गोल्डन ग्लो

स्वप्ना साने
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

कव्हर स्टोरी

विजयादशमी म्हणजेच वाईटावर चांगल्या शक्तीच्या विजयाचे प्रतीक! या दिवशी सोनेही उधळतात, अर्थातच शब्दशः नाही, पण त्याचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने एकमेकांना देतात आणि हा विजयोत्सव साजरा करतात. ‘सोने देणे’ यामागे पौराणिक कथा आहेच; पण आज आपण बघूया, आपल्या सौंदर्य शास्त्रात या सोन्याचे काय महत्त्व आहे ते! 

आयुर्वेदातसुद्धा सोन्याला फार महत्त्व दिले आहे. सुवर्ण भस्म, सुवर्ण प्राश याचा उपयोग निरोगी त्वचा, तल्लख बुद्धी आणि शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठीही केला जातो. असे म्हणतात की यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स आहेत, जी पिगमेंटेशन आणि स्किन टॉक्सिसिटीसाठी कारणीभूत असलेले त्वचेमधील हानीकारक फ्री रॅडीकल नष्ट करतात. 

हल्ली बऱ्याच ब्यूटी प्रॉडक्टमध्ये ‘गोल्ड’चे लेबल असते, उदा. गोल्ड जेल, गोल्ड पॅक, गोल्ड फेशियल, गोल्ड स्पा इत्यादी. एवढेच नाही तर, गोल्ड ब्लीच आणि गोल्डन ग्लो सिरमसुद्धा उपलब्ध आहेत. 

गोल्डचे नॅनो पार्टीकल्स म्हणजेच कोलॉइडल गोल्ड कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स तयार करण्यात उपयोगी आहेत. गोल्ड फेस मास्कमध्ये गोल्ड फॉईलचा उपयोग होतो. तर सुवर्ण भस्माचा उपयोग काही ग्लो क्रीम्स आणि जेल तयार करण्यासाठी होतो. 

गोल्ड फेशियलचे बरेच फायदे आहेत. जसे अँटी एजिंग इफेक्ट, टॅन कमी करण्यासाठी, त्वचा तजेलदार आणि ग्लोइंग दिसण्यासाठी. हे फेशियल सर्व स्किन टाइप्ससाठी उपयोगी आहे. फक्त तज्ज्ञांकडून किंवा ब्यूटी थेरपिस्टकडून हे फेशियल करावे आणि चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट 
वापरले जातात ना याची माहिती करून घ्यावी.

गोल्डन ग्लोसाठी क्विक टिप्स

  • चिमूटभर हळद आणि १ चमचा मध चांगले मिक्स करून १५ मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवावे. नंतर गार पाण्याने धुऊन घ्यावे. त्वचा खुलून दिसेल. 
  • कुंकुमादी तेल हे आयुर्वेदिक असून त्वचेवरील काळे डाग, सुरकुत्या कमी करते. रोज रात्री झोपण्यापूर्वी याचे काही थेंब चेहऱ्याला लावून हळुवार मसाज करावा. काही दिवसातच फरक जाणवेल.
  • केशराच्या २-४ काड्या एक चमचा मधात ५ मिनिटे ठेवून मग हा गोल्डन पॅक लावावा. १५ मिनिटांनी गोल्डन ग्लो दिसेलच. 
  •  हे सर्व उपाय करण्याआधी चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा आणि पॅक धुतल्यानंतर मॉइस्चरायझिंग करावे. 
  •  मेकअप करताना गोल्ड टिन्टेड सिरमचा वापर करावा. मस्त गोल्डन ग्लो दिसेल. तुम्ही गोल्ड हाय लायटरचादेखील वापर करू शकता. 
  • दसऱ्याच्या निमित्ताने सोने वाटताना त्वचेवरही सोन्यासारखी कांती दिसायला हवी. त्यासाठी वरील उपाय नक्की करून बघावेत.

संबंधित बातम्या