स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

मुकुल रणभोर
गुरुवार, 15 मार्च 2018

क्विझ

क्विझचे उत्तर ः १) क   २) ड  ३) अ   ४) क   ५) ड   ६) ब   ७) अ   ८) क   ९) ब    १०) क   ११) ड   १२) ब   १३) ड   १४) ब

 1. सॅंक्‍टम वेल्थ मॅनेजमेंट संस्थेच्या अहवालानुसार, कोणता देश वर्ष २०१८ मध्ये चीनला मागे टाकत जगातली सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनणार.
  अ) जपान ब) जर्मनी क) भारत ड) फ्रान्स
   
 2. कोणत्या राज्य शासनाने अधिकृत ‘राज्य लॉटरी‘ ऑनलाइन सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे?
  अ) मध्यप्रदेश   ब) राजस्थान   क) उत्तरप्रदेश  ड) महाराष्ट्र
   
 3. नवी दिल्लीत धातूच्या कचऱ्यापासून ३५ फूट उंचीची कोणत्या ऐतिहासिक वास्तूची प्रतिकृती उभारण्यात आली?अ) कुतुबमिनार                 ब) ताजमहाल
  क) कोणार्क सुर्यमंदिर         ड) लालकिल्ला
   
 4. हत्याकांडांच्या वाढत्या प्रमाणामुळे उत्तर अमेरिका उपखंडामधील कोणत्या देशाच्या ’मॉन्टेगो बे‘ शहरामध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली?
  अ) हैती    ब) क्‍यूबा    क) जमैका    ड) फ्लोरिडा
   
 5. कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी केवळ हाताच्या हावभावावरूनच दैनंदिन वस्तूंना हाताळण्यास किंवा उपकरणे नियंत्रित करण्यास त्वचेवर गोंदविता येणारे अतिसूक्ष्म पातळ थराचे इलेक्‍ट्रॉनिक टॅटू विकसित केले?
  अ) जपान     ब) अमेरिका      क) चीन     ड) जर्मनी
   
 6. महासागरामधील प्रदूषणाची पातळी जाणून घेण्याकरिता कोणती भारतीय संशोधन संस्था एप्रिल  २०१८ पर्यंत स्वयंचलित सुविधा केंद्र कार्यान्वित करणार?
  अ) राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT)
  ब) भारत राष्ट्रीय महासागर माहिती सेवा (INCOIS)
  क) राष्ट्रीय महासागर शास्त्र संस्था (NIO)
  ड) राष्ट्रीय अंटार्क्‍टिक व महासागर संशोधन केंद्र          (NCAOR)
   
 7. भारत सरकारने कांद्यासाठी किमान निर्यात मूल्य (MEP) दर$१५०ने कमी करत ______ प्रति टन याप्रमाणे निश्‍चित केले आहे. नवा दर २० जानेवारीपासून लागू होत आहे.
  अ) ७०० $     ब) ७५० $     क) ८०० $      ड) ९०० $
   
 8. ECI चे मुख्य निवडणूक आयुक्त पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
  अ) अचल कुमार ज्योती    ब) अशोककुमार लवासा 
  क) ओम प्रकाश रावत       ड) यांपैकी नाही.
   
 9. नव्या व्यवसायासाठी आवश्‍यक प्रक्रिया कमी करण्याहेतू संयोजन प्रक्रिया तयार करण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय कोणता उपक्रम राबवत आहे?
  अ) रिझर्व्ह युनिक नेम (RUN)
  ब) सरकारी प्रक्रिया पुनःअभियांत्रिकी (GPR)
  क) इज ऑफ डूइंग इयर (EODY) 
  ड) नवीन व्यवसाय तांत्रिकीकरण (NBT)
   
 10. वैश्विक एन्हार्यमेंट परफॉर्मन्स इंडेक्‍स (EPI-२०१८) अहवालानुसार, याबाबतीत भारत यादीच्या तळाशी आढळून आला आहे. यादीत एकूण १८० देशांना समाविष्ट केले गेले आहे, ज्यामध्ये भारत __व्या स्थानी आहे.
  अ) १७० व्या    ब) १७५ व्या   क) १७७ व्या    ड) १८० व्या
   
 11. बॅंकांचे (PSB) पुर्नभांडवलीकरण करण्यासंदर्भात योजनेमध्ये, वर्ष२०१७-१८च्या भांडवल गुंतवणूक योजनेमध्ये पुर्नभांडवलीकरण बॉण्डच्या माध्यमातून ___ आणि अर्थसंकल्पीय मदतीच्या रूपात ८,१३९ कोटी रुपयांचा समावेश आहे.
  अ) दहा हजार कोटी रुपये          ब) वीस हजार कोटी रुपये क) साठ हजार कोटी रुपये          ड) ऐंशी हजार कोटी रुपये
   
 12. कोणी ‘क्‍लीन अँड जर्क’ मधील कर्णम मल्लेश्वरीचा १९९९ साली अथेन्समध्ये बनविलेला १२७ किलोचा राष्ट्रीय विक्रम मोडला?
  अ) नंदिनी देवी                      ब) राखी हलदर 
  क) साईखोम मीराबाई चानू ड) यापैकी नाही
   
 13. जानेवारी २०१८ मध्ये कोणत्या राज्य शासनाने किराणा तसेच अन्य दुकानांतून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली?
  अ) मध्यप्रदेश   ब) पंजाब   क) केरळ    ड) महाराष्ट्र
   
 14.  भारतात तरुण शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनातर्फे चार नवीन योजना जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये कोणती योजना नाही?
  अ) टीचर असोसिएटशीप फॉर रिसर्च एक्‍सलंस (TARE)
  ब) भाभा फंडामेंटल रिसर्च अवॉर्ड
  क) ओव्हरसीज व्हिजिटिंग डॉक्‍टरल फेलोशिप
  ड) ऑग्युमेंटिंग रायटिंग स्किल्स फॉर आर्टिकुलेटिंग रीसर्च (AWSAR)

संबंधित बातम्या