहेत हे विद्यार्थी इतर टुरिस्टपेक्षा जास्त खर्च करतात असे आढळले.
  • दोन महिन्यांच्या सहलींमध्ये साधारण ३००० USD म्हणजे जवळ-जवळ २ लाख रुपये खर्च केलेला दिसला.
  • युथ ट्रॅव्हल या क्षेत्राला महत्त्व आहे कारण जो प्रवास होतो त्यासाठी काही ठराविक उद्दिष्ट असते. जसे की शैक्षणिक सहल, एक्‍स्चेंज प्रोग्रॅम, सांस्कृतिक देवाण-घेवाण, परदेशी भाषा शिक्षण, इंटर्नशिप किंवा वर्क - ट्रॅव्हल. या क्षेत्रामुळे कलेमध्ये, अभ्यासात, अनुभवात आणि स्किल सेटमध्ये बदल घडताना दिसतो आणि याचा फायदा समाजाला मिळतो.
  • एकंदरीतच युथ ट्रॅव्हलर हे एक ट्रेंड सेटर असतात जे हटके किंवा अनोळखी जागांना भेटी देतात, ते स्वतः कुठेही व कसेही ॲडजस्ट करतात आणि जागतिक ट्रॅव्हल इंडस्ट्रीला नवीन काहीतरी देऊ इच्छितात.

भारतातील - युथ ट्रॅव्हल
जर भारतातील चित्र आपण अभ्यासले तर असे दिसते की भारतातले युथ ट्रॅव्हल हे अभ्यास सहली, समुद्र , ट्रेकिंग एवढ्यापुरते मर्यादित दिसते. इंटर्नशिप, गॅप -इयर प्रवास, वर्क-ट्रॅव्हल अनुभव, स्किलसेट ट्रेनिंग, परदेशी भाषा सहली, आंतरराष्ट्रीय सहलींचे अजून तरुण वर्गांना पुरेशी माहिती व ज्ञान मिळालेले नाही. एक प्रवासी म्हणून युथ ट्रॅव्हलकडे न पाहता अभ्यासक म्हणून मुलांनी अशा सहलींमध्ये पालकांबरोबर सहभाग घेतल्यास त्याचा फायदा मुलांच्या अभ्यासापुरता मर्यादित न राहता समाज घडविण्यास होऊ शकतो. एखाद्या आंतरराष्ट्रीय सहलींमधून बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक, मानसिक, बदल घडताना दिसतात. सांस्कृतिक देवाण-घेवाण, परदेशी भाषा, कला, स्वावलंबन या बाबींमुळे मुलांमध्ये चांगला परिणाम घडताना दिसतो.

पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रमापेक्षा एखादा अनुभव किंवा सहल जास्त शिकवून जाते. परदेशी भेटीमुळे स्वच्छता, स्वावलंबन, कृतीद्वारे अभ्यास, सॉफ्ट स्किल्स अशा वेगळ्या नीती-मूल्यांची शिकवण मिळते.

जर टूर कंपन्या, शैक्षणिक संस्था, पालक आणि विद्यार्थी यांनी ‘युथ-टुरिझम‘साठी सकारत्मकतेने एकत्रितरीत्या काही पावले उचलल्यास त्याचा परिणाम आपणास चांगला दिसून येईल. 

संबंधित बातम्या