स्पर्धा परिक्षा : क्विझ

मुकुल रणभाेर
गुरुवार, 11 जानेवारी 2018

क्विझ

१.     राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती कोणते सरकार करते.
    अ. केंद्र सरकार ब. राज्य सरकार
    क. जिल्हा परिषद ड. महानगरपालिका

२.    समान तापमान असणाऱ्या बिंदूना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला........ रेषा म्हणतात.
    अ. समभार ब. समपर्जन्य क. समताप ड. समोच्चता

३.    इंदिरा गांधी कालवा ............... राज्याच्या वायव्य भागात आहे.
    अ. गुजरात ब. राजस्थान क. उत्तर प्रदेश ड. मध्य प्रदेश

४.    सर्वांत जास्त जंगलाखालील प्रदेश कोणत्या राज्यात आहे?
    अ. उत्तर प्रदेश ब. मध्य प्रदेश क. आसाम ड. हरियाना

५.    रिश्‍टर स्केल हे ......... तीव्रता मोजण्याचे एकक आहे.
    अ. भूपट्ट निर्मिती ब. ज्वालामुखी क. भूकंप ड. मंद हालचाली

६.    सूर्याचा व्यास सुमारे ----- आहे.
    अ. १३ कोटी कि.मी. ब. बारा लाख चौ.कि.मी. 
    क. ४२ लाख कि.मी. ड. ३३ दशलक्ष मीटर

७.    ’बैराट’ या सातपुडा पर्वतातील शिखराची उंची किती?
    अ. १२७७ मीटर ब. ११७७ मीटर
    क. १२१५ मीटर ड. ११९१ मीटर

८.    १) विषुववृत्तीय प्रदेशात ऋतू बदलत नाहीत. २) तेथे वर्षभर तापमान सारखे असते.
    अ. १ व २ बरोबर असून २ हे १ चे कारण आहे  ब. १ व २ बरोबर असून २ हे १ चे कारण नाही क. १ बरोबर, २ चूक
    ड. १ चूक, २ बरोबर 

९.    १५ ते ६० वर्षे वयोगटाला कोणती लोकसंख्या म्हणतात.
    अ. कार्यप्रवण ब. परावलंबी क. वाढती ड. स्वावलंबी

१०.    हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे?
    अ. कावेरी ब. गोदावरी क. महानदी ड. शरावती

११.    ’गीतगोविंद’चे लेखन कोण?
    अ. विशाखादत्त ब. जयदेव क. भास ड. विष्णुशर्मा

१२.    महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरचे पहिले मुख्यमंत्री कोण?
    अ. मोरारजी देसाई ब. यशवंतराव चव्हाण 
    क. वसंतराव नाईक ड. मारोतराव कन्नमवार
१३.    एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय?
    अ. शेर्पा तेनसिंग ब. फू. दोरजी 
    क. शेर्पा रामसिंग ड. संतोष यादव

१४.    सर्वाधिक काळ राष्ट्रपती पदावर राहिलेली व्यक्ती कोण होते?
    अ. डॉ. राजेंद्रप्रसाद ब. डॉ. राधाकृष्णन
    क. वराह व्यंकट गिरी ड. झाकिर हुसेन

१५.     महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहिलेली व्यक्ती कोण?
    अ. शरद पवार ब. वसंतराव नाईक
    क. यशवंतराव चव्हाण ड. वसंतदादा पाटील

१६.    कर्णम मल्लेश्वरी ही महिला कोणत्या खेळामध्ये प्रसिद्ध आहे?
    अ. तिरंदाजी ब. मुष्टियुद्ध क. वजन उचलणे ड. बॅडमिंटन

१७.    पहिले भारतीय क्रिकेट कसोटीपटू कोण?
    अ. दिलीपसिंह ब. के. एस. रणजितसिंहजी 
    क. सी. के. नायडू ड. मेजर ध्यानचंद

१८.    भारत सरकारने राष्ट्रीय कॅलेडरचा स्वीकार कोणत्या दिवशी केला?
    अ. २६ जानेवारी १९५५ ब. २ ऑक्‍टोबर १९५६
    क. २२ मार्च १९५७  ड. २२ जुलै १९४७

१९.    लमाण हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
    अ. प्र.के. अत्रे ब. श्रीराम लागू क. नामदेव ढसाळ ड. चंदनशीव

२०.    शांतिवन हे कुणाचे समाधी स्थान आहे?
    अ. लाल बहादूर शास्त्री ब. पंडित नेहरू 
    क. राजीव गांधी ड. श्रीमती इंदिरा गांधी

२१.    हिमालयातील एव्हरेस्ट हे शिखर ल्व्हाक्‍पा शेर्पा यांनी किती वेळा यशस्वीपणे पादाक्रांत केले?
    अ. पाच ब. नऊ क. सात ड. सहा

२२.    कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरविण्याचा अधिकार आहे?
    अ. ४०५ ब. १०९ क. ३४५ ड. २१०

२३.    भारतीय स्वातंत्र्याचा पहिला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर कोणी फडकावला?
    अ. पंडित नेहरू ब. सी. राजगोपालाचारी 
    क. महात्मा गांधी ड. लॉर्ड माऊंट बॅटन
२४.    काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले?
    अ. राजगुरू ब. सुखदेव क. चंद्रशेखर आझाद ड. जतिन दास

२५.    ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे खालीलपैकी कोणती पद्धती बंद झाली?
    अ. सतीची चाल ब. बालहत्या क. पडदा पद्धती ड. केशवपन

२६.     डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला?
    अ. गो. ग. आगरकर ब. लोकमान्य टिळक 
    क. लोकहितवादी ड. शि. म. परांजपे

२७.    लॉर्ड कर्झन कशामुळे बदनाम झाला होता?
    अ. त्याने विद्यापीठाची स्वायत्तता कमी केली. ब. त्याने बंगालची फाळणी केली क. त्याने फोडा व झोडा या नीतीचा अवलंब केला. ड. त्याने कायदेमंडळाची स्थापना केली

२८.     अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली हाती?
    अ. नाना जगन्नाथ शंकरशेठ ब. बाळशास्त्री जांभेकर क. विष्णुशास्त्री पंडित ड. विष्णुबुवा ब्रह्मचारी

२९.    पुणे समाचार हे दैनिक कोणी सुरू केले?
    अ. बाबा पद्मजी ब. गो. ग. आगरकर 
    क. शि. म. परांजपे ड. श्रीधर व्यंकटेश केतकर

३०    कोणत्या कारणामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांना लंडन येथे अटक करण्यात आली होतो?
    अ. भारतात क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रे पुरविल्याबद्दल 
    ब. लंडन येथे क्रांतिकारक कारवायाबद्दल
    क. कलेक्‍टर जॅक्‍सनच्या खुनात सहभागी असल्याबद्दल 
    ड. क्रांतिकारक साहित्याचा प्रसार केल्याबद्दल

३१.    इ. स. १८५७ च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे .......... ऐक्‍य होय.
    अ. हिंदू-मुस्लिम ब. मराठी-शीख 
    क. इंग्लिश-मुस्लिम ड. इंग्लिश-मराठी

३२.    बार्डोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते?
    अ. विठ्ठलभाई पटेल ब. गोविंद वल्लभ पंत 
    क. सरदार वल्लभभाई पटेल ड. महात्मा गांधी

३३.    २ डिसेंबर २०१७ पासून कोणत्या शहरात ‘कथाकार : आंतरराष्ट्रीय कथावाचक महोत्सव’ला सुरवात झाली?
    अ. नवी दिल्ली ब. जयपूर क. म्हैसूर ड. गोवा
 
३४.     डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटना (IMO) परिषदेमध्ये परिषदेच्या सभासद जागांसाठी झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या देशांमध्ये कोणाचा समावेश नाही?
    अ. जर्मनी ब. ऑस्ट्रेलिया क. अमेरिका ड. यांपैकी नाही

३५.     ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार-२०१७‘ दिव्यांग जन सशक्तीकरणाचा प्रचार करण्यासाठी सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार कोणाला दिला गेला?
    अ. आसाम ब. केरळ 
    क. महाराष्ट्र ड. छत्तीसगड

३६.     ‘आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिवस २०१७’ चा विषय काय होता?
    अ. बेटर वर्ल्ड फॉर द फ्युचर ब. ट्रान्सफॉर्मेशन टूवर्डस सस्टेनेबल अँड रेजीलीएंट सोसायटी फॉर ऑल
    क. डिसॲबिलिटी गेट्‌स ॲबिलिटी ड. यांपैकी नाही

३७.     कोणत्या भारतीय खेळाडूने ‘एशियन ल्यूज चॅम्पियनशिप २०१७‘ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले?
    अ. शिवा केशवन ब. नोदार कुमारीतसू 
    क. विक्रम तेजाप ड. यांपैकी नाही

३८.     दक्षिण आशियायी साहित्यिकांचा ’DSCपुरस्कार२०१७’ कोणत्या कादंबरीला मिळाला?
    अ. स्लिपिंग ऑन ज्युपिटर ब. इन सर्च ऑफ लॉस्ट टाइम 
    क. द स्टोरी ऑफ ब्रीफ मॅरेज ड. मिडनाईट चिल्ड्रेन

३९.    कोणत्या राज्यात दिव्यांगांसाठी समर्पित असे जगातले पहिले माहिती तंत्रज्ञान परिसर उघडण्यात येणार आहे?
    अ. आसाम ब. गुजरात क. केरळ ड. तेलंगणा

४०.     कोणत्या राज्य शासनाची हवाई संपर्क प्रदान करण्यासाठी ‘पॅलेस ऑन विंग्स’ सेवा सुरू करण्याची योजना आहे?
    अ. राजस्थान ब. पश्‍चिम बंगाल क. उत्तर प्रदेश ड. महाराष्ट्र
 

क्विझचे उत्तर ः १. अ  २. क  ३. ब  ४. ब  ५. क  ६. ब  ७. ब  ८. अ  ९. अ  १०. क  ११. ब  १२. ब  १३. अ १४. ब  १५. ब  १६. क  १७. ब  १८. क  १९. ब  २०. ब  २१. क  २२. क  २३. ड  २४. क  २५. ड  २६. अ  २७. ब   २८. ब  २९. ड  ३०. क  ३१. अ  ३२. क  ३३. अ  ३४. क  ३५. ड  ३६. ब  ३७. अ  ३८. क  ३९. ड  ४०. अ

संबंधित बातम्या